शहरं
Join us  
Trending Stories
1
इंधन बचतीसाठी मुख्यमंत्री फडणवीस 'ॲक्शन मोड'मध्ये! परदेश दौरे, ताफा कमी करण्यासह मोठे निर्णय होणार...
2
Top Marathi News Live: शरद पवारांची भेट घेतल्याने राजकारणात चर्चांचे वादळ; सुनील तटकरेंनी मांडली भूमिका
3
होर्मुझ'मधून गॅस पुरवठा ठप्प, भारताचा 'प्लॅन बी' तयार! पाहा कशी केली जाते भरपाई
4
IPL 2026: "पहिल्या चेंडूपासूनच..." RCB विरुद्धच्या सामन्याआधी शेन वॉटसनचा KKR च्या खेळाडूंना कानमंत्र!
5
NEET Exam Paper Leak : NEET पेपर लीकमध्ये मोठा खुलासा! २ भावांनी डॉक्टरकडून ३० लाखांत खरेदी केला पेपर अन्...
6
मुलावर एकाधिकार दाखवण्याच्या आईच्या वृत्तीवर उच्च न्यायालयाची चिंता; वडिलांना मुलाला भेटण्याचा अधिकार ठेवला कायम 
7
Prateek Yadav : शाळेत मैत्री, ई-मेलवर प्रेम अन् १० वर्षांचा रोमान्स! अशी होती प्रतीक आणि अपर्णा यादव यांची लव्ह स्टोरी
8
४ दिवसांत ६०० रुपयांपेक्षा अधिकनं आपटला 'टाटा'चा हा शेअर; रेखा झुनझुनवालांचे २८०० कोटी बुडाले
9
‘हातावर चुंबन घेणे ही...’; टॅक्सीचालकाला न्यायालयाने सुनावली दोन वर्षे कारावासाची शिक्षा
10
Central Railway: आसनक्षमता ७२, प्रवाशांची संख्या ४००; ‘टीसी’वर ताण; टार्गेट आणि वाढत्या हल्ल्यांमुळे रेल्वे कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात
11
Sonia Gandhi: काँग्रेस नेत्या सोनिया गांधी गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात दाखल, नेमकं कारण काय?
12
अधिक मास २०२६: संकल्पपूर्तीसाठी अधिक मासात गुरुचरित्राचे 'हे' निवडक अध्याय वाचणेदेखील ठरेल प्रभावी!
13
सिद्धार्थ जाधवच्या पत्नीला पाहिलंत का? बिजनेसवुमन आहे तृप्ती, करते 'हे' काम
14
Prateek Yadav : "कौटुंबिक वादानंतर डिप्रेशन…"; १३ वर्षे सोबत असलेल्या प्रतीक यादव यांच्या मित्राचा गौप्यस्फोट
15
राजकारणापासून दूर..; प्रतीक यादव काय काम करायचे? किती होती त्यांची संपत्ती? जाणून घ्या...
16
किती लाजिरवाणं आहे! 'कान्स'च्या रेड कार्पेटवर आलिया भटकडे फोटोग्राफर्सचं दुर्लक्ष? व्हिडीओ व्हायरल
17
ट्रम्प यांचा चीनला मोठा इशारा! जिनपिंगना भेटण्यापूर्वीच इराणबाबत ठणकावून सांगितलं; काय म्हणाले?
18
Pune Nasrapur Case : सीसीटीव्ही, ‘शेव’ आणि टणक वस्तू...; नसरापूर प्रकरणात आणखी कोण सामील ?
19
ट्रम्प यांची टीका फोल! इराणची तटबंदी अधिक मजबूत; ३० क्षेपणास्त्र तळ अजूनही 'ॲक्टिव्ह'
20
ब्रिटिश पंतप्रधान कीर स्टार्मर यांचे पद धोक्यात; गंभीर आरोप करत ८० मंत्र्यांनी फडकावले बंडाचे निशाण
Daily Top 2Weekly Top 5

दहशतवाद्यांचा स्लीपर सेल...! मुंब्र्यातून उर्दू शिक्षकाला अटक; अल कायदाशी संबंध, एटीएसला मोठा सुगावा लागला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2025 13:13 IST

ATS Raid Mumbra: मुंब्र्यातील उर्दू शिक्षक इब्राहिम अबीदीवर अल-कायदा (AQIS) संबंधांमुळे ATS चा छापा. हा शिक्षक तरुणांना आणि मुलांना कट्टरपंथी बनवत असल्याचा संशय आहे. पुणे AQIS प्रकरणाचे धागेदोरे मुंबईपर्यंत!

पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाने भारतात खोलवर पाळेमुळे रोवल्याचे समोर आले आहे. दिल्लीतील लाल किल्ला बॉम्बस्फोटापूर्वी जम्मू काश्मीरच्या पोलिसांनी दोन डॉक्टरांना अटक केली होती. तिसराही ताब्यात आला होता. परंतू, चौथ्या डॉक्टरने तयार असलेल्या स्फोटकांचा दिल्लीत नेऊन स्फोट घडवून आणला होता. आता मुंब्र्यातून मशीदीमध्ये उर्दू शिकविणाऱ्या शिक्षकाला ताब्यात घेण्यात आले आहे. या शिक्षकाचे अल कायदाशी संबंध असून तो लहान मुलांना, समाजातील उच्चभ्रू, उच्चशिक्षितांना दहशतवाद्यांचा स्लिपर सेल बनून कट्टर बनविण्यासाठी ब्रेन वॉश करत असल्याचे समोर आले आहे. 

महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा-कौसा परिसरात केलेल्या एका मोठ्या कारवाईमुळे हे गंभीर वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे. येथील इब्राहिम अबीदी नावाच्या एका उर्दू शिक्षकाच्या घरावर बुधवारी एटीएसने छापा टाकला. अबीदी हा मुंब्र्यात भाड्याच्या घरात राहत असे आणि दर रविवारी कुर्ल्यातील एका मशिदीत उर्दू शिकवत असे. मात्र, या 'साध्या' जीवनाआड त्याचे संबंध अल-कायदा इन इंडियन सबकॉन्टिनेंट (AQIS) या प्रतिबंधित दहशतवादी संघटनेशी असल्याचा एटीएसला संशय आहे.

शिक्षण की कट्टरता?
इब्राहिम अबीदी हा 'व्हाईट-कॉलर' लोकांना आणि मुलांना कट्टरपंथी विचारधारेकडे वळवण्याचे काम करत असल्याचा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे. ही कारवाई पुणे AQIS प्रकरणाशी जोडलेली आहे. याच प्रकरणात यापूर्वी पुणे येथून झुबेर इलियास हंगरगेकर नावाच्या सॉफ्टवेअर इंजिनिअरला अटक करण्यात आली होती. यानंतर हे धागेदोरे सापडले आहेत.

ATS च्या तपासात असे उघड झाले आहे की, अटक केलेला इंजिनिअर झुबेर हंगरगेकर हा मुंब्र्यातील याच शिक्षकाच्या घरी झालेल्या एका गुप्त बैठकीत सहभागी झाला होता. इतकेच नव्हे, तर झुबेरच्या जुन्या फोनमधून ओसामा बिन लादेनच्या भाषणाचे उर्दू भाषांतर तसेच 'अल-कायदा'शी संबंधित गोपनीय कागदपत्रे आणि 'इंस्पायर' नावाचे एक मासिक जप्त करण्यात आले आहे, ज्यात बॉम्ब बनवण्याची माहिती होती.

ATS ने इब्राहिम अबीदीच्या मुंब्रा आणि कुर्ला (दुसऱ्या पत्नीचे घर) येथील दोन्ही ठिकाणांची झडती घेतली असून अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि संशयास्पद कागदपत्रे जप्त केली आहेत. या शिक्षकाच्या माध्यमातून दहशतवादी संघटनांनी मुंबई आणि परिसरात आपले जाळे किती खोलवर पसरवले आहे, याचा तपास ATS युद्धपातळीवर करत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Mumbai: Urdu teacher arrested for Al-Qaeda links, sleeper cell.

Web Summary : An Urdu teacher in Mumbai has been arrested for alleged Al-Qaeda links. He's suspected of radicalizing individuals, forming a sleeper cell. ATS is investigating further, uncovering a wider network.
टॅग्स :terroristदहशतवादीOsama Bin Ladenओसामा बिन लादेन