शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

“तेव्हाच मविआ सरकार पडलं असतं”; अनिल देशमुखांच्या विधानावर संजय राऊत थेट बोलले, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2023 17:02 IST

Maharashtra Politics: भाजपसोबत समझोता केला असता तर मला अटक नसती झाली, असे अनिल देशमुख यांनी म्हटले आहे.

Maharashtra Politics: गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात गौप्यस्फोटांच्या मालिका सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. यातच आता राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी एक गौप्यस्फोट केला आहे. २ वर्षापूर्वी मी भाजपासोबत समझोता केला असता तर मला अटक नसती झाली. पण २ वर्षापूर्वीच काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे सरकार पडले असते, असा दावा अनिल देशमुख यांनी केला होता. यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

शरद पवारांच्या उपस्थितीत हे विधान वर्धातील सभेत केले होते. माझ्याकडे जो प्रस्ताव आला होता त्याने मला अटक झाली नसती पण सरकार पडले असते. याचा अर्थ तुम्ही समजून जा, असे अनिल देशमुख यांनी सांगितले. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी यावर भाष्य केले. तसेच एक मोठा दावाही केला. जयंत पाटील यांच्यावर भाजपकडून दबाव होता. भाजपाचा प्रस्ताव मान्य केला नाही म्हणून जयंत पाटील यांच्यावर ईडी कारवाई झाली असा दावा संजय राऊत यांनी केला.  यावेळी बोलताना संजय राऊत यांनी अनिल देशमुख यांच्या विधानावर प्रतिक्रिया दिली.

अनिल देशमुख सांगत आहेत ते खरे आहे

अनिल देशमुख सांगत आहेत ते खरे आहे. मला ते संपूर्ण प्रकरण माहिती आहे. अनिल देशमुखांवर कोणत्या प्रकारचा दबाव होता आणि त्यांना भाजपने काय ऑफर दिली होती त्याचे पुरावे अनिल देशमुखांकडे आहेत. इतकेच नाही, तर त्याबाबतचे काही व्हिडिओही त्यांच्याकडे आहेत, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान मुंबई दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर जाऊन भेट घेतली. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतAnil Deshmukhअनिल देशमुख