शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

वाढदिवसानिमित्त आमदार रोहित पवार यांनी कार्यकर्त्यांकडे मागितलं खास गिफ्ट, म्हणाले...

By बाळकृष्ण परब | Updated: September 28, 2020 17:03 IST

आमदार रोहित पवार यांचा उद्या वाढदिवस आहे. त्यानिमित्त रोहित पवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांना आवाहन करून एक खास गिफ्ट मागितले आहे.

ठळक मुद्देकोरोनाच्या संकटकाळात केक, बॅनर बुकेवर खर्च करण्यापेक्षा साधेपणाणे सामाजिक भान जपून वाढदिवस साजरा करावागरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी हातभार लावण्याचा प्रयत्न कार्यकर्त्यांनी करावाकोरोनाकाळात आघाडीवर राहून लढणाऱ्याना आपल्या भागातील व्यक्तींना  एखादं फूल देवून प्रोत्साहन द्यावे

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते आमदार रोहित पवार यांचा उद्या वाढदिवस आहे. त्यानिमित्त रोहित पवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांना आवाहन करून एक खास गिफ्ट मागितले आहे. सध्या आलेल्या कोरोनाच्या संकटकाळात केक, बॅनर बुकेवर खर्च करण्यापेक्षा साधेपणाणे सामाजिक भान जपून वाढदिवस साजरा करावा. तसेच गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी हातभार लावण्याचा प्रयत्न कार्यकर्त्यांनी करावा, नैराश्य आलेल्या तरुणांना आधार द्यावा. तसेच कोरोनाकाळात आघाडीवर राहून लढणाऱ्याना आपल्या भागातील व्यक्तींना  एखादं फूल देवून प्रोत्साहन द्यावे, हेच माझ्यासाठी वाढदिवसाचं गिफ्ट असेल, असे आवाहन रोहित पवार यांनी केले आहे.फेसबूक लाइव्हच्या माध्यमातून रोहित पवार यांनी वाढदिवसानिमित्तची आपल्या मनातील भावना कार्यकर्त्यांसमोर मांडली आहे. ते म्हणाले की, ''माझा वाढदिवस उद्या असला तरी राज्यातील माझे मित्र, बंधु-भगिनी आणि कार्यकर्त्यांनी गेल्या काही दिवसांपासूनच वेगवेगळ्या पद्धतीने तो साजरा करायला सुरुवात केली आहे. आपल्या या आपुलकीच्या शुभेच्छांचा नम्रपणे स्वीकार करत असताना आपले आभार मानण्यापेक्षा आपल्या ऋणातच राहायला मला आवडेल. पण वाढदिवसानिमित्त मला आपल्या सर्वांकडून एक गिफ्ट हवंय. मी ते तुम्हाला हक्काने मागतोय आणि आपण ते मला नक्की द्याल असा मला विश्वास आहे.''रोहित पवार कार्यकर्त्यांना आवाहन करताना म्हणाले की, कोरोनामुळे सध्या शिक्षण हे ऑनलाइन पद्धतीने सुरू आहे. पण अनेकांकडे ऑनलाइन शिक्षणासाठी आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध नाहीत. अशा विद्यांना मदत करण्याबाबत, स्मार्टफोनसारखी साधने घेऊन देण्याबाबत, दहावी, बारावी झालेल्यांच्या पुढील शिक्षणाचा खर्च उचलण्याबाबत विचार करावा. नैराश्याने ग्रासलेल्या तरुणांना धीर देण्याचा विचार करा. आता हे आवाहन मी इतरांना करतोय असं नाही. मी स्वत: शारदानगर संकुलातील १०० मुलींच्या शिक्षणाचा यंदाचा खर्च उचलण्याचा संकल्प माझ्या वाढदिवसानिमित्त केला आहे.

तसेच कोरोनाकाळात आपल्या गावात, परिसरात आघाडीवर राहून काम करणाऱ्या व्यक्तींचा एखादे फूल देऊन सन्मान करा. कोरोनाबाधित व्यक्ती आणि त्यांच्या कुटुंबांना मानसिक आधार देण्याचा प्रयत्न करा, यंदाच्या वाढदिवशी हेच माझ्यासाठी बर्थ डे गिफ्ट असेल, असे रोहित पवार यांनी सांगितले. तसेच येणारा काळ हा संधीचा आणि सोबतच अडचणींचा असेल, त्यामधून आपल्या मार्ग काढावा लागेल, असा सल्ला रोहित पवार यांनी दिला आहे. 

इतर महत्त्वाच्या बातम्या

तेव्हा खुद्द नेहरूंनी दिली होती मनमोहन सिंग यांना राजकारणात येण्याची ऑफर...

श्वसनाचे विकार असणाऱ्यांवर १०० टक्के प्रभावी ठरणार नाही कुठलीही लस, ICMR च्या संचालकांच्या विधानाने वाढली चिंता

आधी झाला असेल हा आजार, तर तो कोरोनाविरोधात लढण्यास ठरेल मदतगार

ही पथ्यं पाळा आणि तंदुरुस्त व्हा, कोरोनामुक्त रुग्णांना आरोग्य मंत्रालयाने दिले १० खास सल्ले

शेतकऱ्यांसाठी सरकारने आणली भरघोस नफा मिळवून देणारी योजना, मिळेल ८० टक्क्यांपर्यंत सब्सिडी

पँगाँगमध्ये चिनी सैन्याला सळो की पळे करणाऱ्या स्पेशल फ्रंटियर फोर्सची ही आहे खास वैशिष्टे

 

टॅग्स :Rohit Pawarरोहित पवारSocialसामाजिकNCPराष्ट्रवादी काँग्रेसMaharashtraमहाराष्ट्रPoliticsराजकारण