शहरं
Join us  
Trending Stories
1
खासगी शाळांमध्ये आता मराठी शिकवणे बंधनकारक; नियम मोडणाऱ्या शाळेला बसणार दणका
2
अजितदादांच्या अपघातादिवशीच विमान कंपनीला ९ कोटींचे बक्षीस; रोहित पवारांचे खळबळजनक आरोप
3
भारत लष्करी खर्चात जगात पाचवा ठरला! शेजारी पाकिस्तान जवळपासही कुठेच नाहीय..., चीन मात्र...
4
Top Marathi News LIVE Updates: "दादांच्या अंत्यविधीच्या दिवशी १६ कोटी दिले"; रोहित पवारांचा 'व्हीएसआर' कंपनीवरून सरकारवर हल्ला
5
गोलsss... पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सिक्कीमच्या तरूणांसोबत खेळला फुटबॉल, PHOTOSची रंगली चर्चा
6
वाढदिवसासाठी Reel तयार करण्याच्या नादात युवकाने भलताच उद्योग केला; शेवटी हातात पडल्या बेड्या
7
Adhar Card : मोठा बदल! आता आधार कार्ड तुमचे वय सिद्ध करणार नाही, तुम्हाला जन्मतारखेचा पुरावा म्हणून 'ही' कागदपत्रे दाखवावी लागणार
8
कलमा वाचता येतो का? विचारले अन् सुरक्षा रक्षकांवर चालवला चाकू; मीरा रोडच्या हल्ल्यात 'लोन वुल्फ'चा संशय
9
Robert Kiyosaki Prediction: रॉबर्ट कियोसाकी यांची २०२६-२७ मध्ये मोठ्या आर्थिक संकटाची भविष्यवाणी; भारतीय गुंतवणूकदारांनी काय करावं?
10
तुमच्या छोट्याशा बाल्कनीला, खिडकीला द्या 'ग्रीन टच'; कमी जागेत बाग फुलवण्याच्या 'मास्टर ट्रिक'
11
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
12
हृदयद्रावक! IPL सामना पाहून घरी परतणाऱ्या २ भावांवर काळाचा घाला; 'हिट अँड रन'मध्ये मृत्यू
13
Mutual Fund Redemption Rules: काय आहे FIFO नियम आणि तो कसा वाचवतो तुमचा टॅक्स? जाणून घ्या डिटेल्स
14
बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने झाला 'त्या' चार जणांचा मृत्यू? पोस्टमार्टेम रिपोर्टमधून समोर आलं खरं कारण
15
एका दुखापतीने संपवलं करियर.. अवघ्या ३०व्या वर्षी क्रिकेटपटूला करावी लागली निवृत्तीची घोषणा
16
Chanakya Niti: समाजात राजासारखा मान हवा? चाणक्यनीतीतल्या 'या' ५ सवयी तुमचं आयुष्य बदलतील!
17
भारत-न्यूझीलंडमध्ये ऐतिहासिक 'मैत्री'! ५००० भारतीयांना थेट नोकरीची संधी, मोठे फायदे कोणते?
18
चिंताजनक! महाराष्ट्राला टीबीचा विळखा; राज्यात तब्बल ११ हजार गावांना हाय अलर्ट!
19
Gold-Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या दरात बदल; पटापट चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K आणि १८K Gold चे नवे दर
20
घरात मोबाइल नेटवर्क मिळणे झाले कठीण; इमारतींना ‘डिजिटल रेटिंग’ देण्याचा ‘ट्राय’चा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

मोबाइलद्वारे टॉयलेटमध्ये रेकॉर्डिंग करणारा अटकेत

By admin | Updated: February 10, 2015 02:47 IST

अंधेरीतल्या एका लाऊंजच्या लेडीज टॉयलेटमध्ये मोबाइल चिकटवून रेकॉर्डिंग केल्याप्रकरणी अंबोली पोलिसांनी सफाईकामगार गरीबनाथ

मुंबई : अंधेरीतल्या एका लाऊंजच्या लेडीज टॉयलेटमध्ये मोबाइल चिकटवून रेकॉर्डिंग केल्याप्रकरणी अंबोली पोलिसांनी सफाईकामगार गरीबनाथ राम याला अटक केली आहे. त्याच्या मोबाइलमध्ये अंबोली पोलिसांना एक आक्षेपार्ह क्लीप आढळली असून, पुढील चाचणीसाठी हा मोबाइल न्यायवैद्यक प्रयोगशाळेत धाडण्यात आला आहे.हा मोबाइल दोन महिन्यांपूर्वी लाऊंजमध्ये सफाईकामगार म्हणून रुजू झालेल्या गरीबनाथचा असल्याचे स्पष्ट झाले. त्याने हा मोबाइल महिलांच्या अश्लील चित्रफिती काढण्यासाठी तेथे चिकटविल्याचे कबूल केले. त्याला भारतीय दंड संहिता व माहिती तंत्रज्ञान कायद्यातील विविध कलमांन्वये गुन्हा नोंदवून अटक केली. न्यायालयाने त्याला १२ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी दिली. कुलाब्यात घडली दुसरी घटनाकुलाबा परिसरातील एका खासगी कंपनीच्या कार्यालयातही मोबाईलद्वारे स्वच्छतागृहात गेलेल्या महिलांच्या चित्रफिती रेकॉर्ड करणाऱ्या जाफर शेख(२६) नावाच्या कर्मचाऱ्याला पोलिसांनी अटक केली. हा प्रकार शनिवारी समोर आला. महिला कर्मचारी स्वच्छतागृहातील शौचालयात असताना जाफर मोबाईलद्वारे रेकॉर्डींग करत असल्याचे तिला समजले. तिने हा प्रकार व्यवस्थापकाला सांगितला. त्याने जाफरचा मोबाईल चाळला तेव्हा त्यात आक्षेपार्ह क्लीप आढळली. त्याला कुलाबा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. (प्रतिनिधी)