शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
3
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
5
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
6
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
7
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
8
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
9
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
10
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
11
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
12
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
13
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
14
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
15
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
16
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
17
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
18
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
19
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
20
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर

विदर्भासह मराठवाड्यात पावसाचा जोर वाढणार; हवामान शास्त्र विभागाची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2019 4:02 AM

गेल्या २४ तासांत कोकण, गोवा, विदर्भात अनेक ठिकाणी, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे.

मुंबई : आगामी काळात महाराष्ट्रात चांगला पाऊस होण्याची शक्यता असून, दोन दिवसांत विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा जोर वाढण्याची अपेक्षा आहे. तर गुरुवारी मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी मध्यम सरींची शक्यता ‘स्कायमेट’ने वर्तवली आहे. दुसरीकडे मुंबईत पावसाने चांगलीच विश्रांती घेतली असून, गुरुवारसह शुक्रवारी येथे हलक्या सरींची शक्यता आहे.

स्कायमेटकडून मिळालेल्या माहितीनुसार, सध्या महाराष्ट्रात ब-याच भागांत सामान्य किंवा जास्त पाऊस झाला आहे. तथापि, मराठवाड्यात अजूनही २४ टक्के पावसाची कमतरता आहे. किंबहुना आॅगस्ट महिन्यात झालेल्या पावसाचा मध्य महाराष्ट्राला जास्त फायदा झाला. या पावसामुळे मराठवाड्यातील पावसाची कमतरता कमी होईल. गेल्या २४ तासांत विदर्भ, कोकण आणि गोवा या प्रदेशात हलका ते मध्यम पाऊस नोंदविण्यात आला. मध्य महाराष्ट्रातही हलक्या पावसाने हजेरी लावली.

दरम्यान, २३ आॅगस्टपासून महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाचा जोर कमी होणार आहे. भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत कोकण, गोवा, विदर्भात अनेक ठिकाणी, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली आहे.राज्यासाठी अंदाज२२ आॅगस्ट : कोकण, गोव्यात अनेक ठिकाणी, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल.२३ ते २५ आॅगस्ट : कोकण, गोव्यात अनेक ठिकाणी, विदर्भात काही ठिकाणी, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल.दामिनी देणार वादळ, विजांचा इशाराइंडियन इस्टिट्यूट आॅफ ट्रॉपिकल मेटेरोलॉजीने ‘दामिनी’ नावाचे अ‍ॅप विकसित केले आहे. आयआयटीएमच्या वतीने देशभरात ४८ सेन्सर बसविले आहेत. केरळ, उत्तर भारत, उत्तर पूर्व भारत, ओरिसा, पश्चिम बंगाल आणि हिमालय या विभागांत नवे सेन्सर बसविण्यात आले आहेत. यामुळे वादळ आणि विजांचे इशारे मिळण्यास मदत होत आहे. ३० मिनिटांपूर्वी यासंबंधीचे इशारे मिळत आहेत. ४० किमी परिसरातील माहिती आॅडिओ आणि एसएमएसद्वारे मिळत आहे.

टॅग्स :Rainपाऊस