शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी काँग्रेस कार्यकर्ते आणि मित्रपक्षांवरच भडकले; म्हणाले, "तृणमूलच्या पराभवामुळे जे आनंदित झालेत, त्यांनी..."
2
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
3
संगीतकार पलाश मुच्छल पुन्हा अडचणीत, सांगलीत ॲट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल
4
तब्बल ३० तासांनंतर पश्चिम बंगालमधील 'त्या' मतदारसंघांचा निकाल समोर आला! ममतादीदींचा बालेकिल्ला उद्ध्वस्त
5
हार्दिक पांड्या-मुंबई इंडियन्समध्ये बिनसलं? LSGविरूद्धचा सामना न खेळण्याचं खरं कारण आलं समोर
6
पश्चिम बंगालच्या एका मतदारसंघात अद्याप मतमोजणी सुरुच; निकालांचे गॅझेट अद्याप राज्यपालांकडे गेलेच नाहीत...
7
वय ६५ वर्षे तरी जोश भारी! तरुणांना लाजवेल असा वृद्धांचा फिटनेस फंडा; Video तुफान व्हायरल
8
UN Secretary General Election: संयुक्त राष्ट्रात 'स्त्रीशक्ती'चा डंका? चीनच्या एका विधानाने खळबळ!
9
बंगालचा मुख्यमंत्री कोण होणार? भाजपचे 'चाणक्य' घेणार निर्णय, असामची जबाबदारी नड्डांवर...
10
मोठी बातमी! पश्चिम बंगालमधून ममतांची एक्झिट होताच ईडी सक्रीय झाली, कोलकाता DCP विरोधात ED ची 'लुकआउट' नोटीस 
11
ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...?
12
कोण आहेत अग्निमित्रा पॉल? पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदासाठी नावाची सुरु झालीय चर्चा...
13
नसरापूर हत्याकांड: लैंगिक अत्याचाराच्या आरोपींचा 'पॅरोल' कायमचा बंद होणार; CM फडणवीसांचे कडक निर्देश
14
सरकारी रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये सापडले पैसे, सोनं; टीएमसी नेत्यांवर गंभीर आरोप
15
माळशेज घाटात  भीषण अपघात, एसटी आणि स्कॉर्पियोची समोरासमोर धडक, ४ जणांचा मृत्यू 
16
Latest Marathi News LIVE :राज्यातील २४ अनुदानित आश्रमशाळांची श्रेणीवाढ; मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय
17
वादळात पालापाचोळ्यासारखी उडाली पाण्याची टाकी, अधांतरी लटकला काही भाग, सुदैवाने...
18
Gold Silver Price Today: सोन्याच्या किमतीत पुन्हा मोठी घसरण; दर १,४८,००० रुपयांच्या खाली, चांदीही स्वस्त
19
कळस गाठला! ज्याला पोटच्या पोरासारखं मानलं, त्यानेच संपवलं; निवृत्त पोलीस उपनिरीक्षकाच्या पत्नीची निर्घृण हत्या
20
Astro Tip: नकारात्मक लोकांमुळे तुमची ऊर्जा कमी होतेय? 'हा' सोपा उपाय नक्की करून पहा!
Daily Top 2Weekly Top 5

Raigad Accident: रायगडमध्ये रिक्षाला अपघात, ब्रेक फेल झाल्याने दिशादर्शकाला धडक, तीन ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2025 09:12 IST

रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यातील कासारमलई येथील तीव्र उतारावर रविवारी ब्रेक फेल झाल्याने रिक्षा सिमेंटच्या दिशादर्शकावर आदळली.

लोकमत न्यूज नेटवर्करायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यातील कासारमलई येथील तीव्र उतारावर रविवारी ब्रेक फेल झाल्याने रिक्षा सिमेंटच्या दिशादर्शकावर आदळली. या भीषण अपघात चालकासह तीन जणांचा मृत्यू झाला. कणघर  येथील उद्धवसेनेचे शाखाप्रमुख असलेले रिक्षाचालक संतोष नानासाहेब सावंत (वय, ४०) यांचा जागीच मृत्यू झाला, तर  शांताराम काळीदास धोकटे, शर्मिलाबाई तुकाराम धोकटे यांचा माणगाव उपजिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.

या अपघातात प्रकाश धाडवे, कविता संतोष मगर आणि संतोष मगर जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी पुढे पाठविण्यात आले आहे. संदेरी येथील समाजाची मिटिंग संपवून रिक्षा कणघर येथे परतत असताना ताम्हाणे शिर्केच्या पुढे कासारमलई येथे अपघात तीव्र उतारावर अपघात झाल्याची माहिती पोलीस निरीक्षक संदीप कहाले यांनी दिली.

भिवंडी: वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यूभिवंडी रांजनोली येथील डायमंड हॉटेलसमोर वाहनाच्या धडकेत ३५ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सोमवारी पहाटे घडली. या प्रकरणी कोनगाव पोलिसांनी चालकावर गुन्हा दाखल केला आहे. ठाणे-नाशिक मार्गालगतच्या रांजनोली हद्दीतील डायमंड हॉटेल समोरून पहाटे चारच्या सुमारास तरुण चालत जात होता. त्यावेळी अज्ञात वाहनाने तरुणास धडक दिली. तरुण गंभीर जखमी झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तरुणाची ओळख पटविण्याचे तपास पोलिसांकडून सुरू आहे.

आठव्या मजल्यावरून तरुणीने मारली उडी मीरा रोड येथे आठव्या मजल्यावरून उडी मारून २१ वर्षीय तरुणीने आत्महत्या केली. या प्रकरणी काशिमीरा पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे. मीरा रोडच्या ठाकूर मॉल जवळील डी.बी. ओझोन गृहसंकुलातील इमारत क्र. १२ मध्ये राहणाऱ्या सिद्धी पंकज कागलीवाल (२१) या तरुणीने ८व्या मजल्याच्या राहत्या घरातून खाली उडी मारून आत्महत्या केली. या प्रकरणी तिचा मानलेला भाऊ ऋषिकेश केडीया याने तक्रार केली. त्यानुसार काशिमीरा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची  नोंद केली आहे. या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक सचिन काशीद हे करत आहेत.

टॅग्स :AccidentअपघातMaharashtraमहाराष्ट्रRaigadरायगड