शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
3
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
4
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
5
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
6
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
7
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
8
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
9
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
10
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
11
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
12
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
13
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
14
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
15
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
16
खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
17
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
18
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
19
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
20
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पुणे निवडणूक 2019 : धनंजय मुंडें बाबत जे काही घडलं ते राजकीय षडयंत्र! परळी येथील वादाबाबत अजित पवार यांची शंका 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2019 15:54 IST

Pune Vidhan Sabha Election 2019 : मुद्दाम काही क्लीप व्हायरल करुन मतदारांना खेचण्यासाठी डाव आहे.

ठळक मुद्देकाटेवाडी येथे सहकुटुंब केले मतदानक्लिपची लॅब कडुन तपासणी करुन शहानिशा होणे गरजेचे

बारामती : ते राजकीय षडयंत्र आहे का, मुद्दाम काही क्लीप व्हायरल करुन मतदारांना खेचण्यासाठी डाव आहे.याबाबत संबंधित क्लीपची लॅबमध्ये तपासणी  करावी.याचा कोणत्याची पक्षाच्या नेत्यांनी  राजकीय फायदा कोणी घेवु नये. या  वादाबदद्ल कालच धनंजय मुंडे यांच्याशी संपर्क झाला.त्यांनी कोणाच्या भावना दुखावल्या जातील,असे कृत्य माज्याकडुन झाले नसल्याचे सांगितले.ती क्लीप कट केलेली असल्याचे देखील धनंंजय यांचे म्हणले आहे.त्यामुळे त्या क्लिपची लॅब कडुन तपासणी करुन शहानिशा होणे गरजेचे आहे, असे मत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले.पवार यांनी पत्नी सुनेत्रा पवार , आई आशाताई पवार, बंधु श्रीनिवास पवार, भावजय शर्मिला पवार,बहिण नीता पाटील,पुत्र जय पवार यांनी काटेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत आज सकाळी सात वाजता मतदानाचा हक्क बजावला.मतदानानंतर पत्रकारांशी बोलताना पवार यांनी परळी येथील मुंडे बंधु भगिनींच्या वादाच्या पार्श्वभुमीवर हे मत व्यक्त केले. यावेळी पवार म्हणाले,निवडणुकीच्या निमित्ताने असे मुद्दे पुढे येवु नयेत. गटबाजीतुन अशा घटना घडतात. मात्र, हा मुद्दा किती ताणायचा,त्याचा फायदा कोणी घेवु नये. ते मतदार केंद्र संवेदनशील आहे.दोघांचेही कार्यकर्ते संवेदनशील आहेत.शेवटी निवडणुक येतात,जातात.पाच वषार्तुन एकदा निवडणुका येतात.मात्र, रक्ताची नाती कायम असतात. धनंजय ला मी चांगले ओळखतो. त्याने असे काही घडले असते,तर मला स्पष्ट सांगितले असते,हे सांगायला पवार विसरले नाहित.

ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या सभांना चांगला प्रतिसाद मिळाला.वय वर्ष ७९ असताना उन वारा पावसाची त्यांनी तमा बाळगली नाही. विशेषत : तरुणांचा त्यांच्या सभेला प्रचंड प्रतिसाद  मिळाला.साताºयासह बारामती  येथील सभांना पाऊस असताना लोकांचा प्रचंड उत्साह होता. काही नेत्यांना पाऊस नसताना,मंडप टाकलेला नसताना चार चार पाच पाच तास थांबावे लागते. सभेला लोक गोळा होण्याची वाट पाहताना त्यांच्या कार्यकर्त्यांना ह्यसाहेब चहा घ्या,याच्याशी बोला,त्याच्याशी बोला,असे करुन नेत्यांना थांबुन घ्यावे लागते.मात्र, साहेबांबाबत ते घडले नाहि.त्यांच्या सभा ऐकण्यासाठी लोक आतुरतेने वाट पाहत होते.यामध्ये तरुणांचा मोठा सहभाग होता,असा टोला पवार यांनी भाजपच्या नेत्यांना त्यांचे नाव न घेता लगावला.चाळीस वर्षात प्रथमच हा पाऊस पाहत आहे.मतदारांनी उत्साह दाखविल्यास मतदानाची टक्केवारी वाढेल. पहिल्यांदाच असे वातावरण तयार झाल्याचे पवार म्हणाले.

टॅग्स :BaramatiबारामतीPoliticsराजकारणMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019baramati-acबारामतीDhananjay Mundeधनंजय मुंडेPankaja Mundeपंकजा मुंडेAjit Pawarअजित पवार