शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
5
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
6
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
7
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
8
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
9
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
10
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
11
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
12
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
13
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
14
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
15
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
16
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
17
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
18
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
19
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
20
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
Daily Top 2Weekly Top 5

संस्काराचे मोती प्रवेश अर्जाचे प्रकाशन

By admin | Updated: June 29, 2014 00:51 IST

लोकमत आणि लोकमत समाचारतर्फे विद्यार्थ्यांसाठी आयोजित १०० दिवसांच्या सामान्य ज्ञानाच्या शैक्षणिक कार्यक्रमाची सुरुवात लवकरच करण्यात येत आहे. यावर्षीच्या कार्यक्रमाचे प्रायोजक मेघे ग्रुप आॅफ

१ जुलैपासून प्रकाशित होणार साहित्य : विजेत्यांना विमान प्रवासाची संधी नागपूर : लोकमत आणि लोकमत समाचारतर्फे विद्यार्थ्यांसाठी आयोजित १०० दिवसांच्या सामान्य ज्ञानाच्या शैक्षणिक कार्यक्रमाची सुरुवात लवकरच करण्यात येत आहे. यावर्षीच्या कार्यक्रमाचे प्रायोजक मेघे ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूशन्सचा उपक्रम असलेली एडीसीसी अकॅडमी आहे. या कार्यक्रमाच्या प्रवेश अर्जाचे प्रकाशन आज एडीसीसी इन्फोकॅड प्रा.लि.चे महासंचालक समीर मेघे आणि एडीसीसी अकॅडमी प्रा.लि.चे महाव्यवस्थापक क्षितिज राज यांच्या हस्ते करण्यात आले. लवकरच या प्रवेश अर्जांचे वितरण शाळांमध्ये करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या सामान्य ज्ञानाचा स्तर उंचावण्याच्या उद्देशाने या दोन्ही स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. लोकमततर्फे ‘संस्काराचे मोती’ शिक्षण सामग्रीचे प्रकाशन १ जुलै ते ११ आॅक्टोबरदरम्यान करण्यात येईल. हा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्र आणि गोव्यात चालविण्यात येतो. यात पहिली ते दहावीपर्यंत शिकणारे विद्यार्थी भाग घेऊ शकतात. लोकमत समाचारतर्फे ‘बबलू, बबली की पाठशाला : ग्रीन किड्ज’चे संचालन नागपूर आवृत्तीत करण्यात येते. यावर्षी हा कार्यक्रम छिंदवाडा शहरातही होणार आहे. ‘बबलू, बबली की पाठशाला : ग्रीन किड्ज’चे साहित्य ७ जुलै ते १८ आॅक्टोबरपर्यंत प्रकाशित होईल. दोन्ही कार्यक्रमात दरवर्षी लाखो विद्यार्थी सहभाग नोंदवून ज्ञान मिळविण्यासोबतच अनेक पुरस्कारही जिंकतात. या कार्यक्रमात १०० दिवसापर्यंत पर्यावरण, ग्लोबल वार्मिंग, जलवायूतील बदलावर आधारित सामान्य ज्ञानाच्या साहित्याचे प्रकाशन करण्यात येते. प्रत्येक साहित्यासोबत एक छोटे कूपनही प्रकाशित करण्यात येते. हे कूपन प्रवेश अर्जात दिलेल्या ठिकाणी चिकटवायचे आहे. संपूर्ण अर्ज भरल्यानंतर या अर्जाला आपल्या शाळेत किंवा ठरवून दिलेल्या केंद्रात जमा करावे लागणार आहे. जमा झालेल्या कूपनांचा एक ड्रॉ काढून विद्यार्थ्यांना पुरस्कार देण्यात येईल. भाग्यशाली विजेत्यांमधून राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यातील एकाची निवड करून या विद्यार्थ्यांना विमान प्रवासाची संधी देण्यात येणार आहे. याशिवाय प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकाविणाऱ्या विद्यार्थ्यांना एक स्कूल बॅग, वॉटरबॅग आणि लंच बॉक्स देण्यात येईल. प्रत्येक विद्यार्थ्याला पुरस्कार देण्यात येणार आहे. हा कार्यक्रम सर्व विद्यार्थ्यांसाठी नि:शुल्क आहे. (प्रतिनिधी)