शहरं
Join us  
Trending Stories
1
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
2
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
3
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
4
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
5
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
6
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
7
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
8
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
9
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
10
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
11
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
12
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
13
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
14
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
15
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
16
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
17
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
18
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
19
लग्नाच्या जल्लोषात रक्तरंजित वळण; नाचण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाचा खून, चौघांविरोधात गुन्हा दाखल
20
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

दस्ताचा नोंदणी क्रमांक द्या, अन्‌ मिळवा बँकेकडून कर्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 05:50 IST

ब्लाॅकचेन तंत्र: ई-प्रमाण प्रणालीत ग्राहक व बँकांची फसवणूक टळणार

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : राज्यात पुढील सहा महिन्यांनंतर होणारे दस्त नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाच्या ई-प्रमाण या पोर्टलवर संरक्षित करण्यात येणार असून, बँकांना केवळ दस्त क्रमांकाच्या आधारे त्याची सत्यता पडताळणी करता येणार आहे. त्यामुळे प्रत्यक्ष बँकेत न जाता ग्राहकांना दस्त क्रमांकाच्या आधारे कर्ज मिळू शकणार आहे. यासह ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर करून या दस्ताबाबत सर्व कार्यवाहीची नोंद होणार आहे. त्यामुळे एकाच मालमत्तेवर दोन बँकांकडून कर्ज घेता येणार नाही. तसेच दस्ताबाबत होणाऱ्या सर्व कार्यवाहीचा इतिहास या तंत्रज्ञानातून ठेवला जाणार आहे. त्यातून संबंधित मालकाचीही फसवणूक टळणार आहे.  

नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने हा प्रायोगिक प्रयोग सातारा जिल्ह्यात राबविला असून, तो यशस्वी झाला आहे. त्यामुळे आता याची राज्यस्तरावर अंमलबजावणी होणार आहे. 

दस्त नोंदणी मुद्रांकच्या पोर्टलवर संरक्षित या पध्दतीने ऑफलाइन तसेच ऑनलाइन पद्धतीने नोंदविण्यात आलेले दस्त नोंदणी मुद्रांक शुल्क विभागाच्या पोर्टलवर संरक्षित करण्यात येतील. दस्त ब्लॉकचे चेन प्रणालीत टाकून या दस्तासंदर्भात पुढील सर्व कार्यवाहीची नोंद ठेवली जाणार आहे.  तयार करण्यात येणार असून, त्याची निविदा प्रक्रिया पुढील आठवड्यात सुरू होणार आहे. यासाठी सुमारे साडेसहा कोटींचा खर्च येणार आहे. 

दस्ताशी छेडछाड होत नाही बँकेने कर्ज दिल्यानंतर त्याची नोंद, मालकी हक्कात बदल झाल्यानंतर फेरफारद्वारे सातबारा उतारा व मालमत्ता पत्रकात होणारी नोंद तसेच काही कारणास्तव मालमत्ता वादग्रस्त झाल्यास बँकेकडून अथवा तपास यंत्रणांकडून मालमत्तेवर येणारी टाच याचीदेखील नोंद या ब्लॉकचेन तंत्रज्ञानात होणार आहे. दस्तामध्ये छेडछाड करण्याचा प्रयत्न केल्यास संबंधितांचीदेखील नोंद यात ठेवली जाणार आहे. त्यामुळे सदनिका अथवा जमीन मालकाची फसवणूक टळणार आहे. 

ही प्रणाली सातारा जिल्ह्यात यशस्वी झाल्यानंतर येत्या सहा महिन्यात त्याची अंमलबजावणी राज्यस्तरावर होणार आहे. आहे. दस्ताचा गैरवापरदेखील टळणार आहे.रवींद्र बिनवडे, नोंदणी महानिरीक्षक, पुणे.

English
हिंदी सारांश
Web Title : Get Loan from Bank with Document Registration Number: New System

Web Summary : Maharashtra introduces e-pramaan portal, enabling banks to verify document authenticity via registration number. Blockchain technology records all transactions, preventing fraud and single property multiple loans. A successful pilot in Satara paves the way for statewide implementation, enhancing transparency and security.
टॅग्स :bankबँक