शहरं
Join us  
Trending Stories
1
'चिकन नेक'चा ताबा केंद्राला देण्याचा सुवेंदु यांच्या सरकारचा निर्णय, ८ राज्यांना होणार फायदा
2
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम अन् नवे सेलिब्रेशन! ट्रॅविस हेडसह गिलख्रिस्टचा विक्रम मोडला (VIDEO)
3
AI कॅमेरे ठेवणार कॉपीबहाद्दरांवर थेट नजर! यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा निर्णय
4
उल्हासनगर मधील 'लेक व्ह्यू' इमारत पाडकामावेळी कोसळली, गेल्याच आठवड्यात केलेली रिकामी
5
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
6
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
7
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
8
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
9
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
10
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
11
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
12
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
13
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
14
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
15
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
16
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
17
पंत, संजू सॅमसन बाहेर; नवख्या प्रिन्स यादव, गुरनूर ब्रारला संधी! BCCIचे ५ आश्चर्यकारक निर्णय
18
DCM एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना; राजकीय घडामोडींना वेग, चर्चेला उधाण, नेमके घडतेय तरी काय?
19
भेदक गोलंदाजी, खालच्या फळीत जलद धावा करण्याची क्षमता; ६.५ फूट उंचीचा ऑलराउंडर टीम इंडियात!
20
"इंधन दर १७ रुपयांनी वाढले तरच...!", ब्रोकरेज फर्मनं मांडलं थक्क करणारं गणित; पेट्रोल-डिझेल आणखी भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

राजगृह निवासस्थानावर हल्ला करणाऱ्या मनोवृत्तीचा निषेध- बाळासाहेब थोरात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2020 14:25 IST

आमचे नेते आणि काँग्रेस पक्ष अशा दबावाला न जुमानता राष्ट्रहितासाठी आवाज उठवत राहतील, असंही बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं आहे.  ​​​​​​​

मुंबई – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबईतील राजगृह निवासस्थानी काही अज्ञातांनी तोडफोड केली. या घटनेबाबत सर्वच स्तरांतून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे. या प्रकरणाची राज्य शासनाकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे. आरोपींना तात्काळ अटक करण्यात येईल, असंही ठाकरे सरकारनं सांगितलं आहे. विशेष म्हणजे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनीसुद्धा या प्रकाराचा निषेध नोंदवला आहे.  काही समाजकंटकांनी राजगृहावर नासधूस केल्याची बातमी समजली. राजगृह हे लोकशाहीवर संविधानावर श्रद्धा असणा-यांचे प्रेरणास्थान आहे. महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृती या वास्तूशी जोडल्या गेलेल्या आहेत. हल्ला करणा-या मनोवृत्तीचा निषेध केला पाहिजे, या घटनेची चौकशी करून आरोपींना शोधून कठोर शासन केले पाहिजे, असंही बाळासाहेब थोरात म्हणाले आहेत. 

तसेच त्यांनी भाजपावरही टीकास्त्र सोडलं आहे. चीनची घुसखोरी, इंधन दरवाढ, कोरोना संकट हाताळण्यात अपयशी ठरलेल्या केंद्र सरकारला मा. सोनियाजी गांधी व राहुलजी गांधी यांनी प्रश्न विचारल्याने ईडीचा वापर करून सरकार विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे. आमचे नेते आणि काँग्रेस पक्ष अशा दबावाला न जुमानता राष्ट्रहितासाठी आवाज उठवत राहतील, असंही बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं आहे. 

मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास दोन माथेफिरूंनी हा प्रकार केलाय. यात त्यांनी घराबाहेरील CCTV चेही मोठे नुकसान केले आहे. घराच्या काचांवरही दगडफेक झाली आहे. यात घरातील कुंड्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यानंतर तात्काळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले. आंबेडकर कुटुंबीयांकडून घटनेचे CCTV फुटेज पोलिसांना देण्यात आले आहे. आरोपींचा तातडीने शोध घेऊन अटक करण्याची मागणी करण्यात येत आहे. राजगृह हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान आहे. बाबासाहेब आंबेडकर यांनी पुस्तकांसाठी हे घर बांधले होते. जगभरातील आंबेडकर अनुयायी येथे दररोज भेटीला येत असतात. इतकं महत्त्वाचे हे  स्थान आहे. आंबेडकर अनुयायांसाठी हे महत्त्वाचे ठिकाण आहे. 

हेही वाचा

एक शरद; सगळे गारद! पवारांनी सांगितला बाळासाहेब आणि उद्धव ठाकरेंच्या कार्यपद्धतीतील फरक

India China FaceOff : लेहमध्ये भारतानं अपाचे अन् T-90 टँक तैनात केल्यानं चीन भडकला, भारताला दिली धमकी

CoronaVirus: बापरे! कोरोनातून बरे झाल्यानंतरही पुन्हा संक्रमित होण्याची भीती, वैज्ञानिकांचा मोठा खुलासा

SBIचं कोट्यवधी ग्राहकांना मोठं गिफ्ट! 14व्यांदा घटवले व्याजदर, आता EMI होणार कमी

भारतीय अर्थव्यवस्थेच्या घसरणीवर रघुराम राजन म्हणतात...

CoronaVirus: धक्कादायक! कोरोनाच्या संसर्गानं आतापर्यंत २७ जवानांचा मृत्यू, ८७२ रेल्वे कर्मचारी संक्रमित

STFने आठ पोलिसांची हत्या करणाऱ्या विकास दुबेचा उजवा हात असलेल्या अमर दुबेला केले ठार

मुलांच्या उज्ज्वल 'भविष्या'साठी 'या' बँकेनं सुरू केले नवे खाते, मिळणार भरपूर फायदे

टॅग्स :Balasaheb Thoratबाळासाहेब थोरात