एक शरद; सगळे गारद! पवारांनी सांगितला बाळासाहेब आणि उद्धव ठाकरेंच्या कार्यपद्धतीतील फरक

By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2020 01:44 PM2020-07-08T13:44:27+5:302020-07-08T13:45:54+5:30

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची घेतलेली मुलाखत शनिवारपासून पाहायला मिळणार आहे.

Pawar explained the differences between the working methods of Balasaheb and Uddhav Thackeray | एक शरद; सगळे गारद! पवारांनी सांगितला बाळासाहेब आणि उद्धव ठाकरेंच्या कार्यपद्धतीतील फरक

एक शरद; सगळे गारद! पवारांनी सांगितला बाळासाहेब आणि उद्धव ठाकरेंच्या कार्यपद्धतीतील फरक

Next

मुंबई: शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी पवार यांची मुलाखत घेतली असून, या मुलाखतीत शरद पवार यांनी बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील फरक सांगितला आहे.  यांनी याबाबत भाष्य केलं आहे. राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणाऱ्या शरद पवार यांनी या मुलाखतीत अनेक विषयांवर परखड मत व्यक्त केलं आहे. देशातील लॉकडाऊनपासून ते राम मंदिराच्या विषयावरही पवारांनी दिलखुलास चर्चा केली आहे. देशाच्या राजकारणातील किस्से आणि अनुभव पवारांनी सांगितले आहेत. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची घेतलेली मुलाखत शनिवारपासून पाहायला मिळणार आहे. तीन भागांमधील या मुलाखतीचा टीझर संजय राऊत यांनी ट्विट केला आहे.

शरद पवार यांची मुलाखत देशाच्या राजकारणात खळबळ माजवेल, असा दावा राऊत यांनी केला आहे. त्यामुळे या मुलाखतीबद्दल अनेकांना उत्सुकता आहे. गेली ५५ वर्षे राजकारणात असलेल्या शरद पवार यांनी विरोधक म्हणून बाळासाहेब ठाकरे यांचं राजकारण जवळून पाहिलं आहे. बाळासाहेब पवारांवर टीका करत असत, तरीही पवारांनी मैत्रीत कधी खंड पडू दिला नाही. बाळासाहेब असताना शिवसेना-राष्ट्रवादी कधी एकत्र आलेली नव्हती, परंतु उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आहे. पवारांच्या पुढाकारानंच हे सरकार स्थापन झालं असून, उद्धव ठाकरेही पवारांशी सल्लामसलत करून सरकार चालवत आहे. त्याच पार्श्वभूमीवर शरद पवारांनी मुलाखतीत उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरेंमधला फरक सांगितला आहे. 

संजय राऊत यांनी आपल्या फेसबुक पेजवर या मुलाखती संदर्भातील व्हिडीओचा टीझर टाकला आहे. 'एक शरद, सगळे गारद!! महाराष्ट्रातील सत्ता बदल हा अपघात होता काय?' असा मथळा असलेला हा व्हिडिओ उत्कंठा वाढवणारा ठरला आहे. शरद पवारांची मुलाखत ऐतिहासिक ठरेल. अशी मुलाखत होणे नाही, असा दावा राऊत यांनी केला. 'शरद पवार यांची मुलाखत घेण्याचं आधीच ठरलं होतं. शरद पवार हे राज्यातील देशातील प्रमुख नेते आहेत. लोकांनी बघितलेले आणि मी पाहिलेले पवार वेगळे आहेत. त्यांच्याविषयी गैरसमज पसरवण्यात आले, बदनामीकारक विधानं केली गेली. जेव्हा पहाटेचा शपथविधी झाला, तेव्हा लोकांनी पवारांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं होतं. पण मी म्हटलं होतं की, शरद पवार सरकार स्थापन करतील. त्यांनी बसलेली खीळ तोडून सरकार स्थापन केलं,' असं राऊत यांनी म्हटलं होतं.

शरद पवार यांनी मुलाखतीत देशाबद्दलच्या विविध प्रश्नांना स्पर्श केला असल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी चीनसोबतच्या तणावाचा विशेष उल्लेख केला. सध्या चीनसोबतचे संबंध विकोपाला गेले आहेत. चिनी सैन्यासोबत झालेल्या झटापटीत आपले २० जवान शहीद झाले. ज्या भागात ही झटापट झाली, तिथे गोळी झाडता येत नाही. हा करार पवार संरक्षणमंत्री असताना झाला होता. अशा अनेक गोष्टींवर पवारांनी भाष्य केलं आहे. 

हेही वाचा

India China FaceOff : लेहमध्ये भारतानं अपाचे अन् T-90 टँक तैनात केल्यानं चीन भडकला, भारताला दिली धमकी

CoronaVirus: बापरे! कोरोनातून बरे झाल्यानंतरही पुन्हा संक्रमित होण्याची भीती, वैज्ञानिकांचा मोठा खुलासा

SBIचं कोट्यवधी ग्राहकांना मोठं गिफ्ट! 14व्यांदा घटवले व्याजदर, आता EMI होणार कमी

भारतीय अर्थव्यवस्थेच्या घसरणीवर रघुराम राजन म्हणतात...

CoronaVirus: धक्कादायक! कोरोनाच्या संसर्गानं आतापर्यंत २७ जवानांचा मृत्यू, ८७२ रेल्वे कर्मचारी संक्रमित

STFने आठ पोलिसांची हत्या करणाऱ्या विकास दुबेचा उजवा हात असलेल्या अमर दुबेला केले ठार

मुलांच्या उज्ज्वल 'भविष्या'साठी 'या' बँकेनं सुरू केले नवे खाते, मिळणार भरपूर फायदे

Read in English

Web Title: Pawar explained the differences between the working methods of Balasaheb and Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.