former rbi governor raghuram rajan says see little bit indian economy shaped recovery | भारतीय अर्थव्यवस्थेच्या घसरणीवर रघुराम राजन म्हणतात...

भारतीय अर्थव्यवस्थेच्या घसरणीवर रघुराम राजन म्हणतात...

नवी दिल्लीः कोरोनानं जगभरात थैमान घातलेलं असून, देशातील रुग्णसंख्याही वाढत आहे. अनेक देशांनी कोरोनाला थोपवण्यासाठी लॉकडाऊन केलं आहे. लॉकडाऊनमध्ये उद्योगधंदे बंद असल्यानं त्याचा अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम झाला आहे. देशात सुरू असलेल्या टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर CNBC टीव्ही18ने माजी गव्हर्नर रघुराम राजन यांच्याशी संवाद साधला आहे. रघुराम राजन म्हणाले, भारतीय अर्थव्यवस्थेत सुधारणा होण्याची चिन्हे दिसत आहेत. कोरोनाचा भारतीय अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाला असून, आर्थिक वाढीमध्येही मोठी घसरण झाली आहे.

परंतु भारतीय अर्थव्यवस्थेत आता सुधारणेचे चिन्हे दिसत आहेत. रघुराम राजन सध्या शिकागो बूथ स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये प्राध्यापक आहेत. रघुराम राजन आरबीआयचे माजी गव्हर्नर राहिल्यानं त्यांना आर्थिक बाबींची उत्तम जाण आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी(आयएमएफ)चे ते मुख्य अर्थशास्त्रज्ञ होते. त्यांनी 2008 मध्ये जागतिक आर्थिक संकटाविषयी भाकीत केले होते. 2003 ते 2006पर्यंत ते आयएमएफचे मुख्य अर्थशास्त्रज्ञ होते. त्यानंतर, त्यांची केंद्र सरकारकडून आर्थिक सल्लागार म्हणून नियुक्ती केली गेली. 2013मध्ये त्यांना आरबीआयचे गव्हर्नर बनविण्यात आले. सप्टेंबर २०१६पर्यंत त्यांनी हे पद सांभाळले.

कोरोनाच्या संकटानं प्रभावित झालेल्या अर्थव्यवस्थेला रुळावर आणण्यासाठी भारत सरकारने 20 लाख कोटी रुपयांचे पॅकेज दिले होते. त्यावरही रघुराम राजन यांनी टीका केली होती. ते म्हणाले होते की, परप्रांतीय मजुरांना पॅकेजअंतर्गत मोफत धान्य देण्यात आले आहे, परंतु टाळेबंदीमुळे मजूर बेरोजगार झाले आहेत. त्यांना दूध, भाज्या, खाद्यतेल खरेदी करण्यासाठी आणि भाडे भरण्यासाठी पैशांची गरज आहे. सीएनबीसीटीव्ही 18ला दिलेल्या विशेष मुलाखतीत रघुराम राजन म्हणाले की, सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या अमेरिकेची परिस्थितीही फारशी चांगली नाही. तेथे भीतीचे वातावरण आहे. विकसित अर्थव्यवस्थांच्या तुलनेत विकसनशील अर्थव्यवस्थांमध्ये कोरोनाचा डेट रेट खूपच कमी आहे. अशा परिस्थितीत भारताने संपूर्ण देशासाठी वैद्यकीय धोरण राबवण्याची गरज आहे.

हेही वाचा

CoronaVirus: धक्कादायक! कोरोनाच्या संसर्गानं आतापर्यंत २७ जवानांचा मृत्यू, ८७२ रेल्वे कर्मचारी संक्रमित

STFने आठ पोलिसांची हत्या करणाऱ्या विकास दुबेचा उजवा हात असलेल्या अमर दुबेला केले ठार

मुलांच्या उज्ज्वल 'भविष्या'साठी 'या' बँकेनं सुरू केले नवे खाते, मिळणार भरपूर फायदे

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: former rbi governor raghuram rajan says see little bit indian economy shaped recovery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.