शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघातादिवशीच विमान कंपनीला ९ कोटींचे बक्षीस; रोहित पवारांचे खळबळजनक आरोप
2
भारत लष्करी खर्चात जगात पाचवा ठरला! शेजारी पाकिस्तान जवळपासही कुठेच नाहीय..., चीन मात्र...
3
Top Marathi News LIVE Updates: "दादांच्या अंत्यविधीच्या दिवशी १६ कोटी दिले"; रोहित पवारांचा 'व्हीएसआर' कंपनीवरून सरकारवर हल्ला
4
Adhar Card : मोठा बदल! आता आधार कार्ड तुमचे वय सिद्ध करणार नाही, तुम्हाला जन्मतारखेचा पुरावा म्हणून 'ही' कागदपत्रे दाखवावी लागणार
5
कलमा वाचता येतो का? विचारले अन् सुरक्षा रक्षकांवर चालवला चाकू; मीरा रोडच्या हल्ल्यात 'लोन वुल्फ'चा संशय
6
Robert Kiyosaki Prediction: रॉबर्ट कियोसाकी यांची २०२६-२७ मध्ये मोठ्या आर्थिक संकटाची भविष्यवाणी; भारतीय गुंतवणूकदारांनी काय करावं?
7
तुमच्या छोट्याशा बाल्कनीला, खिडकीला द्या 'ग्रीन टच'; कमी जागेत बाग फुलवण्याच्या 'मास्टर ट्रिक'
8
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
9
हृदयद्रावक! IPL सामना पाहून घरी परतणाऱ्या २ भावांवर काळाचा घाला; 'हिट अँड रन'मध्ये मृत्यू
10
Mutual Fund Redemption Rules: काय आहे FIFO नियम आणि तो कसा वाचवतो तुमचा टॅक्स? जाणून घ्या डिटेल्स
11
बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने झाला 'त्या' चार जणांचा मृत्यू? पोस्टमार्टेम रिपोर्टमधून समोर आलं खरं कारण
12
एका दुखापतीने संपवलं करियर.. अवघ्या ३०व्या वर्षी क्रिकेटपटूला करावी लागली निवृत्तीची घोषणा
13
Chanakya Niti: समाजात राजासारखा मान हवा? चाणक्यनीतीतल्या 'या' ५ सवयी तुमचं आयुष्य बदलतील!
14
भारत-न्यूझीलंडमध्ये ऐतिहासिक 'मैत्री'! ५००० भारतीयांना थेट नोकरीची संधी, मोठे फायदे कोणते?
15
चिंताजनक! महाराष्ट्राला टीबीचा विळखा; राज्यात तब्बल ११ हजार गावांना हाय अलर्ट!
16
Gold-Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या दरात बदल; पटापट चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K आणि १८K Gold चे नवे दर
17
घरात मोबाइल नेटवर्क मिळणे झाले कठीण; इमारतींना ‘डिजिटल रेटिंग’ देण्याचा ‘ट्राय’चा निर्णय
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातने पीडितेला दिली दैवी शक्तीने मुलांना ठार मारण्याची धमकी
19
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
20
TCS मधील धर्मांतर प्रकरणात धक्कादायक खुलासा; पीडितेचं नाव बदललं, मलेशियासह मालेगाव कनेक्शन
Daily Top 2Weekly Top 5

मतपत्रिकांमध्ये गैरप्रकार झाल्यास प्राचार्य जबाबदार

By admin | Updated: May 15, 2015 01:25 IST

भारतीय केंद्रीय चिकित्सा परिषदेच्या (सीसीआयएम) निवडणुकीत व्यवस्थापनाद्वारा शिक्षकांच्या कोऱ्या मतपत्रिका घेण्याचा प्रकार ‘

अमरावती : भारतीय केंद्रीय चिकित्सा परिषदेच्या (सीसीआयएम) निवडणुकीत व्यवस्थापनाद्वारा शिक्षकांच्या कोऱ्या मतपत्रिका घेण्याचा प्रकार ‘लोकमत’ने उजेडात आणल्यानंतर गुरुवारी आयुष विभाग मुंबईचे संचालक तथा निवडणूक अधिकारी कुलदीप कोहली यांनी आयुष महाविद्यालयाच्या काही प्राचार्यांना याविषयी सूचना केल्या आहेत. तसेच याबाबत तक्रार आल्यास थेट फौजदारी दाखल करण्याचे स्पष्ट केले आहे. या आदेशांमुळे दिवसभर कोऱ्या टपाली मतपत्रिका जमा करण्याची प्रक्रिया थंड बस्त्यात होती. कुणीही उमेदवार अथवा पॅनेल प्रतिनिधी महाविद्यालयांकडे फिरकलेच नाहीत. ‘सीसीआयएम’च्या निवडणुकीत काही उमेदवार व खासगी व्यवस्थापनाद्वारा मतपत्रिका गोळा करण्याचा तसेच २ ते ३ हजारांत खरेदी करण्याचा प्रकार सररास सुरू असल्याचे वृत्त १३ मेच्या अंकात प्रसिद्ध होताच यात सहभागी लोकांचे धाबे दणाणले. निवडणूक अधिकाऱ्यांनीदेखील अनेक महाविद्यालयांच्या प्राचार्यांना याविषयी सूचना केल्या. मतपत्रिकेमध्ये गैरप्रकार आढळल्यास प्राचार्यांवर जबाबदारी निश्चित करण्यात येईल, असे डॉ. कुलदीप कोहली यांनी स्पष्ट केल्याने खळबळ उडाली आहे. (प्रतिनिधी)