शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
3
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
4
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
5
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
6
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
7
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
8
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
9
Opening Bell: अमेरिकन जॉब डेटाच्या आकडेवारीमुळे बाजारात तेजी; Bajaj Financeच्या शेअरमध्ये वाढ, पॉवर ग्रिड घसरला
10
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
11
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
12
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
13
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
14
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
15
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
16
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
17
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
18
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
19
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
20
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन

चक्रीवादळाच्या तडाख्यात सापडलेल्या कोकणाला विशेष आर्थिक पॅकेज द्या, प्रवीण दरेकर यांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 04, 2020 7:10 PM

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी आज रायगड जिल्ह्यातील निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. त्यांनी सकाळी जिल्हधिकारी कार्यालयात उपजिल्हाधिकारी पद्मश्री बैनाडे यांच्यासमवेत शासकीय अधिकार्‍यांची बैठक घेतली व चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला.

अलिबाग - निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे अलिबाग तसेच रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात शेतीमाल व घरांचे प्रचंड नुकसान झाले आहे. कोरोनामुळे आधीच शेतकर्‍यांचे आर्थिक नुकसान झाले होते. आता चक्रीवादळामुळे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे कोकणातील शेतकर्‍यांना नुकसान भरपाई देताना  नैसर्गिक आपत्तीचे पारंपारिक नियम डावलून कोकणासाठी विशेष वेगळे पॅकेज देण्याची आग्रही मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी आज केली. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी आज रायगड जिल्ह्यातील निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. त्यांनी सकाळी जिल्हधिकारी कार्यालयात उपजिल्हाधिकारी पद्मश्री बैनाडे यांच्यासमवेत शासकीय अधिकार्‍यांची बैठक घेतली व चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला. त्‍यानंतर दरेकर नुकसानग्रस्‍त भागाला भेट देवून पाहणी केली.जिल्ह्यात चक्रीवादळामुळे नुकसानग्रस्त झालेल्या जागा, शेती, घरे, बागा आदींचे नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम शासकीय स्तरावर लवकारात लवकर पूर्ण करून शासनाला अहवाल सादर करावा व तातडीने शेतकर्‍यांपर्यंत मदत पोहचविण्याची मागणी विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केली. त्यानंतर विरोधी पक्ष नेते दरेकर यांनी चक्रीवादळाच्या तडाख्यात उमटे गावामधील मृत्युमुखी पडलेल्या दशरथ वाघमारे यांच्‍या कुटुंबियांची भेट घेवून त्यांचे सांत्‍वन केले व त्यांची विचारपूस केली. कालच्या चक्रीवादळाच्या तडाख्यात झाडांची पडझड झाली असून इमारती तसेच घरांचे छप्पर उडाले आहेत. दरेकर यांनी त्या नुकसानग्रस्त ठिकाणांची पाहणी केली. तेथे मदतकार्य करत असलेल्या एनडीआरएफच्या टीमची भेट घेतली, त्यांच्याकडून सुरु असलेल्या मदतकार्याचा आढावा घेतला. 

चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या चेऊल या गावालाही विरोधी पक्ष नेते दरेकर यांनी भेट दिली. चक्रीवादळामुळे शेती तसेच सुपारी व नाराळाच्या बागांचे मोठे नुकसान झाले असून त्याठिकाणी जाऊन तेथील स्थितीचा आढावा घेतला. त्यांच्या सोबत आमदार प्रशांत ठाकूर, आमदार रमेश पाटील, भाजपचे रायगडचे जिल्हाध्यक्ष अँड. महेश मोहिते, भाजपचे तालुकाध्यक्ष परशुराम म्हात्रे याप्रसंगी त्यांच्यासमवेत उपस्थित होते

टॅग्स :Praveen Darekarप्रवीण दरेकरkonkanकोकण