शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघातादिवशीच विमान कंपनीला ९ कोटींचे बक्षीस; रोहित पवारांचे खळबळजनक आरोप
2
भारत लष्करी खर्चात जगात पाचवा ठरला! शेजारी पाकिस्तान जवळपासही कुठेच नाहीय..., चीन मात्र...
3
Top Marathi News LIVE Updates: "दादांच्या अंत्यविधीच्या दिवशी १६ कोटी दिले"; रोहित पवारांचा 'व्हीएसआर' कंपनीवरून सरकारवर हल्ला
4
Adhar Card : मोठा बदल! आता आधार कार्ड तुमचे वय सिद्ध करणार नाही, तुम्हाला जन्मतारखेचा पुरावा म्हणून 'ही' कागदपत्रे दाखवावी लागणार
5
कलमा वाचता येतो का? विचारले अन् सुरक्षा रक्षकांवर चालवला चाकू; मीरा रोडच्या हल्ल्यात 'लोन वुल्फ'चा संशय
6
Robert Kiyosaki Prediction: रॉबर्ट कियोसाकी यांची २०२६-२७ मध्ये मोठ्या आर्थिक संकटाची भविष्यवाणी; भारतीय गुंतवणूकदारांनी काय करावं?
7
तुमच्या छोट्याशा बाल्कनीला, खिडकीला द्या 'ग्रीन टच'; कमी जागेत बाग फुलवण्याच्या 'मास्टर ट्रिक'
8
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
9
हृदयद्रावक! IPL सामना पाहून घरी परतणाऱ्या २ भावांवर काळाचा घाला; 'हिट अँड रन'मध्ये मृत्यू
10
Mutual Fund Redemption Rules: काय आहे FIFO नियम आणि तो कसा वाचवतो तुमचा टॅक्स? जाणून घ्या डिटेल्स
11
बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने झाला 'त्या' चार जणांचा मृत्यू? पोस्टमार्टेम रिपोर्टमधून समोर आलं खरं कारण
12
एका दुखापतीने संपवलं करियर.. अवघ्या ३०व्या वर्षी क्रिकेटपटूला करावी लागली निवृत्तीची घोषणा
13
Chanakya Niti: समाजात राजासारखा मान हवा? चाणक्यनीतीतल्या 'या' ५ सवयी तुमचं आयुष्य बदलतील!
14
भारत-न्यूझीलंडमध्ये ऐतिहासिक 'मैत्री'! ५००० भारतीयांना थेट नोकरीची संधी, मोठे फायदे कोणते?
15
चिंताजनक! महाराष्ट्राला टीबीचा विळखा; राज्यात तब्बल ११ हजार गावांना हाय अलर्ट!
16
Gold-Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या दरात बदल; पटापट चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K आणि १८K Gold चे नवे दर
17
घरात मोबाइल नेटवर्क मिळणे झाले कठीण; इमारतींना ‘डिजिटल रेटिंग’ देण्याचा ‘ट्राय’चा निर्णय
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातने पीडितेला दिली दैवी शक्तीने मुलांना ठार मारण्याची धमकी
19
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
20
TCS मधील धर्मांतर प्रकरणात धक्कादायक खुलासा; पीडितेचं नाव बदललं, मलेशियासह मालेगाव कनेक्शन
Daily Top 2Weekly Top 5

पवारांच्या आयटी रिटर्नसाठी याचिका

By admin | Updated: April 8, 2015 01:53 IST

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आयटी रिटर्नची माहिती देण्यास आयकर विभागाने व माहिती अधिकार आयुक्तांनी नकार

मुंबई : माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आयटी रिटर्नची माहिती देण्यास आयकर विभागाने व माहिती अधिकार आयुक्तांनी नकार दिल्याने शैलेश गांधी यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.पवार यांनी निवडणूक लढवताना निवडणूक आयोगाकडे प्रतिज्ञापत्रावर दिलेला उत्पन्नाचा तपशील व त्यांचे आयटी रिटर्न याचा ताळमेळ बसतो की नाही? हे तपासण्यासाठी गांधी यांनी ही माहिती मागितली आहे. आयकर विभाग व माहिती आयुक्तांनी ही माहिती नाकारल्याने आता न्यायालय याबाबत काय आदेश देणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.गांधी यांनी यासाठी नोव्हेंबर २०१२मध्ये आयकर विभागाकडे अर्ज केला होता. त्यांनी अर्जात पवार यांच्या त्याआधीच्या तीन वर्षांच्या आयटी रिटर्नचा तपशील माहितीच्या अधिकाराखाली मागितला होता. त्या वेळी आयकर विभागाने पवार यांना नोटीस जारी करून याचे प्रत्युत्तर देण्यास सांगितले. पवार यांनी ही माहिती खासगी असल्याने ती देऊ नये, असे आयकर विभागाला कळवले. त्यानुसार आयकर विभागाने ही माहिती देण्यास नकार दिला.त्यानंतर गांधी यांनी यासाठी अपील दाखल केले. त्यात त्यांनी ही माहिती जनहितार्थ हवी असल्याचा मुद्दा उपस्थित केला. मात्र या माहितीत जनहितार्थ काही नसल्याचे कारण देत अपील विभागाने ही माहिती नाकारली. त्याला गांधी यांनी माहिती आयुक्तांकडे आव्हान दिले. त्या वेळीही पवार यांनी ही माहिती खासगी असल्याने देऊ नये, असे कारण पुढे केले. त्यानुसार आयुक्तांनीदेखील गांधी यांना ही माहिती नाकारली.अखेर गांधी यांनी यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. न्या. आर. एम. सावंत यांच्यासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. खासदार व आमदार, संसद तसेच विधान परिषदेसमोर उत्पन्नाचा तपशील ठेवू शकतात. त्यामुळे त्यांनी माहिती अधिकारात त्यांचे आयटी रिटर्न उपलब्ध करण्यात काहीच हरकत नाही. (प्रतिनिधी)