"पार्थ पवारना क्लिनचीट मिळालेलीच नाही, चौकशी अजून सुरू!"; अंजली दमानियांचा खळबळजनक दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2026 18:41 IST2026-02-05T18:39:36+5:302026-02-05T18:41:14+5:30

Parth Pawar Pune Land Scam case : पार्थ पवार यांना क्लिनचीट मिळाल्याच्या बातम्या खोट्या आहेत का? अंजली दमानिया यांनी पुराव्यासह काय स्पष्टीकरण दिले? वाचा सविस्तर बातमी.

"Parth Pawar has not been given a clean chit, the investigation is still ongoing!"; Anjali Damania's big claim | "पार्थ पवारना क्लिनचीट मिळालेलीच नाही, चौकशी अजून सुरू!"; अंजली दमानियांचा खळबळजनक दावा

"पार्थ पवारना क्लिनचीट मिळालेलीच नाही, चौकशी अजून सुरू!"; अंजली दमानियांचा खळबळजनक दावा

मुंबई: पार्थ पवार यांना पुण्यातील जमीन घोटाळ्यात क्लिनचीट मिळाल्याच्या बातम्या माध्यमांमध्ये झळकल्या आहेत. यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या दाव्यांचे जोरदार खंडन केले आहे. "पार्थ पवारना कोणतीही क्लिनचीट मिळालेली नाही, उलट त्यांची चौकशी अजूनही सुरूच आहे," असे स्पष्ट करत दमानिया यांनी या प्रकरणाला पुन्हा एकदा वाचा फोडली आहे.

दमानिया यांनी प्रश्न उपस्थित केला आहे की, "हा अहवाल माध्यमांपर्यंत पोहोचलाच कसा? कारण अहवाल अद्याप पूर्ण झालेला नाही आणि तो रिलीजही झालेला नाही. या संदर्भातील शेवटची बैठक अद्याप होणे बाकी आहे." दमानिया यांनी पुराव्यादाखल काही कागदपत्रांच्या प्रिंट आऊट सादर केल्या आहेत. शीतल तेजवानी आणि पार्थ पवार यांच्यात झालेल्या करारावर पार्थ पवार यांचे नाव, सही आणि शिक्का असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

FIR मधील नाव
पार्थ पवार यांचे एफआयआरमध्ये नाव नव्हते, म्हणून चार्जशीटमध्ये नाव येणे शक्य नव्हते, याचा अर्थ क्लिनचीट असा होत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

खारगे समितीला इशारा
"खारगे समिती पार्थ पवारला या प्रकरणातून बाहेर काढू शकत नाही. जर तसा प्रयत्न झाला, तर मी समितीला धारेवर धरीन," असा इशाराही दमानिया यांनी दिला आहे. कोणत्याही परिस्थितीत पार्थ पवार या घोटाळ्यातून बाहेर येऊ शकत नाहीत, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला असून, प्रसंगी उच्च न्यायालयात धाव घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Web Title : अंजलि दमानिया का दावा, पार्थ पवार को क्लीन चिट नहीं, जांच जारी!

Web Summary : सामाजिक कार्यकर्ता अंजलि दमानिया ने पुणे भूमि घोटाले में पार्थ पवार को क्लीन चिट मिलने के दावों का खंडन किया। उन्होंने कहा कि जांच जारी है, सवाल उठाया कि अप्रकाशित रिपोर्ट मीडिया तक कैसे पहुंची और पवार को बरी करने के किसी भी प्रयास को चुनौती देने की धमकी दी।

Web Title : Anjali Damania claims Parth Pawar hasn't received clean chit; probe ongoing!

Web Summary : Social activist Anjali Damania refuted claims of a clean chit for Parth Pawar in a Pune land scam. She asserted the investigation is ongoing, questioning how the unreleased report reached the media and threatening to challenge any attempts to exonerate Pawar.