शहरं
Join us  
Trending Stories
1
इंधन बचतीसाठी मुख्यमंत्री फडणवीस 'ॲक्शन मोड'मध्ये! परदेश दौरे, ताफा कमी करण्यासह मोठे निर्णय होणार...
2
Top Marathi News Live: शरद पवारांची भेट घेतल्याने राजकारणात चर्चांचे वादळ; सुनील तटकरेंनी मांडली भूमिका
3
होर्मुझ'मधून गॅस पुरवठा ठप्प, भारताचा 'प्लॅन बी' तयार! पाहा कशी केली जाते भरपाई
4
IPL 2026: "पहिल्या चेंडूपासूनच..." RCB विरुद्धच्या सामन्याआधी शेन वॉटसनचा KKR च्या खेळाडूंना कानमंत्र!
5
NEET Exam Paper Leak : NEET पेपर लीकमध्ये मोठा खुलासा! २ भावांनी डॉक्टरकडून ३० लाखांत खरेदी केला पेपर अन्...
6
मुलावर एकाधिकार दाखवण्याच्या आईच्या वृत्तीवर उच्च न्यायालयाची चिंता; वडिलांना मुलाला भेटण्याचा अधिकार ठेवला कायम 
7
Prateek Yadav : शाळेत मैत्री, ई-मेलवर प्रेम अन् १० वर्षांचा रोमान्स! अशी होती प्रतीक आणि अपर्णा यादव यांची लव्ह स्टोरी
8
४ दिवसांत ६०० रुपयांपेक्षा अधिकनं आपटला 'टाटा'चा हा शेअर; रेखा झुनझुनवालांचे २८०० कोटी बुडाले
9
‘हातावर चुंबन घेणे ही...’; टॅक्सीचालकाला न्यायालयाने सुनावली दोन वर्षे कारावासाची शिक्षा
10
Central Railway: आसनक्षमता ७२, प्रवाशांची संख्या ४००; ‘टीसी’वर ताण; टार्गेट आणि वाढत्या हल्ल्यांमुळे रेल्वे कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात
11
Sonia Gandhi: काँग्रेस नेत्या सोनिया गांधी गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात दाखल, नेमकं कारण काय?
12
अधिक मास २०२६: संकल्पपूर्तीसाठी अधिक मासात गुरुचरित्राचे 'हे' निवडक अध्याय वाचणेदेखील ठरेल प्रभावी!
13
सिद्धार्थ जाधवच्या पत्नीला पाहिलंत का? बिजनेसवुमन आहे तृप्ती, करते 'हे' काम
14
Prateek Yadav : "कौटुंबिक वादानंतर डिप्रेशन…"; १३ वर्षे सोबत असलेल्या प्रतीक यादव यांच्या मित्राचा गौप्यस्फोट
15
राजकारणापासून दूर..; प्रतीक यादव काय काम करायचे? किती होती त्यांची संपत्ती? जाणून घ्या...
16
किती लाजिरवाणं आहे! 'कान्स'च्या रेड कार्पेटवर आलिया भटकडे फोटोग्राफर्सचं दुर्लक्ष? व्हिडीओ व्हायरल
17
ट्रम्प यांचा चीनला मोठा इशारा! जिनपिंगना भेटण्यापूर्वीच इराणबाबत ठणकावून सांगितलं; काय म्हणाले?
18
Pune Nasrapur Case : सीसीटीव्ही, ‘शेव’ आणि टणक वस्तू...; नसरापूर प्रकरणात आणखी कोण सामील ?
19
ट्रम्प यांची टीका फोल! इराणची तटबंदी अधिक मजबूत; ३० क्षेपणास्त्र तळ अजूनही 'ॲक्टिव्ह'
20
ब्रिटिश पंतप्रधान कीर स्टार्मर यांचे पद धोक्यात; गंभीर आरोप करत ८० मंत्र्यांनी फडकावले बंडाचे निशाण
Daily Top 2Weekly Top 5

परराज्यातील मुलांना एमबीबीएसला प्रवेश घेण्याची मुभा द्या, पालघरच्या कॉलेजने घेतली उच्च न्यायालयात धाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2025 10:00 IST

MBBS Admission News: कॉलेजमधील जागा कॅप फेऱ्यांमध्ये रिक्त राहत असल्याने पुढील फेऱ्यांमध्ये परराज्यांतील विद्यार्थ्यांना राज्य कोट्यातील जागांवर प्रवेशासाठी मुभा द्यावी, अशी मागणी घेऊन पालघरमधील वेदान्ता इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स कॉलेजने उच्च न्यायालयात धाव घेतली.

- अमर शैला
मुंबई -  एकीकडे खासगी मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएसच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्याकडे लाखो रुपयांची मागणी केल्याने विद्यार्थी प्रवेशापासून वंचित असल्याचे प्रकरण ताजे आहे. त्यातच कॉलेजमधील जागा कॅप फेऱ्यांमध्ये रिक्त राहत असल्याने पुढील फेऱ्यांमध्ये परराज्यांतील विद्यार्थ्यांना राज्य कोट्यातील जागांवर प्रवेशासाठी मुभा द्यावी, अशी मागणी घेऊन पालघरमधील वेदान्ता इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स कॉलेजने उच्च न्यायालयात धाव घेतली. संस्थेच्या जागा रिक्त राहिल्यास या जागांचा शुल्क परतावा सरकारने द्यावा, अशीही मागणीही केली आहे. 

एमबीबीएस प्रवेशावेळी खासगी कॉलेजांमध्ये लाखो रुपये मागितले जात असल्याच्या तक्रारी दरवर्षी होत असतात. त्यातून विद्यार्थी न्यायालयाचे दरवाजेही ठोठावतात. त्यातच खासगी वैद्यकीय कॉलेजांकडून जागा रिक्त राहत असल्याचा दावा आहे. वेदान्ता इन्स्टिट्यूट या कॉलेजने तिसऱ्या फेरीअखेर १५० मंजूर जागांपैकी ७० ते ८० जागा रिक्त राहणार असल्याचा दावा केला. परिणामी कॅपनंतरच्या पुढील फेऱ्यांचे प्रवेश संस्थास्तरावर करण्यास मुभा देण्याची मागणी केली आहे. 

याबाबत विद्यार्थी न्यायालयात 'कॅव्हेट' दाखल करण्याचा विचार करत आहेत. 'विद्यार्थ्यांना जागा मिळूनही काही कॉलेजांनी त्यांना कॉलेजमध्ये येण्याची परवानगी दिली नाही. त्यामुळे जागा रिक्त आहेत. मेरीटमधील जागांमध्ये स्वारस्य आहे. संस्थात्मक कोट्याच्या जागा कॉलेज त्यांच्या स्वतःच्या स्तरावर भरू शकते, असे पालक प्रतिनिधी सुधा शेणॉय यांनी सांगितले. 

रिक्त जागा संस्थात्मक स्तरावर भरण्याची मुभा नाही
राज्यात खासगी विनाअनुदानित मेडिकल कॉलेजांमध्ये ८५ टक्के जागांवर राज्याचे अधिवास प्रमाणपत्र असलेल्या विद्यार्थ्यांना राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत (सीईटी सेल) राबविण्यात येणाऱ्या प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेश दिले जातात. एमबीबीएस अभ्यासक्रमाची नुकतीच तिसरी फेरी पार पडली आहे. आता या पुढील प्रवेश प्रक्रिया सीईटी सेलमार्फत कॅप स्ट्रे फेऱ्यांच्या माध्यमातून राबविली जाणार आहे. तसेच सीईटी सेलने यंदा जारी केलेल्या माहिती पुस्तिकेनुसार एनएमसीच्या निर्देशानुसार स्ट्रे फेरीनंतरही रिक्त राहणाऱ्या जागा संस्थात्मक स्तरावर भरण्याची मुभा दिली नाही, असे म्हटले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Palghar college seeks nod for out-of-state MBBS admissions in High Court.

Web Summary : Vedanta Institute seeks court permission to admit non-state students due to vacant MBBS seats after rounds. College demands fee reimbursement for unfilled seats, facing student opposition citing merit violations and colleges denying admission despite seat allocation.
टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रMedicalवैद्यकीयHigh Courtउच्च न्यायालय