शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: पुण्यात थरारक फायरिंग; टोळी युद्धातून आणखी एकाचा खून, वनराज आंदेकर खून प्रकरणाशी दुवा
2
Hormuz Strait Crisis : तेलाची किंमत ११० डॉलरच्या पार, जगभरात घबराट! इराणने सहमती दर्शवली नाही, तर नाटो होर्मुझमध्ये प्रवेश करणार
3
Top Marathi News LIVE Updates: १५ लाखांपेक्षा जास्त मेडिकल दुकानांना कुलूप! औषध विक्रेत्यांचा देशव्यापी संप 
4
मनोज जरांगेंकडून प्रसाद लाड यांना चर्चेचं निमंत्रण; गावागावांतील बैठका २३ तारखेपर्यंत स्थगित, दिला 'हा' इशारा
5
Giorgia Meloni: बारटेंडर ते देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान; जाणून घ्या इटलीच्या PM जॉर्जिया मेलोनी यांची न ऐकलेली कहाणी
6
Twisha Sharma : 'लिगेचर रिपोर्ट' समोर आल्याने मृत्यूचे कारण स्पष्ट; पण संशयाची सुई अजूनही सासरच्यांवर!
7
अधिक मास २०२६: गुरुपुष्यामृताचा सुवर्ण योग, भाग्योदयाचा शुभ काळ; ५ कामे करा, अमृत पुण्य लाभ!
8
'Welcome to Rome, my friend' म्हणत पंतप्रधान मेलोनींनी केले स्वागत, PM मोदींनीही शेअर केले रोममधील भेटीचे फोटो
9
राज्यभरात इंधन टंचाई! बऱ्याच पेट्रोल पंपांवर पेट्रोल, डिझेल संपलेले; ट्रॅक्टर थांबले, डिझेलसाठी शेतकरी रांगेत  
10
"...तर मीदेखील मेलो असतो", 'नटसम्राट'बद्दल नाना पाटेकरांनी केलेल्या वक्तव्याने उंचावल्या भुवया, म्हणाले...
11
नीट पेपरफुटीचा भांडाफोड कसा झाला? या शिक्षकाच्या लक्षात आले नसते तर...
12
गोव्यात कमी किमतीत पेट्रोल विसरा, दराने ओलांडली शंभरी; डिझेल ९० पैशांनी महाग, ताजे रेट पाहा
13
गश्मीर महाजनी 'देऊळ बंद २'मध्ये दिसणार? मोहन जोशींना म्हणाला, "स्वामींनी आदेश दिलाय तर..."
14
Vastu Shastra: बाथरूममध्ये बादली रिकामी ठेवताय? घरात दारिद्र्य आणणाऱ्या 'या' ३ चुका आजच सुधारा
15
कागोशिमा भूकंपाने जपान पुन्हा हादरले; ५.९ रिश्टर स्केल तीव्रतेचे हादरे, प्रशासनाने जारी केला महत्त्वाचा अलर्ट!
16
मृत्यू कलिंगडामुळे नाही तर...; ४ जणांच्या मृत्यू प्रकरणात पोलिसांच्या हाती लागला खळबळजनक माहिती
17
Deepika Nagar :"रात्री साडेबाराला मोठा आवाज झाला अन्..." शेजाऱ्याने उघड केली 'त्या' रात्रीची संपूर्ण कहाणी!
18
PM Modi Donald Trump: भारताचे पंतप्रधान आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पुढच्या महिन्यात भेटणार; कोणत्या देशामध्ये होणार भेट?
19
"शुक्रवार, शनिवार किंवा रविवार..." इराणवर पुन्हा होणार मोठा हल्ला; डोनाल्ड ट्रम्प यांनी केले जाहीर
20
BRICS Summit 2026: तब्बल ७ वर्षांनंतर शी जिनपिंग भारतात येणार! दिल्लीतील ब्रिक्स परिषदेला पुतिन यांचीही उपस्थिती असणार
Daily Top 2Weekly Top 5

जनतेला हवेत ‘हमारे दिन’; फसवेगिरी संपणार- छगन भुजबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2018 03:14 IST

सध्याच्या अकल्याणकारी सरकारची उलटी गिनती आता सुरू झाली आहे, असा दावा माजी उपमुख्यमंत्री व समता परिषदेचे संस्थापक छगन भुजबळ यांनी केला.

पुणे : पाच राज्यांतील विधानसभांचे निकाल हेच सांगत आहेत, की जनतेला अच्छे दिनची फसवेगिरी नको आहे, तर हमारे दिन पाहिजे आहेत. सध्याच्या अकल्याणकारी सरकारची उलटी गिनती आता सुरू झाली आहे, असा दावा माजी उपमुख्यमंत्री व समता परिषदेचे संस्थापक छगन भुजबळ यांनी केला.

एका कार्यक्रमासाठी म्हणून पुण्यात आलेल्या भुजबळ यांनी पत्रकारांशी संवाद साधला. माजी केंद्रीय मंत्री, राष्ट्रीय लोकसमता पक्षाचे नेते उपेंद्र कुशवाह, माजी महापौर अंकुश काकडे त्यांच्यासमवेत होते. भुजबळ म्हणाले, ‘‘हे सरकार सत्तेवर आले व देशाचे अकल्याणच सुरू झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संसदेत बोलण्यासाठी वेळ नाही. अनेक आरोप होऊनही ते त्याचे निराकरण करण्यासाठी तयार नाहीत. त्यांचे सरकार आले विकासाच्या मुद्द्यावर; पण साडेचार वर्षांत काहीच केले नाही व आता राममंदिराच्या मुद्द्यावर देशात धार्मिक, जातीय ध्रुवीकरण करत आहेत. जनतेने त्यांना ५ राज्यांमधून मतपेटीद्वारे उत्तर दिले आहे. लोकसभेच्या येत्या निवडणुकीतही जनता त्यांना उभे करणार नाही.’’

तिसऱ्या आघाडीबाबत बोलताना भुजबळ म्हणाले, की भाजपातून तसेच त्यांच्या आघाडीतून आता अनेकजण बाहेर पडत आहेत. राष्ट्रवादीमधून तिथे गेलेल्यांना आता परतीची ओढ लागली आहे, असे भुजबळ म्हणाले. त्यांना पुन्हा पक्षात घेणार का, यावर त्यांनी याबाबतचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील, असे सांगितले. पक्षाने आदेश दिला की कोणतीही निवडणूक लढवण्यास आपण तयार आहोत, असे ते म्हणाले.

टॅग्स :Assembly Election 2018 Resultsविधानसभा निवडणूक 2018 निकालChagan Bhujbalछगन भुजबळcongressकाँग्रेसBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीChhattisgarhछत्तीसगडMadhya Pradeshमध्य प्रदेशRajasthanराजस्थान