शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
4
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
5
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
6
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
7
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
8
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
9
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
10
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
11
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
12
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
13
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
14
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
15
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
16
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
17
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
18
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
19
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
20
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेच्या नुसत्या घोषणाच

By admin | Updated: February 25, 2015 01:42 IST

मध्य रेल्वे अंतर्गत येणाऱ्या सोलापूर विभागाचे कार्यक्षेत्र ९६० कि.मी. इतके असून, होटगी, कुर्डूवाडी, दौंड अशी तीन मोठे जंक्शन आहेत.

सोलापूर : मध्य रेल्वे अंतर्गत येणा-या सोलापूर विभागाचे कार्यक्षेत्र ९६० कि.मी. इतके असून, होटगी, कुर्डूवाडी, दौंड अशी तीन मोठे जंक्शन आहेत. असे असतानाही कुर्डूवाडी रेल्वे कारखाना, सहा वर्षांपूर्वी घोषणा झालेला पंढरपूर-लोणंद रेल्वेमार्ग आणि २०१२-१३ रेल्वे अर्थसंकल्पात घोषणा झालेला पंढरपूर-विजापूर रेल्वेमार्ग आदी घोषणा कागदावरच राहिल्या आहेत. यासाठी निधीची तरतूद न केल्याने सोलापूरची रेल्वे धक्कागाडी बनली आहे.कुर्डूवाडी (ता. माढा) येथील रेल्वे कारखाना १९३२ सालापासून सुरू आहे. नॅरोगेज रेल्वे असताना या कारखान्यात डबे बनविण्यात येत असत. नॅरोगेजचे ब्रॉडगेज झाल्यानंतर या कारखान्याचे रूपांतर ब्रॉडगेज डबे बनविण्यासाठी होणे अपेक्षित होते. मात्र तसे काही झाले नाही. दिल्लीच्या रेल्वे बोर्डने या कारखान्याकडे गरजांची विचारणा केली ती २००६ साली. तेव्हा कारखाना प्रशासनाने १०० कोटींची गरज असल्याचे सांगितले. याला वित्त आयोगाने मंजुरीही दिली. मात्र अद्यापपर्यंत निधी उपलब्ध न झाल्याने या कारखान्याचे काम बंदच आहे. विशेष म्हणजे हे ठिकाण लातूर-मिरज, हैदराबादसाठी मध्यवर्ती आहे. ४५ वर्षांपूर्वी पंढरपूर-लोणंद मार्गासाठी भू-संपादन करण्यात आले. मात्र भू-संपादन केलेल्या शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला मिळाला नाही. सहा वर्षांपूर्वी या मार्गाची घोषणा झाली. मात्र प्रत्यक्षात कामाला सुरुवात न झाल्याने हा मार्ग प्रतीक्षेतच आहे. पंढरपूर-लोणंद मार्ग झाल्यास या भागात असणाऱ्या सहा साखर कारखान्यांना साखर वाहतूक, कच्चा माल, फळे, भाजीपाला निर्यातीला चालना मिळणार आहे. २०१२-१३च्या रेल्वे बजेटमध्ये पंढरपूर-विजापूर मार्गाची घोषणा झाली. मात्र यासाठी २०१३च्या बजेटमध्ये काहीच तरतूद झाली नाही. यामुळे हा मार्गही पुढील घोषणा व तरतुदीच्या प्रतीक्षेत आहे. प्रत्येक वर्षी अन्य विभागांना नवीन गाड्यांची तरतूद करण्यात येते. मात्र सोलापूरसाठी हात कायमचा आखडता घेतला आहे. बाळे मालधक्क्यासाठी असलेला निधी कलबुर्गीकडे पळविल्याने सध्या हा मालधक्का उघड्यावरच आहे. पावसाळ्यात माल भिजून मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.