शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघातादिवशीच विमान कंपनीला ९ कोटींचे बक्षीस; रोहित पवारांचे खळबळजनक आरोप
2
भारत लष्करी खर्चात जगात पाचवा ठरला! शेजारी पाकिस्तान जवळपासही कुठेच नाहीय..., चीन मात्र...
3
Top Marathi News LIVE Updates: "दादांच्या अंत्यविधीच्या दिवशी १६ कोटी दिले"; रोहित पवारांचा 'व्हीएसआर' कंपनीवरून सरकारवर हल्ला
4
Adhar Card : मोठा बदल! आता आधार कार्ड तुमचे वय सिद्ध करणार नाही, तुम्हाला जन्मतारखेचा पुरावा म्हणून 'ही' कागदपत्रे दाखवावी लागणार
5
कलमा वाचता येतो का? विचारले अन् सुरक्षा रक्षकांवर चालवला चाकू; मीरा रोडच्या हल्ल्यात 'लोन वुल्फ'चा संशय
6
Robert Kiyosaki Prediction: रॉबर्ट कियोसाकी यांची २०२६-२७ मध्ये मोठ्या आर्थिक संकटाची भविष्यवाणी; भारतीय गुंतवणूकदारांनी काय करावं?
7
तुमच्या छोट्याशा बाल्कनीला, खिडकीला द्या 'ग्रीन टच'; कमी जागेत बाग फुलवण्याच्या 'मास्टर ट्रिक'
8
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
9
हृदयद्रावक! IPL सामना पाहून घरी परतणाऱ्या २ भावांवर काळाचा घाला; 'हिट अँड रन'मध्ये मृत्यू
10
Mutual Fund Redemption Rules: काय आहे FIFO नियम आणि तो कसा वाचवतो तुमचा टॅक्स? जाणून घ्या डिटेल्स
11
बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने झाला 'त्या' चार जणांचा मृत्यू? पोस्टमार्टेम रिपोर्टमधून समोर आलं खरं कारण
12
एका दुखापतीने संपवलं करियर.. अवघ्या ३०व्या वर्षी क्रिकेटपटूला करावी लागली निवृत्तीची घोषणा
13
Chanakya Niti: समाजात राजासारखा मान हवा? चाणक्यनीतीतल्या 'या' ५ सवयी तुमचं आयुष्य बदलतील!
14
भारत-न्यूझीलंडमध्ये ऐतिहासिक 'मैत्री'! ५००० भारतीयांना थेट नोकरीची संधी, मोठे फायदे कोणते?
15
चिंताजनक! महाराष्ट्राला टीबीचा विळखा; राज्यात तब्बल ११ हजार गावांना हाय अलर्ट!
16
Gold-Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या दरात बदल; पटापट चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K आणि १८K Gold चे नवे दर
17
घरात मोबाइल नेटवर्क मिळणे झाले कठीण; इमारतींना ‘डिजिटल रेटिंग’ देण्याचा ‘ट्राय’चा निर्णय
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातने पीडितेला दिली दैवी शक्तीने मुलांना ठार मारण्याची धमकी
19
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
20
TCS मधील धर्मांतर प्रकरणात धक्कादायक खुलासा; पीडितेचं नाव बदललं, मलेशियासह मालेगाव कनेक्शन
Daily Top 2Weekly Top 5

दोन रुग्णालयांना नोटीस

By admin | Updated: December 19, 2014 04:43 IST

चार वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार झाल्याची माहिती मिळूनही ही बाब का कळवली नाही, अशी विचारणा करणारे पत्र भांडुप पोलिसांनी मुंबई

मुंबई : चार वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार झाल्याची माहिती मिळूनही ही बाब का कळवली नाही, अशी विचारणा करणारे पत्र भांडुप पोलिसांनी मुंबई महापालिकेच्या सावित्रीबाई फुले प्रसुतीगृह व राजावाडी रूग्णालयाला धाडले आहे. या पत्रात संबंधीत डॉक्टरांनी स्पष्टीकरण द्यावे, अशी सूचना पोलिसांन केली आहे. याप्रकरणी पोलीस संबंधीत डॉक्टरांचे जबाब नोंदवून घेणार आहेत.भांडुप, तुलशेत पाडा परिसरातील माऊंट मेरी या खासगी शाळेत चार वर्षांच्या विद्यार्थीनीवर ९ डिसेंबरला बलात्कार झाला होता. याप्रकरणी भांडुप पोलिसांनी शाळेच्या प्रशासकीय विभागात पर्यवेक्षक म्हणून काम करणाऱ्या केसरीनंदन उपाध्याय(३२) याला गजाआड केले. आरोपी उपाध्यायला न्यायालयाने २४ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत धाडले आहे. दरम्यान, चिमुरडीने उपाध्यायने केलेल्या अत्याचाराची माहिती त्याच दिवशी कुटुंबियांना दिली होती. मात्र त्यांनी या घटनेची तक्रार पोलिसांना दिली नाही. वेदना होऊ लागल्याने कुटुंबियांनी या चिमुरडीला उपचारांसाठी भांडुपच्या सावित्रीबाई फुले रूग्णालयात नेले. तेथे घडलेली घटना सांगितली. तेथील डॉक्टरांनी कुटुंबियांना राजावाडी रूग्णालयात धाडले. तेथेही कुटुंबियांनी लैंगिक अत्याचाराची माहिती दिली. राजावाडीतल्या डॉक्टरांनी उपचार करून मुलीला सोडून दिले. या दोन्ही रूग्णालयांनी ही बाब पोलिसांना कळवली नाही, असे भांडुप पोलिसांच्या तपासातून उघड झाली. त्यामुळे पोलिसांनी रूग्णालयांना पत्रव्यवहार करून पुढील कारवाई सुरू केली आहे. रूग्णालयांना पत्र धाडल्याच्या वृत्ताला भांडुप पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरिक्षक प्रताप चव्हाण यांनी दुजोरा दिला आहे. चिमुरडीवर नागपाडा येथील पोलीस रूग्णालयात वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या. या चाचण्यांचे अहवाल उद्या हाती येतील, असेही चव्हाण यांनी सांगितले. (प्रतिनीधी)