शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
2
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयांनंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
3
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
4
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
5
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
6
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
7
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
8
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
9
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
10
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
11
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
12
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
13
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
14
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
15
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
16
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
17
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
18
“केरळच्या सुज्ञ जनतेची काँग्रेसचा विचार, राहुल गांधींच्या नेतृत्वाला साथ”: हर्षवर्धन सपकाळ
19
कैलास मानसरोवर यात्रेत नेपाळचा 'खो'! बालेन शाह सरकारने भारत अन् चीनला धाडलं पत्र; नेमकं प्रकरण काय?
20
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
Daily Top 2Weekly Top 5

कसली थंडी..? आता अनुभवा ‘नोव्हेंबर हीट’! मुंबईसह राज्यभरात अवकाळी पावसाचीही शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2025 07:21 IST

नोव्हेंबर महिना गुलाबी थंडीविनाच जाणार...

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: नोव्हेंबर महिन्यात मुंबईसह राज्यभरात अवकाळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली असून, ढगाळ हवामानामुळे तापमान खाली उतरणार नाही. परिणामी, नोव्हेंबर महिना गुलाबी थंडीविनाच जाणार असून,  राज्यासह मुंबईतल्या नागरिकांना थंडीसाठी आता डिसेंबरची वाट पाहावी लागणार आहे.

बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळ आणि अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे दिवाळीतही पाऊस पडला. हवामानातील वेगवान घडामोडींमुळे ५ नोव्हेंबरपर्यंत मुंबईत पावसाचा अंदाज असून, ढगाळ हवामानामुळे तापमान चढे राहणार आहे. हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईचे कमाल तापमान सरासरीच्या तुलनेत दोन ते तीन अंशांनी कमी नोंदविले जाईल. जिथे कमाल तापमानाचा पारा ३२ असतो. तिथे तो ३० अंश सेल्सिअस असेल. तर किमान तापमान सरासरीच्या तुलनेत एक ते दोन अंशांनी अधिक नोंदविले जाईल. जिथे किमान तापमान २० नोंदविले जाते, तिथे ते २२ अंश सेल्सिअस नोंदविले जाईल.

थोडक्यात, नोव्हेंबर महिन्यात मुंबईत थंडी पडणार नाही. राज्यात कमाल तापमान सरासरीच्या तुलनेत दोन ते तीन अंशांनी अधिक राहील. जिथे तापमान ३२ असते ते ३४ नोंदविले जाईल. किमान तापमान सरासरीच्या तुलनेत एक ते दोन अंशांनी अधिक असेल. जिथे किमान तापमान १५ असते ते १७ असेल. दरम्यान, ला निना सक्रिय असल्याने पावसाची शक्यता असून, आकाश ढगाळ राहील, असा अंदाज आहे.

राज्यात बहुतेक ठिकाणी सरासरीपेक्षा अधिक पाऊस असण्याची शक्यता आहे. राज्यात दक्षिण कोकणातील काही भाग वगळता, इतरत्र किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त असेल.-कृष्णानंद होसाळीकर, ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ

English
हिंदी सारांश
Web Title : No Cold Snap: Maharashtra Faces 'November Heat,' Rain Possible

Web Summary : Maharashtra, including Mumbai, anticipates unseasonal rains in November. Cloudy skies will keep temperatures elevated, delaying the arrival of cooler weather. Expect warmer days and nights; December offers the best chance for cold.
टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रRainपाऊस