शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
3
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
4
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
5
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
6
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
7
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
8
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
9
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
10
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
11
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
12
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
13
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
14
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
15
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
16
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
17
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
18
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
19
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
20
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

न भूतो, न भविष्यती...! विधानसभेत सख्ख्या भावांच्या दोन जोड्या दिसणार; असा योगायोग की...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2024 13:25 IST

Rane, Samant Brothers: महाराष्ट्राच्या इतिहासात ही पहिलीच वेळ असणार आहे. ही किमया केली आहे कोकणातील राणे बंधू आणि सामंत बंधुंनी. आणखी एक योगायोग खातेवाटप झाल्यावर होणार...

- हेमंत बावकर

यंदाची विधानसभा खूप खास ठरली आहे. सख्ख्या भावांच्या दोन जोड्या विधानसभेत जाणार आहेत. महाराष्ट्राच्या इतिहासात ही पहिलीच वेळ असणार आहे. ही किमया केली आहे कोकणातील राणे बंधू आणि सामंत बंधुंनी. आणखी एक योगायोगाची बाब म्हणजे चौघांचेही मतदारसंघ एकमेकांना लागून सलग आहेत. असा विक्रम मोडणे नजीकच्या काळातच नाही तर पुढची अनेक वर्षे कोणाला शक्य होणार नाही. 

शिवसेनेकडून उदय सामंत हे रत्नागिरी मतदारसंघ, किरण सामंत त्याच्या पुढचा राजापूर मतदारसंघातून निवडून आले आहेत. तर भाजपाकडून नारायण राणेंचे पुत्र नितेश राणे कणकवली आणि कुडाळ-मालवण मतदारसंघ शिवसेनेकडे असल्याने त्या पक्षात जात निलेश राणे निवडून आले आहेत. हे चारही मतदारसंघ एकमेकांना लागून आहेत. या चौघांपैकी मंत्रिपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याचीही चर्चा सुरु झाली आहे. 

भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादीचे मंत्रिपदांचे वाटप लवकरच होणार आहे. या वाटपात भाजपाला २२, शिवसेनेला १३ तर राष्ट्रवादीला १२ अशी खाती वाटली जाणार असल्याचे समजते आहे. येत्या काही दिवसांत हे चित्र स्पष्ट होणार आहे. असे असले तरी शिंदे गटातून सावंतवाडीचे आमदार दिपक केसरकर हे मंत्रिपदाचे प्रबळ दावेदार आहेत. यामुळे या चार भावांपैकी कोणाला मंत्रिपद मिळणार याकडेही सिंधुदूर्ग आणि रत्नागिरी वासियांचे लक्ष लागले आहे. 

तिसऱ्यांदा आमदार झालेले नितेश राणे देखील मंत्रिपदाच्या स्पर्धेत आहेत. ते भाजपाचे असल्याने भाजपाच्या कोट्यातून त्यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. तर रत्नागिरीचे आमदार उदय सामंत हे शिवसेनेतून मंत्रिपदाचे दावेदार आहेत. नितेश राणे हे नारायण राणेंचा पराभव करणाऱ्या वैभव नाईकांना पाणी पाजून विधानसभेत पहिल्यांदाच पोहोचले आहेत. त्यापूर्वी ते काँग्रेसचे खासदार होते. पहिलीच टर्म असल्याने निलेश राणेंऐवजी नितेश राणेंना मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. तसेच सामंत बंधूंमध्येही होण्याची शक्यता आहे. 

उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांचीही आमदारकीची ही पहिलीच टर्म आहे. तर उदय सामंत यांनी ठाकरे आणि शिंदे या दोघांच्याही सरकारमध्ये मंत्रिपद भूषविलेले आहे. यामुळे सामंत बंधुमध्येही धाकट्यालाच मंत्रिपद मिळण्याची दाट शक्यता आहे. निलेश राणे हे ज्येष्ठ तर नितेश राणे हे धाकटे आहेत. तर सामंत बंधूंमध्ये किरण सामंत ज्येष्ठ व उदय सामंत धाकटे आहेत. 

 कोकण पट्ट्यात जर केसरकर, राणे आणि सामंत यांना मंत्रिपदे मिळाली तर तळकोकणात सत्तेची ताकद एकवटण्याची शक्यता आहे. यामुळे चिपळूनपासून ते रायगडपर्यंत मंत्रिपद देऊन शिवसेना, भाजपाला बॅलन्स साधावा लागणार आहे.  एनसीपीच्या आदिती तटकरे या भागातून महायुतीच्या मंत्री असण्याची शक्यता आहे.  

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Nilesh Raneनिलेश राणे Nitesh Raneनीतेश राणे Uday Samantउदय सामंतBJPभाजपाShiv Senaशिवसेना