Ajit Pawar: दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? अजित पवार म्हणाले, "आमची विचारधारा वेगवेगळी असली तरी…"

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2025 19:20 IST2025-06-02T19:14:45+5:302025-06-02T19:20:18+5:30

राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते शरद पवार आणि अजित पवार हे पुण्यातील साखर संकुलातील बैठकीत एकत्र आल्याचे पाहायला मिळाले.

NCP Ajit Pawar Reacts To Meeting Between Sharad Pawar | Ajit Pawar: दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? अजित पवार म्हणाले, "आमची विचारधारा वेगवेगळी असली तरी…"

Ajit Pawar: दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? अजित पवार म्हणाले, "आमची विचारधारा वेगवेगळी असली तरी…"

राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते शरद पवार आणि आमदार अजित पवार हे पुण्यातील साखर संकुलातील बैठकीत एकत्र आल्याचे पाहायला मिळाले. त्यावेळी काका- पुतण्यामध्ये बंद दाराआड चर्चा झाली, अशी राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. याच पार्श्वभूमीवर पत्रकारांनी अजित पवारांना दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? असा प्रश्न विचारला. यावर अजित पवारांनी सूचक प्रतिक्रिया दिली.

शरद पवार आणि अजित पवार मागील काही दिवसांत अनेकवेळा एकाच व्यासपीठावर आल्याचे पाहायला मिळाले. पुण्याच्या साखर संकुलात काल पार पडलेल्या बैठकीत शरद पवार आणि अजित पवार हे आजूबाजूला बसलेले पाहायला मिळाले. त्यामुळे दोन्ही पवार एकत्र येणार असल्याच्या चर्चांना आणखी फोडणी मिळाली. यावर अजित पवारांनी आपली प्रतिक्रिया दिली.

अजित पवार काय म्हणाले?
"साखर संकुलात विविध नेत्यांसोबत बैठक सुरु होती. त्यावेळी अजित पवार बंद दाराआड चर्चा करत होते, अशी बातमी कुणीतरी दिली. पण तसे काही नाही. एआय तंत्रज्ञानाचा वापर करुन शेतकऱ्यांचे उत्पादन कसे वाढेल? याबाबत चर्चा झाली", असे अजित पवारांनी स्पष्ट केले.

आमची विचारधारा वेगवेगळी असली तरी...
पुढे अजित पवार म्हणाले की, "माझ्या मुलाच्या साखरपुड्याला ते सर्वजण आले होते. घरातील कार्यक्रम असतील तर आम्ही एकत्र येतो. आमची विचारधारा वेगवेगळी असली तरी बाकीच्या बाबतीत कुटुंब म्हणून आम्ही सुख- दु:खात एकमेकांसोबत असतोच."

Web Title: NCP Ajit Pawar Reacts To Meeting Between Sharad Pawar