शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

नाना पाटेकर-अमित शाह भेटीची चर्चा तर होणारच !

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2019 16:28 IST

सांगली, कोल्हापूर येथील पुरग्रस्तांची भेट घेतल्यानंतर लगेचच नानांनी अमित शाह यांची भेट घेतली. त्यामुळे ते राजकारणात सक्रिय होणार, अशा शक्यता व्यक्त करण्यात येत आहेत. तर राजकीय विश्लेषकांच्या मते नाना पाटेकर भाजपमध्ये न जाता भाजपमित्र म्हणून काम करू शकतात.

मुंबई - नुकतेच मीटू प्रकरणातून सहिसलामत बाहेर पडलेले ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची दिल्लीत भेट घेतली. नाना पाटेकर आणि शाह यांच्या भेटींने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. तसेच नाना पाटेकर भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चाही सुरू झाल्या. याआधी नाना पाटेकर यांनी राजकीय घडामोडींवर आपली मतं मांडलेली आहेत. या व्यतिरिक्त त्यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्नही केले होते.

नाना पाटेकर यांनी काही दिवसांपूर्वीच सांगली, कोल्हापूर येथील दुष्काळग्रस्तांची भेट घेऊन मदतीचा हात पुढे केला होता. या दोन जिल्ह्यातील पुरग्रस्तांच्या व्यथा अमित शाह यांचासमोर नानांनी मांडल्या की, भाजपमध्ये जाण्यासाठी नाना प्रयत्नशील आहेत किंवा शाह यांच्या भेटीचं याव्यतिरिक्त दुसरं काही कारण आहे का हे अद्याप समजू शकले नाही.

सांगली, कोल्हापूर येथील पुरग्रस्तांची भेट घेतल्यानंतर लगेचच नानांनी अमित शाह यांची भेट घेतली. त्यामुळे ते राजकारणात सक्रिय होणार, अशा शक्यता व्यक्त करण्यात येत आहेत. तर राजकीय विश्लेषकांच्या मते नाना पाटेकर भाजपमध्ये न जाता भाजपमित्र म्हणून काम करू शकतात.

दुसरीकडे लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपने सेलिब्रेटींना भेटून प्रचार मोहीम सुरू केली होती. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाना आणि अमित शाह यांची भेट झाल्याची शक्यताही व्यक्त करण्यात येत आहे. नाना यांनी अभिनेता मकरंद अनासपुरे यांच्या सोबतीने राज्यात 'नाम फाउंडेशन'च्या माध्यमातून अनेक कामे केली आहेत. तसेच आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मदतीचा हात दिला. त्यामुळे नाना यांचा महाराष्ट्रात एक खास चाहता वर्ग आहे. नाना भाजपमध्ये गेल्यास भाजपला त्याचा विधानसभा निवडणुकीत फायदा होऊ शकतो.