शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
4
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
5
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
6
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
7
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
8
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
9
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
10
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
11
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
12
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
13
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
14
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
15
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
16
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
17
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
18
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
19
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
20
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
Daily Top 2Weekly Top 5

कुख्यात गुंडाच्या बंगल्यावर फिरवला हातोडा; तुकाराम मुंढेंची धडक कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2020 19:57 IST

कुख्यात गुंड संतोष आंबेकर याच्या 8 हजार 460 चौरस फूट जागेत कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता बांधलेला आलिशान बंगला तुकाराम मुंढेंच्या नेतृत्वात महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने जमीनदोस्त करायला सुरुवात केली आहे.

ठळक मुद्दे कुख्यात गुंड संतोष आंबेकर याच्या नागपुरातील हमालपुरा भागातील अवधूत रोडवरच्या बंगल्यावर हातोडा फिरवला आहे. महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने दोन जेसीबी व एक पोकलॅन्डच्या साह्याने पोलीस बंदोबस्तात दुपारी 12च्या सुमारास कारवाईला सुरुवात केली. बंगल्याचा काही भाग पाडण्यात आला असून, तीन ते चार दिवस ही कारवाई चालण्याची शक्यता आहे.

नागपूरः शिस्तप्रिय अधिकारी असलेल्या तुकाराम मुंढेंनी 28 जानेवारीला नागपूर महापालिका आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतली. त्यानंतर त्यांनी तिकडेही कारवाईचा धडाका लावला आहे. कुख्यात गुंड संतोष आंबेकर याच्या नागपुरातील हमालपुरा भागातील अवधूत रोडवरच्या बंगल्यावर हातोडा फिरवला आहे. कुख्यात गुंड संतोष आंबेकर याच्या 8 हजार 460 चौरस फूट जागेत कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता बांधलेला आलिशान बंगला तुकाराम मुंढेंच्या नेतृत्वात महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने जमीनदोस्त करायला सुरुवात केली आहे.महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने दोन जेसीबी व एक पोकलॅन्डच्या साह्याने पोलीस बंदोबस्तात दुपारी 12च्या सुमारास कारवाईला सुरुवात केली. बंगल्याचा काही भाग पाडण्यात आला असून, तीन ते चार दिवस ही कारवाई चालण्याची शक्यता आहे. आंबेकरने महापालिकेच्या नगररचना विभागाकडून नकाशा मंजूर न करता वा कोणत्याही स्वरुपाची परवानगी न घेता आलिशान पाच मजली बंगल्याचे अवैध बांधकाम केले होते.आंबेकरने महापालिकेच्या नगररचना विभागाकडून नकाशा मंजूर न करता वा कोणत्याही स्वरुपाची परवानगी न घेता आलिशान पाच मजली बंगल्याचे अवैध बांधकाम केल्याचा ठपका ठेवत पाडकामाला सुरुवात केली आहे. कर्तव्यनिष्ठ मुंढे कडक कारवाईसाठी प्रसिद्धतुकाराम मुंढे हे नियमांची कडक अंमलबजावणी करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. आतापर्यंत त्यांनी अनेक महापालिकांमध्ये आयुक्तपदाचा पदभार सांभाळलेला आहे. नवी मुंबई आणि नाशिकसारख्या महापालिकांमध्ये आयुक्त असताना त्यांचा कायम राजकीय नेत्यांबरोबर वाद झालेला होता. कोणत्याही अनधिकृत कामाला ते थारा देत नाहीत. तसेच कितीही बदल्या झाल्या तरी ते राजकारण्यांच्या दबावापुढे झुकत नाहीत.  तुकाराम मुंढे यांची बदली रोखण्यासाठी सर्वसामान्य जनतेने अनेकदा रस्त्यावर उतरून आंदोलनं केली आहेत. आता त्यांनी नागपूर महापालिकेतही आपल्या कामाचा ठसा उमटवायला सुरुवात केली आहे.  

टॅग्स :tukaram mundheतुकाराम मुंढेnagpurनागपूर