शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
5
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
6
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
7
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
8
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
9
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
10
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
11
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
12
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
13
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
14
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
15
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
16
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
17
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
18
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
19
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
20
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
Daily Top 2Weekly Top 5

मनसेच्या ‘ब्लू प्रिंट’आधी सेनेचे ‘व्हिजन’

By admin | Updated: June 21, 2014 01:45 IST

मुंबईच्या पूर्व किनारपट्टीचा विकास आणि रेसकोर्सच्या जागी उद्यानाची संकल्पना मांडत शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी आज मुंबईच्या विकास आराखडय़ाचे पत्रकारांसमोर सादरीकरण केले.

शिवसेनेची कुरघोडी : उद्धव ठाकरेंनी मांडला मुंबईचा विकास आराखडा
मुंबई : गोराई ते नरिमन पॉइंटर्पयतचा कोस्टल रोड, मुंबईच्या पूर्व किनारपट्टीचा विकास आणि रेसकोर्सच्या जागी उद्यानाची संकल्पना मांडत शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी आज मुंबईच्या विकास आराखडय़ाचे पत्रकारांसमोर सादरीकरण केले. एकीकडे मनसेची ब्लू प्रिंट अद्याप गुलदस्त्यात असतानाच विकास आराखडा मांडून शिवसेनेने कुरघोडी केली.
शिवसेना भवनात पत्रकारांशी बोलताना उद्धव  म्हणाले, की कोस्टल रोडचा प्रस्ताव गेली दोन वर्षे राज्य सरकारने स्वत:कडेच ठेवला. आता हा प्रकल्प मुंबई महापालिका करणार आहे. यासाठी केवळ पर्यावरण मंजुरीची आवश्यकता असून बाकी निधी पालिका स्वत: उभा करेल. या प्रकल्पामुळे वाहतुकीचा नवा मार्ग खुला होणार असून मुंबईच्या सौंदर्यात भर पडेल.
पश्चिम किनारपट्टीप्रमाणोच मुंबईला पूर्व किनारपट्टी आहे, याची अनेकांना कल्पनाच नाही. पोर्ट ट्रस्ट, डॉकयार्ड व नौसेनेकडे तब्बल 438क् एकर जागा आहे. यातील 911 एकर जमीन अतिरिक्त असून मुंबईच्या विकासाठी ती खुली करणो आवश्यक आहे. त्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करू. या भागात गृहनिर्माण, समुद्र पर्यटन आणि उद्योग उभारणो शक्य असल्याचे ते म्हणाले.
पूर्व किनारपट्टीवर हार्बर 
लाइल, बीपीटीची स्वतंत्र रेल्वे 
लाइन, पूर्व मुक्तवाहिनी असल्याने ट्रान्सहार्बर लिंक रोडदेखील याच भागात बनेल. संपर्काची आणि दळणवळणाची सोय असणा:या या भागात जलद विकास शक्य असल्याचा दावा त्यांनी केला.
महालक्ष्मी येथील रेसकोर्स जागेवरील भूमिकेबाबत बोलत असताना सर्वानुमते रेसकोर्स मुंबईच्या बाहेरही हलवता येऊ शकतो आणि त्या ठिकाणी जागतिक पातळीवरील उद्यान उभारता येईल. या उद्यानाचा आराखडाही तयार आहे, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी) 
 
कोस्टल रोडसाठी परवानगी हवी
कोस्टल रोडसारखा महाकाय प्रकल्प मुंबई महापालिकेला ङोपेल का, अशी शंका व्यक्त केली असता उद्धव म्हणाले, आम्हाला फक्त परवानगी हवी. प्रकल्प राबविण्यास मुंबई महापालिका समर्थ आहे. 3क् लाख कोटींची मालमत्ता, 3क् हजार कोटींच्या मुदत ठेवी तर एफएसआयच्या माध्यमातून दरवर्षी उपलब्ध होणारे 3 हजार कोटी यामुळे पालिकेला हा प्रकल्प सहजशक्य असल्याचे शिवसेना खा. राहुल शेवाळे यांनी सांगितले.