शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
3
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI च्या विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
4
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
5
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
6
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
9
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
10
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
11
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
12
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
13
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
14
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
15
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
16
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
17
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
18
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
19
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
20
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात पुढील पाच दिवस अवकाळीसह गारपिटीचे, हवामान विभागाचा इशारा; राज्यात कमाल तापमानाचा कहर कायम

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2025 05:22 IST

Unseasonal Rain In Maharashtra: मुंबईसह राज्यभरात मंगळवारी हवामानात झालेले बदल बुधवारीही कायम होते. त्यात आता पुढील चार ते पाच दिवस राज्यात ठिकठिकाणी अवकाळी पावसासह गारपिटीचीही शक्यता आहे. तर मुंबईत मंगळवारच्या तुलनेत बुधवारी हवामानात बदल झाला, तापमान ३६ अंश नोंदविण्यात आले.  

 मुंबई -  मुंबईसह राज्यभरात मंगळवारी हवामानात झालेले बदल बुधवारीही कायम होते. त्यात आता पुढील चार ते पाच दिवस राज्यात ठिकठिकाणी अवकाळी पावसासह गारपिटीचीही शक्यता आहे. तर मुंबईत मंगळवारच्या तुलनेत बुधवारी हवामानात बदल झाला, तापमान ३६ अंश नोंदविण्यात आले.

राज्यात दोन दिवसांपासून ठिकठिकाणी अवकाळी पाऊस होत असला तरी कमाल तापमानाचा कहर कायम आहे. बुधवारी अहिल्यानगर ३७, बीड ३९.८, मालेगाव ३८.४, मुंबई ३६.९, नाशिक ३७.३, सोलापूर येथे ३८ अंश सेल्सिअस एवढ्या कमाल तापमानाची नोंद झाली आहे. मुंबई शहर आणि उपनगरात आज, गुरुवारी आकाश ढगाळ राहील. तसेच हलका पाऊस होईल, असा अंदाज आहे. अवकाळी पावसामुळे राज्यात पिकांचे नुकसान झाले आहे. 

नाशिक जिल्ह्यात गारपीटनाशिक : जिल्ह्यातील अनेक गावांत बुधवारी गारपीट, वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. जोरदार वाऱ्यामुळे अनेक ठिकाणची पिके आडवी झाल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. नाशिक जिल्ह्याला बुधवारी ‘ऑरेंज’ अलर्ट देण्यात आला होता. त्यानुसार बुधवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यात गारा पडल्याने नुकसान झाले. 

विदर्भाला वादळ, गारपिटीचा इशारा नागपूर/अकोला : पुढील २४ तासांत विदर्भातील काही भागांत साेसाट्याचे वादळ, विजांचा कडकडाट आणि गारपीटही हाेण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. पश्चिम बंगाल, हिमालय क्षेत्र ते मध्य प्रदेशपर्यंत तयार झालेले सायक्लाेनिक सर्क्युलेशन, बंगालच्या उपसागरातून येणारे आर्द्रतायुक्त पूर्वीय वारे आणि उत्तर भारतातून महाराष्ट्राकडे विरुद्ध दिशेने येणारे वारे यांचा संगम, तसेच महाराष्ट्र ते ओडिशापर्यंत तयार हाेणाऱ्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे अवकाळी पावसाचे वातावरण तयार झाले आहे. 

टॅग्स :RainपाऊसMaharashtraमहाराष्ट्र