MAHATET Result: महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल, नापास उमेदवारांचा आकडा पाहून डोक्याला माराल हात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2026 07:47 IST2026-02-04T07:46:08+5:302026-02-04T07:47:17+5:30

Maharashtra TET Final Result: महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाला असून शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. पावणेपाच लाख उमेदवारांपैकी ८८ टक्के पेक्षा जास्त उमेदवार नापास झाले आहेत.

MAHATET 2025 Results Out: Only 11.28% Candidates Qualify; Over 3.96 Lakh Fail to Clear | MAHATET Result: महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल, नापास उमेदवारांचा आकडा पाहून डोक्याला माराल हात!

MAHATET Result: महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल, नापास उमेदवारांचा आकडा पाहून डोक्याला माराल हात!

लोकमत न्यूज नेटवर्क 
मुंबई : महाराष्ट्रशिक्षक पात्रता परीक्षा (महाटीईटी) २०२५चा अंतिम निकाल राज्य परीक्षा परिषदेकडून जाहीर करण्यात आला आहे. या अंतिम निकालामध्ये फक्त ११.२८ टक्के शिक्षक उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत. पावणे पाच लाख शिक्षकांपैकी ३ लाख ९६ हजार शिक्षक नापास झाले आहेत.

परीक्षेचा तपशीलआकडेवारी
एकूण नोंदणी४,७५,६६९
परीक्षेस उपस्थित४,४६,७३०
उत्तीर्ण उमेदवार५०,३६९
अनुत्तीर्ण उमेदवार३,९६,३२५
निकालाची टक्केवारी११.२८%

एकूण ४ लाख ७५ हजार ६६९ उमेदवारांनी नोंदणी केली होती. यापैकी ४ लाख ४६ हजार ७३० उमेदवार परीक्षेला उपस्थित राहिले, तर २८ हजार ९३९ उमेदवार अनुपस्थित होते. एकूण ५० हजार ३६९ उमेदवार उत्तीर्ण झाले असून ३ लाख ९६ हजार ३२५ उमेदवार अनुत्तीर्ण ठरले आहेत. अंतिम निकालाचा टक्का ११.२८ इतका आहे.

महाटीईटी निकाल: माध्यम आणि विषयांनुसार टक्केवारी

माध्यम / विषयनिकालाची टक्केवारी (%)
कन्नड माध्यम१५.०१% (सर्वात जास्त)
सामाजिक विज्ञान१२.३३%
मराठी माध्यम१२.२०%
हिंदी माध्यम१२.१९%
तेलगू माध्यम१०.००%
गणित व विज्ञान९.१२%
बंगाली माध्यम७.२९%
उर्दू माध्यम६.९६%
इंग्रजी माध्यम५.४४%
गुजराती माध्यम३.४४%

Web Title : महाराष्ट्र टीईटी परिणाम: भारी विफलता दर से शिक्षाविद चिंतित

Web Summary : महाराष्ट्र टीईटी 2025 के नतीजे चिंताजनक हैं, उत्तीर्ण दर केवल 11.28% है। 4.46 लाख उम्मीदवारों में से 3.96 लाख असफल रहे। कन्नड़ माध्यम में उत्तीर्ण प्रतिशत 15.01% था, जबकि गुजराती में 3.44% था।

Web Title : Maharashtra TET Result Shocks: Massive Failure Rate Alarms Educators

Web Summary : The Maharashtra TET 2025 results reveal a concerning pass rate of only 11.28%. Out of 4.46 lakh candidates, a staggering 3.96 lakh failed. Kannada medium had the highest pass percentage at 15.01%, while Gujarati had the lowest at 3.44%.