शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : "महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार देवेंद्र फडणवीस!"; आई सरिता फडणवीस यांचं मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2024 14:56 IST

Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights : "देवेंद्र यांची अविश्रांत मेहनत आणि लोकांचे त्यांच्यावर असलेले प्रेम, या दोन्ही गोष्टींनी त्यांना हा मोठा विजय मिळवून दिला आहे. आता पण तो मुख्यमंत्री होणार आहे आणि पाच वर्षांच्या अनुभवांनंतर तो अतिशय उत्कृष्टपणे काम करेल."

संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल येत आहे. यात जनतेने महायुतीच्या बाजूने मोठा कौल दिला आहे. राज्यात मोठ्या बहुमताने महायुतीचे सरकार स्थानप होताना दिसत आहे. दरम्यान, महायुतीतील नेत्यांकडून मुख्यमंत्रीपदासंदर्भातही प्रतिक्रिया येताना दिसत आहेत. यातच आता भाजप नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मातोश्री सरिता फडणवीस यांचीही प्रतिक्रिया आली आहे. "देवेंद्र यांची अविश्रांत मेहनत आणि लोकांचे त्यांच्यावर असलेले प्रेम, या दोन्ही गोष्टींनी त्यांना हा मोठा विजय मिळवून दिला आहे. आता पण तो मुख्यमंत्री होणार आहे आणि पाच वर्षांच्या अनुभवांनंतर तो अतिशय उत्कृष्टपणे काम करेल," असे सरिता फडणवीस यांनी म्हटले आहे. त्या पत्रकारांसोबत बोलत  होत्या. महाराष्ट्राची आणि कार्यकर्त्यांची इच्छा आहे की देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा मुख्यमंत्री व्हावे? असे विचारले असता, सरिता फडणवीस म्हणाल्या, "यावरून आपण हे समजू शकतो की, महाराष्ट्राची आणि जनतेची इच्छा आहे की देवेंद्र यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद भूषवावे. दरम्यान, मधल्या काळात विरोधकांकडून झालेल्या आरोप प्रत्यारोपांसदर्भात बोलताना त्या म्हणाल्या, "मला कधीच आरोप-प्रत्यारोपांमध्ये तथ्य वाटत नाही, कारण माझा मुलगा काय आहे हे मला पूर्णपणे माहीत आहे. त्यामुळे मी कधीच त्या गोष्टींवर विश्वास ठेवला नाही.

लाडक्या बहिणींसंदर्भात बोलताना त्या म्हणाल्या, "लाडक्या बहिणींचे तर हे यश आहेच. पण देवेंद्र यांची अविश्रांत मेहनत आणि लोप्रियता याचेही हे यश आहे. मला मुलगी नव्हती, त्यामुळे एवढ्या साऱ्या मुली मला  मिळाल्या," असेही त्या म्हणाल्या. 

बघा लाइव्ह ब्लॉग : Watch Live Blog >>

तो मुख्यमंत्री होणार आहे आणि अतिशय उत्कृष्टपणे काम करेल -देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री म्हणून बघायला आवडेल का? असे विचारले असता, "मी त्याला मुख्यमंत्री म्हणून पाहिले आहे. त्याने किती चांगले काम केले, लोकांनी किती प्रशंसा केली, हे पण मला माहित आहे. आता पण तो मुख्यमंत्री होणार आहे आणि पाच वर्षांच्या अनुभवांनंतर तो अतिशय उत्कृष्टपणे काम करेल," असे सरिता फडणवीस म्हणाल्या.

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाMahayutiमहायुती