शहरं
Join us  
Trending Stories
1
"निदा खानला एमआयएमनेच लपवलं!" संजय शिरसाटांचा इम्तियाज जलील यांच्यावर गंभीर आरोप
2
Latest Marathi News LIVE Updates: "राज्यघटनेचे पालन करून ममता बॅनर्जींनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा"
3
पश्चिम बंगालनंतर तामिळनाडूत 'राजीनामा' सत्र; १०० हून अधिक सरकारी अधिकाऱ्यांनी सोडली नोकरी
4
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या लोनच्या व्याजदरात बदल! आता किती झाला रेट? जाणून घ्या
5
Nora Fatehi : 'सरके चुनर' गाण्याप्रकरणी नोरा फतेहीने मागितली माफी; उचलणार अनाथ मुलींच्या शिक्षणाचा खर्च
6
प्रसिद्ध अभिनेत्री झाली आई, पहिल्या मुलाचं नाव अलेक्झांडर तर आता दुसऱ्याचं...; शेअर केली पोस्ट
7
उन्हाळ्यात लोडशेडिंग का होतं? सारखी लाइट का जाते? जाणून घ्या खरं कारण!
8
'हंताव्हायरस' संक्रमित जहाजावर २ भारतीय क्रू; त्यांच्या प्रकृतीबाबत माहिती मिळालेली नाही
9
SSC 10th Result 2026: दहावीचा निकाल जाहीर, गेल्या वर्षीच्या तुलनेत 'टक्का' घसरला! राज्यातून ९२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण
10
Health Tips: आमरस प्रेमींनो, मँगो शेक किंवा मँगो लस्सी पिण्याआधी आवर्जून वाचा 'हे' आयुर्वेदाचे नियम
11
DMK AIDMK: विरोधक एकत्र येणार, 'टीव्हीके'चा कार्यक्रम होणार! अण्णाद्रमुकला पाठिंबा देण्यास द्रमुक तयार, फक्त एक अट?
12
तामिळनाडूत राजकीय 'दंगल'! TVK-काँग्रेस एकत्र येणं पटलं नाही; भाजपाचा पडद्यामागून 'सीक्रेट गेम'
13
Career Tips: दहावी तर झाली आता पुढं काय? 'हे' करिअर ऑप्शन्स ठरतील तुमच्यासाठी बेस्ट!
14
"IPL खेळाच, पण टीम इंडियाकडून खेळण्याचे स्वप्न पाहा"; चेतेश्वर पुजाराचा युवा खेळाडूंना सल्ला
15
Virat Kohli: १४०.४ च्या वेगानं घात केला! किंग कोहलीवर ९ वर्षांनंतर नामुष्की; असं काय घडलं?
16
Chandranath Rath : "मारेकऱ्यांना फाशी नको, जन्मठेप द्या"; चंद्रनाथ रथ यांच्या आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश
17
Vastu Tips: पावसाळ्याआधी अंगणात, बिल्डिंगच्या आवारात लावा 'ही' रोपं; साप घराकडे फिरकणारसुद्धा नाहीत!
18
रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज! AI सांगणार तुमचं वेटिंग तिकीट कन्फर्म होणार की नाही
19
विचित्र...! मुलींच्या वापरलेल्या शूजसाठी या देशात गर्दी, २५-३० हजारांची लोक लावतायत बोली...
20
महागाईचा फटका: Dabur च्या उत्पादनांच्या किमती वाढल्या; छोट्या पॅकेटचा आकारही झाला लहान
Daily Top 2Weekly Top 5

Vidhan Sabha 2019: मनसेच्या बदललेल्या पवित्र्यामागे चाणक्यनीती की अदृश्य टाळी?

By संदीप प्रधान | Updated: September 23, 2019 06:47 IST

महाराष्ट्र नवनिर्माण सेना १०० जागांवर उमेदवार उभे करणार, अशी चर्चा आहे.

- संदीप प्रधान 

मुंबई : मनसैनिकांच्या दबावापोटी म्हणा किंवा ईडीच्या धाकाने म्हणा किंवा अस्तित्वाच्या लढाईकरिता, ठाकरेबंधूंमधील प्रेमापोटी म्हणा राज ठाकरे हे विधानसभा निवडणुकीत उमेदवार रिंगणात उभे करण्यास तयार झाले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेना १०० जागांवर उमेदवार उभे करणार, अशी चर्चा आहे. विधानसभेच्या २८८ जागा असून त्यापैकी केवळ १०० कोणत्या जागांवर मनसे लढणार ते उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यावरच स्पष्ट होईल. त्यानंतरच मनसेच्या बदललेल्या भूमिकेमागील प्रेरणा कोण, ते स्पष्ट होईल.

मनसेने लोकसभा निवडणूक लढवली नाही. मात्र, राज यांनी नरेंद्र मोदी व अमित शहा यांच्याविरोधात जोरदार प्रचार केला. त्यानंतरही अनुकूल निकाल न लागल्याने राज यांनी ईव्हीएम मशीनचा मुद्दा उपस्थित केला. निकाल जर फिक्स असेल, तर निवडणुका कशाला लढवायच्या, असा सवाल करणाऱ्या राज यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना स्वत:कडील पैसे जपून वापरण्याचे आवाहन केले होते.

राज यांच्या भाजपविरोधी भूमिकेच्या पार्श्वभूमीवर त्यांना ईडी चौकशीची नोटीस आली. त्यांचे निकटवर्तीय उन्मेष जोशी, राजन शिरोडकर व नितीन सरदेसाई यांनाही ईडीच्या कार्यालयात चकरा मारायला लागल्या. त्यावेळीच अशी चर्चा सुरू झाली होती की, सत्ताधारी भाजपने युती केली किंवा तोडली तरी खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना मनसे रिंगणात हवी आहे. युती तोडल्यानंतर शिवसेनेच्या काही उमेदवारांच्या विरोधात मनसेचे उमेदवार रिंगणात असतील, तर मराठी मतांच्या विभाजनाचा लाभ भाजपच्या उमेदवारांना होऊ शकतो किंवा युती असतानाही शिवसेनेला मनसेच्या उमेदवारांमुळे झटका लागला, तर शिवसेना मागील वेळेसारखी ६३ जागांवर मजल मारणार नाही. त्यामुळे आता मनसेने शिवसेनेच्या मतदारसंघात उमेदवार दिले, तर या खेळीमागे भाजपचे चाणक्य असल्याचे स्पष्ट होईल.

दुसरा तर्क असाही आहे की, राज हे निवडणूक लढवायला उत्सुक नव्हते, मात्र शिवसेनेने त्यांच्या व मनसेच्या अस्तित्वाची ही लढाई असल्याचे लक्षात आणून दिल्याने राज यांनी लढायला अनुकूलता दाखवली आहे. ठाण्यातील नौपाडा येथील बिल्डर हसमुख शहा याने अलीकडेच राहुल पैठणकर या मराठी ब्राह्मण व्यक्तीला किरकोळ कारणावरून मारहाण केली. लागलीच मनसेने या वादात उडी घेत शहाला इंगा दाखवला. सध्या दोन्ही सेनांचा मुख्य शत्रू भाजप असून त्याचे नेतृत्व दोन गुजराती व्यक्ती करत आहेत. त्या पार्श्वभूमीवर शहा याला इंगा दाखवण्यामागे शिवसेना व मनसे यांची आतून हातमिळवणी तर नाही ना, अशी शक्यताही नाकारता येत नाही.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019MNSमनसेRaj Thackerayराज ठाकरेBJPभाजपाShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस