शहरं
Join us  
Trending Stories
1
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
2
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
3
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
4
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
5
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
7
लग्नाच्या जल्लोषात रक्तरंजित वळण; नाचण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाचा खून, चौघांविरोधात गुन्हा दाखल
8
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
9
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
10
"छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द खपवून घेणार नाही...", रितेश देशमुखने धीरेंद्र शास्त्रींना स्पष्ट शब्दांत सुनावलं
11
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
12
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
13
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
14
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
15
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
16
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
17
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
18
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
19
लहान वयात मोठी व्याधी! ४ ते ८ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये वाढतोय आता ‘किडनी स्टोन’चा धोका 
20
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019: मतदानादिवशी सुट्टी नाहीए?, कर्मचाऱ्यांनो 'इथं' करा तक्रार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2019 17:51 IST

२१ ऑक्टोबरला होणार मतदान; २४ ऑक्टोबरला निकाल

मुंबई: विधानसभा निवडणुकीचा प्रचार थोड्याच वेळात संपणार आहे. यानंतर सोमवारी (२१ ऑक्टोबरला) राज्यात मतदान होईल. मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी निवडणूक आयोगाकडून विविध उपक्रम हाती घेतले जात आहेत. अधिकाधिक मतदारांनी मतदान करावं यासाठी २१ ऑक्टोबरला सर्व दुकानं, आस्थापनं, निवासी हॉटेल, नाट्यगृहं, खानावळी, व्यापार, औद्योगिक उपक्रम, निमशासकीय कार्यालयं, मंडळं, महामंडळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मतदानाच्या दिवशी देण्यात आलेली सुट्टी भरपगारी स्वरुपाची असणार आहे. कर्मचाऱ्यांना सुट्टी न देणाऱ्या कार्यालयांवर दंडाची कारवाई करण्यात येईल, असं जिल्हाधिकारी कार्यालयानं सांगितलं आहे. यासंदर्भात शासनानं २५ सप्टेंबरला परिपत्रक काढलं होतं. एखाद्या अपवादात्मक स्थितीत जर कुठल्याही कंपनीला पूर्ण दिवस सुट्टी देणं शक्‍य नसल्यास संबंधित जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीनं कर्मचाऱ्यांना मतदानादिवशी सुट्टीऐवजी दोन ते तीन तासांची भरपगारी सवलत देणे गरजेचं असेल. परंतु कर्मचाऱ्यांना सुट्टीऐवजी दोन ते तीन तासांची भरपगारी सवलतदेखील मिळत नसेल तर त्या कर्मचाऱ्यांना जिल्हा कामगार अधिकाऱ्यांकडे तक्रार नोंदवता येईल.कर्मचाऱ्यांना प्रमुख सुविधाकार, बृहन्मुंबई महानगरपालिका व त्यांच्या अधिपत्याखालील महानगरपालिकेतील प्रभागनिहाय कार्यालयांमध्ये तक्रार नोंदवता येईल. तसंच राज्याचे कामगार आयुक्त कार्यालय, कामगार भवन, सी-२०, ई-ब्लॉक, वांद्रे- कुर्ला संकुल, वांद्रे, मुंबईतदेखील तक्रार नोंदवता येईल अशी कामगार आयुक्तांनी त्यांच्या आदेशात दिली आहे. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019