COVID19: कोरोनाचा विळखा घट्ट होतोय; राज्यातील रुग्णांचा आकडा १३०० पार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 13:51 IST2025-06-10T13:47:58+5:302025-06-10T13:51:58+5:30

Coronavirus In Maharashtra: महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होऊ लागली.

Maharashtra COVID-19 Update: State Crosses 1300 Mark, 86 Fresh Cases Reported; Mumbai & Pune With Highest Count | COVID19: कोरोनाचा विळखा घट्ट होतोय; राज्यातील रुग्णांचा आकडा १३०० पार!

COVID19: कोरोनाचा विळखा घट्ट होतोय; राज्यातील रुग्णांचा आकडा १३०० पार!

महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होऊ लागली. शनिवारी, राज्यात आणखी ८६ रुग्णांची नोंद करण्यात आली. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्या १ हजार ३६२ वर पोहोचली आहे. जानेवारीपासून राज्यात एकूण १८ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अशा परिस्थितीत नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

राज्यात पुणे शहरात ३१ रुग्ण आढळले. तर, मुंबईत २८ रुग्ण आढळले. जानेवारीपासून १६ हजार २२६ चाचण्या घेण्यात आल्या. मुंबईतील एकूण रुग्णांची संख्या ६४० वर पोहोचली आहे. गेल्या महिन्यात ६३४ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली होती.

महाराष्ट्रात आतापर्यंत १८ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्युची नोंद झाली, जे इतर राज्यातील तुलनेत जास्त आहेत. मृतांमध्ये पार्किन्सन, उच्च रक्तदाब, मधुमेह आणि इतर गंभीर आजार असलेल्या रुग्णांचा समावेश आहे. राज्य आरोग्य विभागाने नागरी संस्थांना ऑक्सिजन सुविधांसाठी मॉक ड्रिल करण्याचे आदेश दिले आहेत.

आरोग्य विभाग सतत लक्ष ठेवून आहे. रुग्णालयांना सतर्क ठेवण्यात आले आहे. दिल्लीसह अनेक राज्यांमध्ये, लोकांना पुन्हा मास्क घालण्याचा आणि गर्दी टाळण्याचा सल्ला देण्यात आला.  वृद्ध, मुले आणि आधीच आजार असलेल्या लोकांनी विशेषतः सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे, असे अधिकाऱ्याचे म्हणणे आहे. 

Web Title: Maharashtra COVID-19 Update: State Crosses 1300 Mark, 86 Fresh Cases Reported; Mumbai & Pune With Highest Count