शहरं
Join us  
Trending Stories
1
टीम इंडियाची घोषणा; गिलच्या कॅप्टन्सीत श्रेयस अय्यर वनडेत डेप्युटी! KL राहुल कसोटी संघाचा उपकर्णधार
2
“आर्थिक मंदीचं वादळ येतंय, खूप कठीण काळ, मोठा फटका बसेल”; राहुल गांधींनी व्यक्त केली भीती
3
NEET Exam Paper Leak : ना कागद, ना मोबाईल! मनीषा मांढरेची पेपर फोडण्यासाठी 'चलाखी', तपास यंत्रणाही अवाक्; पुरावा शोधायचा कसा?
4
VIDEO: "क्या मिडल स्टम्प उडाया बे..."! रोहित शर्माच्या इडन गार्डन्समधील मजेशीर कृतीमुळे हशा
5
डोळ्यात पाणी आणि गावात स्मशानशांतता! पालघरमध्ये एकाच वेळी १२ जणांवर अंत्यसंस्कार, एक चूक महागात पडली
6
वांद्रे रेल्वे रुळांलगतची ४-५ मजली घरं पाडली, तोडक कारवाईने गदारोळ; ब्रिज बंद ठेवल्याने प्रवाशांची कोंडी
7
'विजय' बनून इम्रानने तरुणीला जाळ्यात ओढले; बिहारला नेऊन निकाह, विवाहाच्या ७ वर्षानंतर गुन्हा दाखल
8
Motegaonkar NEET Paper Leak: शिवराज मोटेगावकरच्या मोबाईलमध्येच मिळाला नीट पेपरफुटीचा सर्वात मोठा पुरावा, एका मेसेजने अडकला
9
Ebola Virus : धोका वाढला! इबोला व्हायरसचा वेगाने प्रसार; ५०० रुग्ण, १३० जणांचा मृत्यू; WHO कडून अलर्ट जारी
10
चहूबाजूंनी संकटांनी घेरलंय? खचून जाण्यापूर्वी प्रेमानंद महाराजांचे 'हे' ६ गुरुमंत्र नक्की वाचा!
11
Top Marathi News LIVE: नीट पेपर फुटीप्रकरण: शिवराज मोटेगावकरच्या मुलाचीही सीबीआयकडून चौकशी
12
अमेरिका, चीन की भारत? जगातील सर्वाधिक सोनं कोणत्या देशात? आकडे पाहून थक्क व्हाल!
13
मुंबई इंडियन्सच्या जखमेवर मीठ! Quinton de Kock आणि Raj Angad Bawa आयपीएलमधून बाहेर!
14
Video - हृदयद्रावक! हत्तींच्या झुंजीत महिलेने गमावला जीव; पतीच्या डोळ्यादेखत झाला मृत्यू
15
NEET Paper Leak : डॉक्टर नसलेल्या शिवराज मोटेगावकरला सुरू करायचे होते मेडिकल कॉलेज! नीट घोटाळ्याच्या तपासात धक्कादायक खुलासा
16
Travel : सकाळी कडक ऊन, संध्याकाळी बर्फवृष्टी! 'या' ५ जादुई जागांवर एकाच दिवसात बदलतात ऋतू
17
Shivraj Motegaonkar: 'नीट'चा पेपर फुटला, मोटेगावकरपर्यंत सीबीआय कशी पोहोचली आणि अटक का केलीये?
18
Litton Das: "कोलकाताच्या संघात माझ्यासोबत जे घडलंय ते..." बांगलादेशी क्रिकेटर लिटन दासचे गंभीर आरोप!
19
प्रशांत किशोर राष्ट्रवादी काँग्रेसचे नवे रणनीतीकार? सुनेत्रा पवार-पार्थ पवार यांच्यासोबत पार पडली बैठक
20
NEET Paper Leak Case: फायनल पेपरपर्यंत होती पोहोच! नीट पेपरफुटी प्रकरणातील पी. व्ही. कुलकर्णी याची संपूर्ण 'कुंडली' आली समोर
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रानेच भाजपचा ४०० पारचा रथ रोखला : रमेश चेन्निथला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2024 13:46 IST

यशवंतराव चव्हाण सभागृहात प्रदेश काँग्रेसच्या एस. सी. विभागाचा विजय संकल्प मेळावा पार पडला. मेळाव्याला प्रभारी चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, एससी विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेश लिलोठीया, काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड उपस्थित होते.

मुंबई : भाजपचा ४०० पारचा रथ महाराष्ट्रानेच रोखला. काँग्रेस पक्ष एससी, एसटी, मागास समाजाला प्राधान्य देत आहे, लोकसभेच्या निवडणुकीत समाजाचे प्रतिनिधीत्व वाढले. विधानसभेतही असाच विजय संपादन करावयाचा आहे. एससी एसटी प्रवर्गाच्या ५४ जागा आहेत.  विधानसभेला एससी, एसटी प्रवर्गाच्या जागा लढवण्याच्या प्रयत्न काँग्रेस पक्ष करेल, असे काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला म्हणाले.

यशवंतराव चव्हाण सभागृहात प्रदेश काँग्रेसच्या एस. सी. विभागाचा विजय संकल्प मेळावा पार पडला. मेळाव्याला प्रभारी चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, एससी विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेश लिलोठीया, काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड उपस्थित होते.

काँग्रेसची न्याय यात्रा
मुंबईकरांच्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी मुंबई काँग्रेसने शनिवारी, १० ऑगस्ट रोजी मुंबई न्याय यात्रेचे आयोजन केले आहे. न्याय यात्रेच्या माध्यमातून जनतेच्या समस्यांकडे लक्ष वेधले जाणार आहे तसेच महायुती सरकारच्या विरोधात महायुतीचे पापपत्र जनतेच्या हाती दिले जाणार आहे, अशी माहिती खासदार प्रा. वर्षा गायकवाड यांनी दिली.

चेन्निथला म्हणाले...
-  जास्तीत जास्त समाजाला आरक्षणाचा लाभ द्यायचा असेल तर जातनिहाय जनगणना करावी लागणार आहे. तसेच ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी लागणार आहे. 
-  नरेंद्र मोदी पहिल्यांदा पंतप्रधान झाले तेव्हा संसदेला नमन केले आणि संसद भवन बदलले. यावेळी मोदींनी संविधानाला नमन केले. आता ते बाबासाहेबांचे संविधान संपवायला निघाले आहेत.
-  देशात सर्वांत जास्त भ्रष्टाचार महाराष्ट्रातील महायुती सरकारने केला आहे. विकासकामे होत नाहीत फक्त लूट सुरू आहे. 
-  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अजित पवारांवर ७० हजार कोटींचा आरोप केला, प्रफुल्ल पटेलांवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, असे असले तरी त्यांनाही भाजपत प्रवेश देऊन पवित्र केले.  

टॅग्स :congressकाँग्रेसBJPभाजपाlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४