Rohit Sharma IPL 2026 funny moments MI vs KKR: मैदानावर कितीही तणावाचे वातावरण असले, तरी टीम इंडियाचा आणि मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्मा आपल्या बिनधास्त आणि मिश्किल स्वभावाने वातावरण हलकेफुलके करण्यासाठी ओळखला जातो. असाच एक किस्सा कोलकाताविरुद्धच्या सामन्यात घडला. रोहित शर्माच्या मजेशीर कृतीने दोन्ही संघांच्या खेळाडूंसह चाहत्यांनाही हसवले.
नेमका काय घडला प्रकार?
सराव सत्रात रोहित शर्मा खेळपट्टीच्या जवळ उभा होता. त्याचा जुना सहकारी अभिषेक नायर त्याला दिसला. तेव्हा रोहितने अभिषेकच्या गोलंदाजीची नक्कल केली. त्याने नक्कल करताना टाकलेल्या चेंडूने त्रिफळा उडाला. त्यावेळ स्टम्प मायक्रोफोनमध्ये (Stump Mic) रोहितचा आवाज रेकॉर्ड झाला. तो आपल्या खास मुंबईकर शैलीत "क्या मिडल स्टम्प उडाया बे..." (काय मिडल स्टम्प उडवलाय यार...) असे म्हणताना ऐकू आले. रोहितचा हा संवाद आणि त्याचे हावभाव इतके मजेशीर होते की, मैदानावरील मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्सचे खेळाडू स्वतःचे हसू रोखू शकले नाहीत. सरावाच्या आणि उष्णतेच्या गंभीर वातावरणातही खेळाडू पोट धरून हसताना दिसले.
रोहित शर्मा अनेकदा मैदानात फिल्डिंग लावताना किंवा सहकाऱ्यांशी बोलताना मुंबईकर शैलीत बोलताना दिसतो. त्या कमेंट्स नंतर सोशल मीडियावर 'मीम्स'चा विषय बनतात. यापूर्वीही त्याचे अनेक स्टम्प माईकवरील संवाद व्हायरल झाले आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर येताच काही मिनिटांतच व्हायरल झाला. चाहत्यांनी "रोहितसारखा माणूस क्रिकेट जगतात दुसरा नाही," "हिटमॅन ऑन द माईक इज ऑलवेज बेस्ट" अशा कमेंट्स करत व्हिडिओ शेअर केला आहे.
Web Summary : Rohit Sharma's lighthearted antics during practice, imitating Abhishek Nayar's bowling, had everyone in splits. His Mumbai-style commentary, captured by the stump mic, created a fun atmosphere during the MI vs KKR match, showcasing his playful personality.
Web Summary : अभ्यास के दौरान रोहित शर्मा की मस्ती, अभिषेक नायर की गेंदबाजी की नकल ने सबको हंसाया। स्टंप माइक में कैद उनकी मुंबईया शैली की टिप्पणी, एमआई बनाम केकेआर मैच के दौरान एक मजेदार माहौल बनाया, जो उनके मजाकिया व्यक्तित्व को दर्शाता है।