शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जाची होणार पुनर्रचना; १७ लाख शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने घेतला निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2026 06:05 IST

सदस्य बँकांनी यासंदर्भात महाराष्ट्र राज्यस्तरीय बैंकर्स समितीला (एसएलबीसी) आधीच माहिती

हरीश गुप्ता

नवी दिल्ली: महाराष्ट्रातील १७.२९ लाख शेतकऱ्यांच्या २६,६५८.७७ कोटी रुपयांच्या थकीत कर्जाची पुनर्रचना करण्यासाठी केंद्र सरकारने खाती निश्चित केली आहेत. सदस्य बँकांनी यासंदर्भात महाराष्ट्र राज्यस्तरीय बैंकर्स समितीला (एसएलबीसी) आधीच माहिती दिली आहे

सुधारित व्याज सवलत योजनेंतर्गत या वर्षासाठी लागू होणारा सवलतीचा व्याज दर बँकांना पुनर्रचित कर्जाच्या रकमेवर पहिल्या वर्षासाठी उपलब्ध करून दिला जाईल. अशा पुनर्रचित कर्जावर दुसऱ्या वर्षापासून सामान्य व्याजदर लागू होईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. 

महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांतील शेतकरी अतिवृष्टी, अवकाळी पावसामुळे झालेल्या मोठ्या प्रमाणावरील पीक नुकसानीमुळे आर्थिक संकटाचा सामना करत आहेत, ही बाब अनेक खासदारांनी केंद्राच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर केंद्राकडून हे पाऊल उचलण्यात आले आहे. केंद्र सरकारने हेदेखील स्पष्ट केले आहे की, बँका बाधित शेतकऱ्यांवर कर्ज परतफेडीसाठी दबाव आणत नाहीत.

दिलासा नेमका कसा? 

बाधित शेतकऱ्यांकडील कर्जवसुली स्थगित करण्यात आली आहे. 

कर्जफेडीसाठी बँकांचा दबाव नाही मानसिक व आर्थिक ताण कमी करण्याचा प्रयत्न 

पहिल्या वर्षी: पुनर्रचित कर्जावर व्याज सवलत मिळणार आहे. दुसऱ्या वर्षापासून : सामान्य व्याजदर लागू होतील. यामुळे दिलासा मिळेल.

२६ नोव्हेंबरचे पत्र; राज्यात नैसर्गिक आपत्ती जाहीर

अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांकडून कर्जवसुलीसाठी बँकांकडून कोणताही दबाव टाकला जात नसल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. ही माहिती महाराष्ट्र एसएलबीसीच्या अहवालाच्या आधारे देण्यात आली आहे. यासंदर्भात, महाराष्ट्र एसएलबीसीने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र शासनाने २६ नोव्हेंबर २०२५ रोजीच्या पत्राद्वारे राज्यात नैसर्गिक आपत्ती जाहीर केली आहे.

तसेच एसएलबीसीने राज्यातील बँकांना नैसर्गिक आपत्तीने बाधित झालेल्या भागांमधील मदत उपायांसंबंधी आरबीआयच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याचा सल्ला दिला आहे.

राज्य सरकारचे नैसर्गिक आपत्ती जाहीर करण्याबाबतचे पत्र मिळाल्यानंतर, महाराष्ट्र एसएलबीसीने सर्व सदस्य बँकांना आरबीआयच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार पात्र पीक कर्जाची पुनर्रचना करण्यास आणि पूरबाधित शेतकऱ्यांकडून कर्जवसुली स्थगित करण्यास कळवले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Central Government to Restructure Loans for 1.7 Million Maharashtra Farmers

Web Summary : The central government will restructure ₹26,658.77 crore in outstanding loans for 17.29 lakh Maharashtra farmers. Banks will offer concessional interest rates in the first year of restructuring, easing financial strain due to crop losses from heavy rains and unseasonal weather. Banks are instructed not to pressure farmers for repayment.
टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रFarmerशेतकरीCentral Governmentकेंद्र सरकार