‘कर्ज फिटलं साहेब, आता लेकीच्या लग्नाला या!’; शेतकऱ्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना खास निमंत्रण

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2020 02:34 AM2020-02-25T02:34:56+5:302020-02-25T06:47:25+5:30

१५ हजार लाभार्थी; कर्जमुक्ती योजनेची यादी जाहीर, शेतकऱ्यांनी व्यक्त केले समाधान

'Loan sir, come to Lakey's wedding now!' Special invitation to Farmer Chief Minister Uddhav Thackeray | ‘कर्ज फिटलं साहेब, आता लेकीच्या लग्नाला या!’; शेतकऱ्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना खास निमंत्रण

‘कर्ज फिटलं साहेब, आता लेकीच्या लग्नाला या!’; शेतकऱ्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना खास निमंत्रण

googlenewsNext

मुंबई : ‘साहेब, कर्जमुक्तीची रक्कम जमा होणार असल्याने आता मुलीच्या लग्नाची चिंता नाही. तुम्हीही लग्नाला या.., असं आपुलकीचं आमंत्रण परभणी जिल्ह्यातल्या विठ्ठलराव गरूड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिलं. तर पहिल्यांदा कर्जमुक्तीसाठी हेलपाटे मारावे लागले नाही, अशी भावना अहमदनगर जिल्ह्यातल्या पोपट मुकटे या शेतकऱ्याने मुख्यमंत्र्यांजवळ व्यक्त केली.

महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेचा लाभ देण्याचा प्रारंभ मुख्यमंत्री ठाकरे व उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते सोमवारी झाला. त्यानिमित्त परभणी, अहमदनगर आणि अमरावती जिल्ह्यातील लाभार्थी शेतकऱ्यांशी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. यावेळी पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी प्रसिद्ध करण्यात आली. 

कर्जमाफीसाठी राज्यातील ३४ हजार ८३ हजार ९०८ खातेदारांची माहिती एकत्र करण्यात आली होती. पहिल्या यादीत १५ हजार ३५८ लाभार्थी शेतकऱ्यांची नावे समाविष्ट करण्यात आली आहेत.

हेलपाटे मारावे लागले का ?
या योजनेचा लाभ घेताना काही त्रास झाला का? किती हेलपाटे मारावे लागले, किती कर्ज होते, कुठल्या पिकाला कर्ज घेतले होते. आधीच्या आणि आताच्या कर्जमुक्ती योजनेमध्ये काय फरक जाणवला, असे प्रश्न मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी विचारले. त्यावर योजनेबाबत शंभर टक्के समाधानी असल्याची भावना अहमदनगर जिल्ह्यातील पोपट मुकटे यांनी व्यक्त केल्या. सुरेश कोटेकर, सरीता गाढवे, यांच्याशीही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी संवाद साधला.

या कार्यक्रमास महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, कृषी मंत्री दादा भुसे, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, माजी मंत्री दिवाकर रावते, मुख्य सचिव अजोय मेहता आदी उपस्थित होते.

यशाचे श्रेय यंत्रणेला - मुख्यमंत्री
मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, राज्यातील बळीराजांना कर्जमुक्तीतून चिंतामुक्त करणाऱ्या या योजनेची अंमलबजावणी केवळ ६० दिवसात झाली याचे श्रेय यंत्रणेला आहे. योजनेची अमंलबजावणी करताना उणिवा जाणवल्या तर शेतकऱ्यांनी नाराज होवू नये.शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेताना संयम ढळू देूऊ नका बळीराजाला दुखावू नका, अशी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यंत्रणेला केली.कर्जमुक्त होऊन शेतकऱ्याला पुन्हा काळ्या आईची सेवा करता यावी. शेतीतून चांगले उत्पादन घेता यावे यासाठी राज्य शासनाने ही महत्वाकांक्षी योजना आणली, असे अजित पवार म्हणाले.

Web Title: 'Loan sir, come to Lakey's wedding now!' Special invitation to Farmer Chief Minister Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.