शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

तुमचा आमचा पंगा आहे तो पक्ष म्हणून; पण तुम्ही वंशजापर्यंत कुठे पोहोचलात?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2020 16:41 IST

"संजय राऊत चुकून बोलले की त्यांना भ्रम होत आहे हे कळत नाही

ठळक मुद्देभाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर टीका

पिंपरी: तुमचा आमचा जो पंगा आहे तो पक्ष म्हणून चालू द्या. संजय राऊत तुम्ही थेट छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वंशजापर्यंत कुठे पोहोचलात. त्यामुळे महाराष्ट्रात भीषण स्थिती निर्माण झाली आहे, असे म्हणत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली. पिंपरी-चिंचवडमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत पाटील बोलत होते. तसेच, दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी या अंडरवर्ल्ड डॉन करीम लाला याला भेटण्यासाठी मुंबईत येत होत्या, असं संजय राऊत यांनी म्हटलं होतं. राऊत यांच्या त्या वक्तव्याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणीही यावेळी पाटील यांनी केली आहे.पाटील म्हणाले, ""उदयनराजे भोसले यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज असल्याचे पुरावे द्यावेत असं संजय राऊत म्हणाले आहेत. मात्र, ते चुकून बोलले की त्यांना भ्रम होत आहे, हे कळत नाही. तुमचा आमचा जो पंगा आहे, तो पक्ष म्हणून चालू द्या. थेट तुम्ही शिवाजी महाराज यांच्या वंशजापर्यंत कुठे पोहचलात. त्यामुळे अतिशय भीषण स्थिती महाराष्ट्रात आलेली आहे. कोण काय बोलतय, काय अर्थ होत आहेत. जे आम्ही बोलत आहोत त्याचा चुकीचा अर्थ लावला जात आहे. असे म्हणत संजय राऊत यांनी जे म्हटलं आहे त्याचा मी निषेध करतो. महाराष्ट्रातील जनता शिवप्रेमी आहे, ते स्वस्थ बसणार नाहीत. दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी या अंडरवर्ल्ड डॉन करीम लाला याला भेटण्यासाठी मुंबईत येत होत्या असं राऊत यांनी म्हटलं  होतं त्या वक्तव्याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणीही  पाटील यांनी केली.पाटील।म्हणाले , गोयल हे काही भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी नाहीत, ते कार्यकर्ते आहेत. ते २५ वर्षे शिवसेनेचे कार्यकर्ते होते. छत्रपती शिवाजी महाराज आणि बाळासाहेब ठाकरे संजय यांनीच केली. ते चुकीचं मत आहे असं आमचं म्हणणं नाहीह्व

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडSanjay Rautसंजय राऊतchandrakant patilचंद्रकांत पाटीलShiv SenaशिवसेनाUdayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेBJPभाजपा