Jay Pawar : "Dad काश, वेळ थांबली असती, मी तुम्हाला..."; अजित पवारांच्या लेकाची डोळे पाणावणारी पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2026 11:28 IST2026-02-03T11:27:18+5:302026-02-03T11:28:13+5:30

Jay Pawar's Emotional Post for Ajit Pawar: अजित पवारांचे सुपुत्र जय पवार यांनी वडिलांसाठी एक भावुक पोस्ट केली आहे. 

Jay Pawar emotional post Over Dad Ajit Pawar share photos | Jay Pawar : "Dad काश, वेळ थांबली असती, मी तुम्हाला..."; अजित पवारांच्या लेकाची डोळे पाणावणारी पोस्ट

Jay Pawar : "Dad काश, वेळ थांबली असती, मी तुम्हाला..."; अजित पवारांच्या लेकाची डोळे पाणावणारी पोस्ट

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याबाबत पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत. अजित पवार यांच्या निधनानंतर पत्नी सुनेत्रा अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यावरून विरोधकांनी टीका केली. राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावरून दोन्ही गटातील नेत्यांमध्ये अनेक दावे-प्रतिदावे करण्यात येत आहेत. याच दरम्यान अजित पवारांचे सुपुत्र जय पवार यांनी वडिलांसाठी एक भावुक पोस्ट केली आहे. 

जय पवार यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून याबाबत पोस्ट केली आहे. "Dad काश, वेळ थांबली असती... मी तुम्हाला घट्ट मिठीत घेऊन आयुष्यभर तसाच राहिलो असतो." असं म्हटलं आहे. आणखी एका पोस्टमध्ये  "Missing you a lot Dad 💔 #बाबा" असं म्हटलं आहे. जय पवार यांनी यासोबतच अजित पवार यांच्यासोबतचे फोटोही शेअर केले आहेत. हे पाहून सर्वांचेच डोळे पाणावले आहेत. 

आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील का? दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासाठी सुनेत्रा पवार पुढाकार घेणार का? या प्रश्नांवर सुनील तटकरे यांनी सविस्तर उत्तरं दिली. पत्रकारांशी बोलताना सुनील तटकरे म्हणाले की, आम्ही एनडीएमध्ये आहोत. भाजपाप्रणीत एनडीए आहे. एनडीएमध्ये भाजपासोबत सत्तेत आहोत. महाराष्ट्राच्या व्यापक हितासाठी सत्तेत आहोत. देश गतिमान करण्यासाठी सत्तेत आहोत. ही भूमिका अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली घेतली होती आणि ती सामूहिकरित्या पुढे नेण्यासाठी आमचे सर्वांचे कर्तव्य आहे. भाजपाप्रणीत एनडीएमध्ये येण्यासंदर्भात भूमिका ज्यांना सोबत यायचे आहे, त्यांनी स्पष्ट करण्याची गरज आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका पूर्वीपासून ठरली आहे. निवडणुकीला सामोरे गेलो. यश मिळाले, असे तटकरे यांनी सांगितले.

दोन्ही NCP एकत्र येण्यासाठी आता सुनेत्रा पवार पुढाकार घेणार, अशा आशयाचा प्रश्न सुनील तटकरे यांना विचारण्यात आला. यावर बोलताना, अजितदादा असल्यापासून आम्ही एनडीएमध्ये आहोत. म्हणजे भाजपासोबत सत्तेत आहोत. या निर्णयाला जे अनुकूल आहेत, त्यांनी तो निर्णय घ्यायचा आहे, असे तटकरे यांनी स्पष्टपणे सांगितले. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ नये यासाठी एका गटाकडून कट शिजवला जात आहे, असा दावा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला होता. यावर, विजय वडेट्टीवार काय बोलतात, त्यापेक्षा चंद्रपुरात काँग्रेसचा महापौर करावा. काँग्रेस अंतर्गत पळवापळवी करणाऱ्या विजय वडेट्टीवारांना आमच्यावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. काँग्रेसचा महापौर कोणत्या गटाचा होणार? याची काळजी त्यांनी घ्यावी. नंतर आमच्याकडे पाहावे, असा पलटवार तटकरे यांनी केला. 

Web Title : अजित पवार के बेटे का भावुक पोस्ट: 'काश, पिताजी, समय रुक जाता।'

Web Summary : अजित पवार के निधन के बाद, उनके बेटे जय ने एक भावुक पोस्ट साझा किया। राकांपा के पुनर्मिलन की चर्चा के बीच, जय ने अपने पिता के लिए लालसा व्यक्त की। सुनील तटकरे ने स्पष्ट किया कि वे महाराष्ट्र के लाभ के लिए एनडीए के साथ हैं, सामूहिक जिम्मेदारी पर जोर दिया।

Web Title : Ajit Pawar's son's emotional post: 'Dad, I wish time stopped.'

Web Summary : Following Ajit Pawar's death, his son Jay shared an emotional post. Amidst talks of NCP reunification, Jay expressed longing for his father. Sunil Tatkare clarified that they are with the NDA for Maharashtra's benefit, emphasizing collective responsibility.