शहरं
Join us  
Trending Stories
1
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
2
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
3
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
4
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
5
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
6
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
7
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
8
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
9
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
11
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
12
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
13
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
14
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
16
लग्नाच्या जल्लोषात रक्तरंजित वळण; नाचण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाचा खून, चौघांविरोधात गुन्हा दाखल
17
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
18
"छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द खपवून घेणार नाही...", रितेश देशमुखने धीरेंद्र शास्त्रींना स्पष्ट शब्दांत सुनावलं
19
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
20
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
Daily Top 2Weekly Top 5

‘पीएफ’ऐवजी आता ‘यूएएन’

By admin | Updated: June 12, 2015 00:35 IST

खातेदारांचा प्रतिसाद : कोल्हापूर उपक्षेत्रीय कार्यालयात नोंदणी सुरू

संदीप खवळे - कोल्हापूर -कर्मचारी भविष्य निर्वाह निधी कार्यालयातर्फे कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या युनिव्हर्सल अकाउंट नंबरच्या कार्यान्वयन (यूएएन) मोहिमेस कोल्हापूर उपक्षेत्रीय कार्यालयामधून भरघोस प्रतिसाद मिळत आहे. जुन्या पीएफ क्रमांकाची जागा ही यूएएन घेत आहे. कितीही नोकऱ्या बदलल्या तरी हा क्रमांक एकच राहणार असल्यामुळे ‘पीएफ’चे काम आता सोपे झाले आहे. कोल्हापूर उपक्षेत्रीय कार्यालयात ६,८०,४८६ भविष्यनिर्वाह निधी खाती आहेत. यांपैकी २,७७,९३७ खातेदारांना यूएएन क्रमांक जुलै २०१४ पर्यंत देण्यात आले होते. यापैकी ३२९९८ खातेदारांची यूएएन खाती आतापर्यंत कार्यान्वित करण्यात आली आहेत, अशी माहिती कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी संगठनच्या कोल्हापूर उपक्षेत्रीय कार्यालयाने दिली आहे. कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी संगठन कार्यालयातर्फे तीन प्रमुख योजना चालविल्या जातात. यामध्ये कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी ही योजना महत्त्वपूर्ण आहे. कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर भविष्यनिर्वाह निधीतील हिस्सा आणि त्यावरील व्याजाचा लाभ मिळतो. भविष्यनिर्वाह निधीमध्ये १२ टक्के हिस्सा हा कर्मचाऱ्यांचा, तर १२ टक्के हिस्सा हा मालकाचा असतो. यापैकी मालकाच्या १२ टक्के हिश्श्यापैकी ८.३३ टक्के पेन्शन निधीसाठी, तर उर्वरित ३.६७ टक्के हिस्सा कर्मचाऱ्याच्या भविष्यनिर्वाह निधी खात्यामध्ये जमा करण्यात येतो. यापूर्वी नोकरी बदलली की कर्मचाऱ्यांना संबंधित मालकाकडे नवीन पीएफ खाते तयार करावे लागत असे. ही प्रक्रिया वेळखाऊ असायची; पण आता युनिव्हर्सल अकाउंट नंबरमुळे पूर्वीप्रमाणे सतत पीएफ क्रमांक बदलावा लागणार नाही. एखाद्या कर्मचाऱ्याने कितीही नोकऱ्या बदलल्या तरी त्याचा यूएएन क्रमांक तोच राहणार आहे. पीएफ खातेदारांना यूएएन क्रमांक देण्यासाठी भविष्यनिर्वाह निधी कार्यालयाने कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील विविध औद्योगिक, वाणिज्य हबमध्ये २४ कॅम्प आयोजित केले होते. या योजनेचा लाभ जास्तीत जास्त संख्येने घेण्याचे आवाहन कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी कार्यालयाने केले आहे. युनिव्हर्सल अकाऊंट नंबरचे फायदेकर्मचाऱ्याने संपूर्ण हयातीमध्ये देशभरात कुठेही नोकरी केली तरी त्याचा भविष्यनिर्वाह निधी क्रमांक एकच राहणार. यूएएन क्रमांक मोबाईलला लिंक केल्यास, पीएफची रकमेची माहिती ‘एसएमएस’वर मिळणार.यूएएन पोर्टलवरून यूएएन कार्ड, पीएफ पासबुक, तसेच केवायसी तपशील (बँक खाते क्रमांक, पॅन, आधार कार्ड), आदींची माहिती. फॉर्म अकरा भरून यूएएनची माहिती नवीन मालकाला देणे सहजशक्य.