शहरं
Join us  
Trending Stories
1
खासगी शाळांमध्ये आता मराठी शिकवणे बंधनकारक; नियम मोडणाऱ्या शाळेला बसणार दणका
2
अजितदादांच्या अपघातादिवशीच विमान कंपनीला ९ कोटींचे बक्षीस; रोहित पवारांचे खळबळजनक आरोप
3
भारत लष्करी खर्चात जगात पाचवा ठरला! शेजारी पाकिस्तान जवळपासही कुठेच नाहीय..., चीन मात्र...
4
Top Marathi News LIVE Updates: "दादांच्या अंत्यविधीच्या दिवशी १६ कोटी दिले"; रोहित पवारांचा 'व्हीएसआर' कंपनीवरून सरकारवर हल्ला
5
गोलsss... पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सिक्कीमच्या तरूणांसोबत खेळला फुटबॉल, PHOTOSची रंगली चर्चा
6
वाढदिवसासाठी Reel तयार करण्याच्या नादात युवकाने भलताच उद्योग केला; शेवटी हातात पडल्या बेड्या
7
Adhar Card : मोठा बदल! आता आधार कार्ड तुमचे वय सिद्ध करणार नाही, तुम्हाला जन्मतारखेचा पुरावा म्हणून 'ही' कागदपत्रे दाखवावी लागणार
8
कलमा वाचता येतो का? विचारले अन् सुरक्षा रक्षकांवर चालवला चाकू; मीरा रोडच्या हल्ल्यात 'लोन वुल्फ'चा संशय
9
Robert Kiyosaki Prediction: रॉबर्ट कियोसाकी यांची २०२६-२७ मध्ये मोठ्या आर्थिक संकटाची भविष्यवाणी; भारतीय गुंतवणूकदारांनी काय करावं?
10
तुमच्या छोट्याशा बाल्कनीला, खिडकीला द्या 'ग्रीन टच'; कमी जागेत बाग फुलवण्याच्या 'मास्टर ट्रिक'
11
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
12
हृदयद्रावक! IPL सामना पाहून घरी परतणाऱ्या २ भावांवर काळाचा घाला; 'हिट अँड रन'मध्ये मृत्यू
13
Mutual Fund Redemption Rules: काय आहे FIFO नियम आणि तो कसा वाचवतो तुमचा टॅक्स? जाणून घ्या डिटेल्स
14
बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने झाला 'त्या' चार जणांचा मृत्यू? पोस्टमार्टेम रिपोर्टमधून समोर आलं खरं कारण
15
एका दुखापतीने संपवलं करियर.. अवघ्या ३०व्या वर्षी क्रिकेटपटूला करावी लागली निवृत्तीची घोषणा
16
Chanakya Niti: समाजात राजासारखा मान हवा? चाणक्यनीतीतल्या 'या' ५ सवयी तुमचं आयुष्य बदलतील!
17
भारत-न्यूझीलंडमध्ये ऐतिहासिक 'मैत्री'! ५००० भारतीयांना थेट नोकरीची संधी, मोठे फायदे कोणते?
18
चिंताजनक! महाराष्ट्राला टीबीचा विळखा; राज्यात तब्बल ११ हजार गावांना हाय अलर्ट!
19
Gold-Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या दरात बदल; पटापट चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K आणि १८K Gold चे नवे दर
20
घरात मोबाइल नेटवर्क मिळणे झाले कठीण; इमारतींना ‘डिजिटल रेटिंग’ देण्याचा ‘ट्राय’चा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

परिषदेत गदारोळ, कामकाज तहकूब

By admin | Updated: March 11, 2015 01:50 IST

राज्यातील वेगवेगळ्या भागांत अवकाळी पावसामुळे झालेले नुकसान व शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये झालेली वाढ याबाबत विरोधी पक्षाने

मुंबई : राज्यातील वेगवेगळ्या भागांत अवकाळी पावसामुळे झालेले नुकसान व शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये झालेली वाढ याबाबत विरोधी पक्षाने दाखल केलेला स्थगन प्रस्ताव स्वीकारण्यास सरकारने नकार दिल्याने विधान परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या सदस्यांनी मंगळवारी गदारोळ केला. यामुळे सभागृहाचे कामकाज तीनवेळा तहकूब झाले व अखेरीस दिवसभराकरिता स्थगित करण्यात आले.सभागृहाचे कामकाज सुरू होताच विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे म्हणाले की, राज्यातील ३५३ तालुक्यांपैकी २८४ तालुक्यांत सरासरीच्या २० ते ८० टक्के कमी पाऊस झाला आहे. ९३ लाख हेक्टर जमिनीवरील पिके दुष्काळामुळे नष्ट झाली. हे संकट कमी म्हणून की काय २१ फेब्रुवारी, १ व ८ मार्च रोजी झालेला अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे सर्व कामकाज बाजूला ठेवून दुष्काळ, गारपीट व शेतकऱ्यांच्या दुरवस्थेवर विरोधी पक्षाने दाखलेल्या स्थगन प्रस्तावाद्वारे चर्चा करावी. सभागृह नेते एकनाथ खडसे म्हणाले की, सत्ताधारी विरोधकांच्या एक पाऊल पुढे असून, सत्ताधारी पक्षाने यापूर्वीच याच विषयावर चर्चेचा प्रस्ताव दिला असल्याने स्थगन स्वीकारण्याची गरज नाही. परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनीही स्थगन प्रस्ताव स्वीकारण्यास विरोध केला.यामुळे आक्रमक झालेले राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसचे सदस्य वेलमध्ये उतरून घोषणा देऊ लागले. यामुळे सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले. पुन्हा कामकाज सुरू झाले तेव्हा विरोधी पक्षनेते मुंडे म्हणाले की, अवकाळी पावसामुळे ७ लाख हेक्टर जमिनीवरील पिकांचे २५०० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे स्थगन स्वीकारलाच पाहिजे. अवकाळी पाऊस व नुकसान यावर सत्ताधारी पक्षाचाही चर्चेचा प्रस्ताव असल्याने या विषयावर कधी चर्चा केली जाईल ते बुधवारी कळवण्यात येईल, असे उपसभापती वसंत डावखरे यांनी जाहीर केले. विरोधी सदस्य घोषणाबाजी करीत असताना त्या गोंधळात सत्ताधारी पक्षाने शासकीय कामकाज मंजूर करवून घेतले. (विशेष प्रतिनिधी)