शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
4
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
5
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
6
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
7
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
8
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
9
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
10
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
11
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
12
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
13
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
14
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
15
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
16
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
17
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
18
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
19
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
20
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
Daily Top 2Weekly Top 5

संचारबंदीच्या काळात अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्या मालवाहू वाहनांना परवान्यासाठी 'स्वतंत्र पोर्टल'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2020 15:35 IST

अत्यावश्यक सेवेसाठी मालवाहतुक करणाऱ्या वाहनांना संचारबंदी लागु करण्यात आल्यानंतर त्यातून सुट.. मात्र, अशा वाहनांना आरटीओकडून परवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले.

ठळक मुद्देई-पासचा कालावधी एक महिन्यापेक्षा जास्त असणार नाही. ई-पास तयार झाल्यानंतर तो पीडीएफ स्वरूपात ई-मेलद्वारे अर्जदारास पाठविला जाणार

पुणे : संचारबंदीच्या काळात अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्या मालवाहू वाहनांना ई-पास देण्यासाठी आता राज्य पातळीवर परिवहन विभागाकडून ' स्वतंत्र पोर्टल '  तयार करण्यात आले आहे. या पोर्टलवर आवश्यक माहिती भरल्यानंतर संबंधित विभागाच्या कार्यालयाकडून ई-पास ऑनलाईन पाठविला जाणार असल्याची माहिती प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून देण्यात आली.संचारबंदी लागु करण्यात आल्यानंतर अत्यावश्यक सेवेसाठी मालवाहतुक करणाऱ्या वाहनांना त्यातून सुट देण्यात आली. मात्र, अशा वाहनांना आरटीओकडून परवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले. त्यासाठी स्थानिक आरटीओ कार्यालयाकडूनच ई-मेलद्वारे माहिती मागवून पास दिले जात होते. पुणे कार्यालयाकडून आतापर्यंत सुमारे ५०० वाहनांना पास दिले आहेत. आता परिवहन विभागाने संपूर्ण राज्यासाठी एकच पोर्टल तयार केले आहे. त्याद्वारेच ई-पास दिले जाणार आहे. या पोर्टलवर गेल्यानंतर ई-पाससाठीचा पर्याय निवडावा लागेल. त्यानंतर आरटीओ (उदा. एमएच. १२) नमुद केल्यानंतर पुढे वाहन मालक नाव, वाहन चालकाचे नाव, चालकाचा परवाना क्रमांक, दोघांचा मोबाईल क्रमांक व ई-मेल आयडी, वाहन क्रमांक, वाहनाच्या चॅसी क्रमांकातील शेवटचे पाच आकडे, वाहन प्रकार आदी माहिती नोंदवावी लागेल. तसेच संबंधित वाहनातून कोणत्या मालाची वाहतूक केली जाणार आहे, मार्ग, ही माहिती भरावी लागणार आहे. ही माहिती भरल्यानंतर अर्ज क्रमांक मिळेल. या क्रमांकाच्या आधारे स्थानिक आरटीओकडून मान्यतेची प्रक्रिया केली जाईल. ई-पास तयार झाल्यानंतर तो पीडीएफ स्वरूपात ई-मेलद्वारे अर्जदारास पाठविला जाणार आहे.ई-पासचा कालावधी एक महिन्यापेक्षा जास्त असणार नाही. याविषयी अधिक माहितीसाठी ०२०-२६०५८०९० या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन आरटीओकडून करण्यात आले आहे.-------------माल वाहतुक करणाऱ्या वाहनांमधून प्रवासी वाहतुक होऊ नये, यासाठी आरटीओकडून दररोज संबंधित वाहनांची तपासणी केली जात आहे. सातारा रस्ता, नगर रस्ता, नाशिक रस्ता आणि सोलापुर रस्त्यावर तपासणीसाठी पथके तयार करण्यात आली आहेत. सकाळी ६ ते रात्री १० या वेळेत वाहनांची तपासणी करण्यात येते, अशी माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांनी दिली.---------------

टॅग्स :PuneपुणेTrafficवाहतूक कोंडीRto officeआरटीओ ऑफीसroad transportरस्ते वाहतूकCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस