शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघातादिवशीच विमान कंपनीला ९ कोटींचे बक्षीस; रोहित पवारांचे खळबळजनक आरोप
2
भारत लष्करी खर्चात जगात पाचवा ठरला! शेजारी पाकिस्तान जवळपासही कुठेच नाहीय..., चीन मात्र...
3
Top Marathi News LIVE Updates: "दादांच्या अंत्यविधीच्या दिवशी १६ कोटी दिले"; रोहित पवारांचा 'व्हीएसआर' कंपनीवरून सरकारवर हल्ला
4
Adhar Card : मोठा बदल! आता आधार कार्ड तुमचे वय सिद्ध करणार नाही, तुम्हाला जन्मतारखेचा पुरावा म्हणून 'ही' कागदपत्रे दाखवावी लागणार
5
कलमा वाचता येतो का? विचारले अन् सुरक्षा रक्षकांवर चालवला चाकू; मीरा रोडच्या हल्ल्यात 'लोन वुल्फ'चा संशय
6
Robert Kiyosaki Prediction: रॉबर्ट कियोसाकी यांची २०२६-२७ मध्ये मोठ्या आर्थिक संकटाची भविष्यवाणी; भारतीय गुंतवणूकदारांनी काय करावं?
7
तुमच्या छोट्याशा बाल्कनीला, खिडकीला द्या 'ग्रीन टच'; कमी जागेत बाग फुलवण्याच्या 'मास्टर ट्रिक'
8
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
9
हृदयद्रावक! IPL सामना पाहून घरी परतणाऱ्या २ भावांवर काळाचा घाला; 'हिट अँड रन'मध्ये मृत्यू
10
Mutual Fund Redemption Rules: काय आहे FIFO नियम आणि तो कसा वाचवतो तुमचा टॅक्स? जाणून घ्या डिटेल्स
11
बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने झाला 'त्या' चार जणांचा मृत्यू? पोस्टमार्टेम रिपोर्टमधून समोर आलं खरं कारण
12
एका दुखापतीने संपवलं करियर.. अवघ्या ३०व्या वर्षी क्रिकेटपटूला करावी लागली निवृत्तीची घोषणा
13
Chanakya Niti: समाजात राजासारखा मान हवा? चाणक्यनीतीतल्या 'या' ५ सवयी तुमचं आयुष्य बदलतील!
14
भारत-न्यूझीलंडमध्ये ऐतिहासिक 'मैत्री'! ५००० भारतीयांना थेट नोकरीची संधी, मोठे फायदे कोणते?
15
चिंताजनक! महाराष्ट्राला टीबीचा विळखा; राज्यात तब्बल ११ हजार गावांना हाय अलर्ट!
16
Gold-Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या दरात बदल; पटापट चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K आणि १८K Gold चे नवे दर
17
घरात मोबाइल नेटवर्क मिळणे झाले कठीण; इमारतींना ‘डिजिटल रेटिंग’ देण्याचा ‘ट्राय’चा निर्णय
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातने पीडितेला दिली दैवी शक्तीने मुलांना ठार मारण्याची धमकी
19
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
20
TCS मधील धर्मांतर प्रकरणात धक्कादायक खुलासा; पीडितेचं नाव बदललं, मलेशियासह मालेगाव कनेक्शन
Daily Top 2Weekly Top 5

किडनी विकारांचा धोका वाढतोय !

By admin | Updated: March 12, 2015 06:01 IST

बदलणाऱ्या जीवनशैलीच्या ओघात तरुणाई व्यसनाधीन होते आहे. यामुळेच तरुणांमध्ये मधुमेह, रक्तदाबासारख्या आजारांबरोबरच

पूजा दामले, मुंबई बदलणाऱ्या जीवनशैलीच्या ओघात तरुणाई व्यसनाधीन होते आहे. यामुळेच तरुणांमध्ये मधुमेह, रक्तदाबासारख्या आजारांबरोबरच किडनीचे आजार जडण्याच्या प्रमाणात वाढ होत आहे. किडनीच्या आजारांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून सध्या १० पैकी एका व्यक्तीला किडनीचा त्रास आहे. पण २०२० पर्यंतही हे प्रमाण ७ पैकी १ असे होण्याचा धोका संभवत असल्याचे नेफ्रोलॉजिस्ट डॉ. ज्योत्स्ना झोपे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. किडनीचे कार्य म्हणजे रक्तातील अनावश्यक घटक गाळणे. पण या कार्यात ८५ ते ९०% बिघाड झाल्यानंतर अनेकांना त्रास जाणवू लागतो. त्या वेळी त्यांना डायलेसिस करण्याची आवश्यकता भासत असल्याचेही डॉ. झोपे यांनी सांगितले. भारतात दरवर्षी २ लाख नवीन रुग्णांना डायलेसिसची गरज भासते. पण त्या तुलनेत डायलेसिस मशिन उपलब्ध नाहीत. शहरांसारख्या ठिकाणी लोकांना डायलेसिसची सेवा उपलब्ध आहे. ग्रामीण भागात अनेकांना डायलेसिस घेण्यासाठी पाच - सहा तास प्रवास करून जावे लागते. तिथे गेल्यावरही त्यांना चांगल्याप्रकारे सुविधा मिळेलच, याची शाश्वती नाही. मुंबईत २०० डायलेसिस सेंटरमध्ये ७०० मशिन्स आहेत. तर रुग्णांची संख्या ४ हजारांच्या घरात असल्याने डायलेसिससाठी बराच वेळ रुग्णांना थांबावे लागते. अनेकदा रुग्ण डायलेसिस घेऊन रात्री दीड-दोन नंतर घरी जातात, असे नेफ्रोलॉजिस्ट डॉ. श्रीरंग बिछू यांनी सांगितले.