शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
3
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
4
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
5
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
6
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
7
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
8
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
9
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
10
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
11
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
12
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
13
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
14
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
15
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
16
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
17
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
18
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
19
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
20
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
Daily Top 2Weekly Top 5

"मी बाळासाहेबांचा शिवसैनिक, आनंद दिघेंचा चेला, मी मैदानातून पळणारा नाही तर...’’, एकनाथ शिंदेंचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2024 20:10 IST

Eknath Shinde Dasara Melava: आझाद मैदानावर झालेल्या शिवसेना शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यामध्ये शिवसैनिकांना संबोधित करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर  ठाकरे गटावर निशाणा साधत पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांना डिवचले आहे.

आज विजयादशमीच्या मुहुर्तावर मुंबईत शिवसेनेच्या दोन्ही गटांचे दसरा मेळावे होत आहेत. त्यातील आझाद मैदानावर झालेल्या शिवसेना शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यामध्ये शिवसैनिकांना संबोधित करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर  ठाकरे गटावर निशाणा साधत पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांना डिवचले आहे. मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे, आनंद दिघेंचा चेला आहे. मला हलक्यात घेऊ नका. मी मैदानातून पळणारा नाही. तर पळवणारा आहे, असा इशाराही एकनाथ शिंदे यांनी दिला आहे. 

आझाद मैदान येथील शिवसेना शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात शिवसैनिकांना संबोधित करताना एकनाथ शिंदे यांनी सुरुवातीलाच उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. ते उद्धव ठाकरेंचं नाव न घेता म्हणाले की, काहींना हिंदू म्हणून घेण्याची लाज वाटत आहे. हिऱ्यापोटी जन्माला आलेल्या गारगोट्यांना हिंदू शब्दाची लाज वाटतेय, असा टोला त्यांनी लगावला.

एकनाथ शिंदे पुढे म्हणाले की, महाराष्ट्र विरोधी आघाडीला घरी बसवून आपलं सरकार आलं तेव्हा हे सरकार काही दिवसांत पडेल. पंधरा दिवसांत पडेल. एका महिन्यात पडेल. सहा महिन्यांत पडेल. असे दावे केले जात होते. पण टीका करणाऱ्याला हा एकनाथ शिंदे पुरून उरला. जनतेच्या आणि तुमच्या आशीर्वादाने आणि साथीने या सरकारने घासून, पुसून नाही तर ठासून दोन वर्ष पूर्ण केली, असेही त्यांनी सांगितले. 

यानंतर ठाकरे गट आणि विरोधकांनाही एकनाथ शिंदे यांनी इशारा दिला, ते म्हणाले की, मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे, आनंद दिघेंचा चेला आहे. असा स्वस्तात जाणारा नाही. मला हलक्यात घेऊ नका. मी मैदानातून पळणारा नाही. तर पळवणारा आहे. कट्टर शिवसैनिक मैदानही सोडत नाही आणि विचारही सोडत नाहीत. म्हणून बाळासाहेबांचे विचार घेऊन आम्ही निघालो. आज हा एकनाथ शिंदे महाराष्ट्रात जिथे जिथे जातो, तिथे सगळे जण हसत स्वागत करतात. आशीर्वाद देतात, हेच आपण कमावलं आहे. दोन वर्षांच्या अगदी कमी काळात आपलं सरकार लाडकं सरकार झालं आहे, असा दावाही एकनाथ शिंदे यांनी केला.   

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेShiv SenaशिवसेनाDasaraदसराmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४