शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

सात वर्षांत १८६ कोटींचा गुटखा जप्त : गुटखा बंदीला मुदत वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2019 7:00 AM

राज्य सरकारने २०१२ साली गुटखाबंदी आणि पाठोपाठच्या वर्षी सुगंधित सुपारी आणि तंबाखूवर देखील बंदी जाहीर केली.

ठळक मुद्देगुटख्याची अवैध वाहतूक रोखण्यात अपयशतंबाखूजन्य पदार्थांवरील बंदीत आणखी एक वर्षांनी वाढ

पुणे : अन्न व औषध प्रशासन विभागाने (एफडीए) गुटखा, सुगंधित तंबाखू आणि सुपारी, मावा, खर्रा या सर्व तंबाखूजन्य पदार्थांवरील बंदी आणखी एक वर्षांनी वाढविली आहे. गेल्या सात वर्षांमधे राज्यात गुटखा आणि प्रतिबंधित उत्पादनांचा तब्बल १८५ कोटी ८९ लाख रुपयांचा साठा जप्त करण्यात आला आहे. गुटख्याची अवैध वाहतूक रोखण्यात एफडीएला अपयश आल्याचे दिसून येते. राज्य सरकारने २०१२ साली गुटखाबंदी आणि पाठोपाठच्या वर्षी सुगंधित सुपारी आणि तंबाखूवर देखील बंदी जाहीर केली. अन्न सुरक्षा आयुक्तांना आपल्या अधिकारात एक वर्षापर्यंत बंदी घालता येते. बंदीची मुदत १९ जून रोजी संपली. त्यात पुन्हा एक वर्षांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. गुटखा, पानमसाला, सुगंधित तंबाखू, सुवासिक सुपारी, खर्रा अशा तंबाखू आणि सुपारी मिश्रित उत्पादने मानवी आरोग्यास हानीकारक असल्याचे समोर आले आहे. या पदार्थांच्या सेवनामुळे जनुकीय बदल होत असल्याचे वैज्ञानिक अहवाल सांगतो. कर्करोगासारखा दुर्धर आजार देखील या पदार्थांच्या सेवनामुळे होत असल्याचे सिद्ध झाल्याने या पदार्थांवर अन्न सुरक्षा मानदे कायद्यानुसार बंदी घालण्यात आली आहे. गुटखा, सुगंधीत तंबाखू बंदीचा कालावधी पुन्हा एक वर्षांनी वाढविण्यात आला आहे. स्वादीष्ट, सुगंधित तंबाखू, सुगंधित सुपारी, मावा आणि खर्रा या स्वरुपातील तंबाखू, गुटखा, पानमसाला अशा विविध उत्पादनांची निर्मिती, साठवणुक, वाहतूक, वितरण अथवा विक्रीस बंदी घालण्यात आली आहे. गुटखा आणि सुगंधित तंबाखूवर बंदी असली तरी राज्यात सर्वत्र गुटखा उपलब्ध होत असल्याचे समोर आले आहे. एफडीएने गुटख्याच्या बेकायदेशीर फॅक्ट्रीसह अवैध वाहतुकीत अब्जावधी रुपयांचा साठा जप्त केला आहे. या कारवाई नंतरही गुटख्याच्या अवैध विक्रीला आळा घालण्यात सरकारला यश आले नाही. ----------------------सुगंधित तंबाखूवरी बंदी हटविण्याचा डाव उधळला लोकमतने

गेल्या वर्षी (२०१८) अन्न आणि औषध प्रशासनाने गुटखा बंदीच्या निर्णयातून सुगंधित तंबाखूला वगळले होते. बंदीमधे नावच नसल्याने सुगंधित तंबाखू विक्रीचा मार्ग मोकळा झाला होता. लोकमतने त्याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर, या सुगंधित तंबाखूवर निर्णय घेण्यासाठी एफडीएने समिती नेमली. सहा महिन्यांत समितीने अहवाल देणे अपेक्षित होते. समितीचा अहवाल आलाच नाही. मात्र, सहा महिन्यांनी सुगंधित तंबाखूवर देखील बंदी असल्याचे निर्णय सरकारने घेतला. या वर्षीच्या आदेशपत्रात सुगंधित तंबाखूचा देखील समावेश करण्यात आलाआहे.--------------

गुटखा-पानमसाला कारवाई             

साल            किंमत कोटी रुपयात२०१२-१३        २०.७४२०१३-१४        १५.६६२०१४-१५        १७.५३२०१५-१६        २४.३७२०१६-१७        २२.९८२०१७-१८        ३९.८४२०१८-१९        ४४.७७------------------

२०१२ पासून दाखल खटले        ४,०९१२०१२ पासून न्यायालयात दाखल खटले    ५,४३४ 

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसState Governmentराज्य सरकार