शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

एकनाथ शिंदेंना गृहखातं मिळावं, याचा आग्रह अजूनही सोडलेला नाही -गुलाबराव पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2024 11:20 IST

Eknath Shinde Mahayuti News: महायुती सरकार स्थापन झालं असलं, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे कोणते खाते असणार याबद्दल वेगवेगळ्या चर्चा रंगल्या आहेत. 

Maharashtra News: महायुती सरकार स्थापन झाले असून, देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रि‍पदाची तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. आता सगळ्याचं लक्ष लागलं आहे, ते उपमुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री पवार यांना कोणते खाते मिळणार? शिंदे यांच्याकडे गृह खाते असावे असा आग्रह शिवसेनेने धरलेला असल्याची चर्चा आहे. त्याला शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांनीही दुजोरा दिला आहे. 

"निर्णय घेण्याचा अधिकार एकनाथ शिंदेंना"

माध्यमांशी बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले, "एकनाथ शिंदे यांना गृह खातं मिळावं, यासाठी सगळ्याच आमदारांनी आग्रह धरलेला आहे. आम्ही तो आग्रह अजूनही सोडलेला नाही. पण, शेवटी यासंदर्भातील निर्णय घेण्याचा अधिकार आम्ही एकनाथ शिंदे यांना दिलेला आहे."

खातेवाटपाबद्दल निर्णय होत नसल्याने मंत्रिमंडळ विस्तार लांबला असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. 

याबद्दल शंभूराज देसाई म्हणाले, "मंत्रिमंडळ विस्ताराचा निर्णय घेण्याचा अधिकार मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यात चर्चा होईल. हे तिघेच याबाबतीतील निर्णय घेतील. सर्वच आमदार कधी मंत्रिमंडळ विस्तार होणार याची वाट बघत आहेत."

या खात्यांसाठी शिवसेना आग्रही 

शिवसेनेतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गृह खात्या व्यतिरिक्त एकनाथ शिंदे यांनी महसूल, नगर विकास आणि सार्वजनिक बांधकाम ही खाती मागितीली आहे. त्यांनी फडणवीसांना सांगितले की, शिवसेनेने विधानसभा निवडणुकीत ५७ जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे ११ ते १३ मंत्रिपदे मिळणे अपेक्षित आहे, असे शिवसेनेच्या एका नेत्याने सांगितले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे अर्थ खाते कायम राहणार असल्याचे बोलले जात आहे. त्याचबरोबर इतर काही महत्त्वाची खाती मिळवण्याचे प्रयत्न अजित पवारांकडून केले जात असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४MahayutiमहायुतीGulabrao Patilगुलाबराव पाटीलEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस