शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

जीपीएस ठरविणार प्री-पेड रिक्षाचे भाडे : आरटीओचा प्रस्ताव 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2018 07:00 IST

बाहेरगावाहून आलेल्या प्रवाशांची रिक्षा चालकांकडून होणारी लुट थांबविण्यासाठी पुन्हा प्री-प्रेड रिक्षा सेवेला संजीवनी मिळणार आहे.

ठळक मुद्देप्री-पेडला पुन्हा मिळणार संजीवनीरिक्षांचे भाडे ठरविण्यासाठी पहिल्यांदाच जीपीएस यंत्रणेचा वापर केला जाणारशहरात एसटी, खासगी बस, रेल्वे, विमानाने शहरात येणाऱ्यांची संख्या मोठी अनेकदा काही रिक्षाचालक संबंधित प्रवाशांकडून घेतात जादा भाडे वजन मापे विभागाकडून मार्गदर्शन घेतले जाणार

राजानंद मोरेपुणे : बाहेरगावाहून आलेल्या प्रवाशांची रिक्षा चालकांकडून होणारी लुट थांबविण्यासाठी पुन्हा प्री-प्रेड रिक्षा सेवेला संजीवनी मिळणार आहे. या रिक्षांचे भाडे ठरविण्यासाठी पहिल्यांदाच जीपीएस यंत्रणेचा वापर केला जाणार आहे. या यंत्रणेद्वारे प्रवाशाचे जाण्याच्या ठिकाणापर्यंतचे अंतर मोजून त्यानुसार भाडे आकारले जाईल. याबाबतचा प्रस्ताव प्रादेशिक परिवहन विभागा (आरटीओ) कडून वजन मापे विभागाकडे मान्यतेसाठी पाठविण्यात आला असून त्यानंतर अंमलबजावणी सुरू होईल. शहरात एसटी, खासगी बस, रेल्वे, विमानाने शहरात येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यातील अनेक इच्छित ठिकाणी जाण्यासाठी रिक्षाला प्राधान्य देतात. पण अनेकदा काही रिक्षाचालक संबंधित प्रवाशांकडून जादा भाडे घेतात. मीटर सुरू न करता थेट एक रक्कम भाडे म्हणून सांगितली जाते. रात्रीच्या वेळी असे प्रकास सर्रासपणे होतात. पण प्रवाशांना इतर पर्याय उपलब्ध नसल्याने जादा पैसे दिले जातात. यापार्श्वभुमीवर काही वर्षांपूर्वी शहरात स्वारगेट, शिवाजीनगर, रेल्वे स्टेशन, लोहगाव विमानतळ याठिकाणी प्री-पेड रिक्षा सेवा सुरू करण्यात आली. सुरूवातीला त्याला प्रतिसादही चांगला मिळाला. पण कालांतराने ही सेवा बंद पडली. सध्या केवळ विमानतळ परिसरातच ही सेवा सुरू आहे. ही सेवा जुन्याच पध्दतीने सुरू असून अंतरानुसार आधीच भाडे निश्चित केलेले आहे. आता पुन्हा एकदा प्री-पेड रिक्षा सेवेला नवसंजीवनी मिळणार आहे. आरटीओकडून ही सेवा सुरू करण्यासाठी पुढाकार घेण्यात आला आहे. स्वारगेट, पुणे स्टेशन, शिवाजीनगर आणि संगणवाडी येथे प्री-पेड रिक्षा सुरू करण्याचे प्रस्तावित आहे. मात्र, नव्याने ही सेवा सुरू करताना त्यासाठी ह्यजीपीएसह्ण यंत्रणेचा आधार घेतला जाणार आहे. प्रवासी प्री-पेड बुथवर आल्यानंतर त्यांना इच्छित स्थळ सांगावे लागेल. बुथवरील प्रतिनिधीकडून जीपीएसच्या माध्यमातून ते ठिकाण शोधले जाईल. ही यंत्रणा बुथ आणि इच्छित ठिकाणापर्यंतचा सर्वाधिक जवळचा रस्ता दाखवेल. त्यानुसार प्रवाशांना भाडे आकारले जाईल. या भाड्यावर पुर्वीप्रमाणेच सेवेसाठीचे २५ टक्के जादा पैसे आकारले जाणार आहे. -------------जीपीएस यंत्रणेद्वारे प्री-पेडचा मार्ग व भाडे निश्चित करण्याची यंत्रणा अद्याप महाराष्टात कुठेही वापरली जात नाही. पुण्यात पहिल्यांदाच या यंत्रणेचा प्रस्ताव आहे. त्यामुळे जीपीएसद्वारे भाडे ठरविण्याची ही पध्दत योग्य आहे किंवा नाही, याबाबत वजन मापे विभागाकडून मार्गदर्शन घेतले जाणार आहे. त्याबाबतचा प्रस्ताव आरटीओकडून विभागाला पाठविण्यात आला आहे. विभागाकडून त्याची व्यावहारिकता तपासून प्रस्तावाला मंजुरी दिली जाईल. त्यानंतरच प्री-पेडसाठी जीपीएसचा वापर करण्यावर शिक्कामोर्तब होईल, अशी माहिती अधिकाºयांनी दिली.

टॅग्स :PuneपुणेRto officeआरटीओ ऑफीसpassengerप्रवासी