शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्य महिला आयोग अध्यक्षपदी माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांची निवड?; जाणून घ्या सत्य
2
तो माझा बाप हीच चूक, तिथेच ठेचून मारले पाहिजे; नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या पत्नी-मुलाचा संताप
3
Stock Market Today: रेड झोनमध्ये शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात; 'या' शेअर्समध्ये मोठी घसरण
4
Iran War: Iran War: अमेरिकेचे होर्मुझ सामुद्रधुनीत जहाजांवर हल्ले, पाच जणांचा मृत्यू; दोन जहाजे काढली बाहेर
5
नसरापूरमधील ‘त्या’ बालिकेच्या पोस्टमार्टेम रिपोर्टमधून धक्कादायक माहिती आली समोर, नराधमाने…
6
सलमान खान साकारणार 'सुपरहीरो'! राज आणि डीकेच्या आगामी चित्रपटात करीना कपूरची वर्णी?
7
KVP Investment Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम, १ लाखांचे होतील २ लाख; 'इतक्या' महिन्यांमध्ये रक्कम होईल डबल
8
Tarot Card: अंगारकीचा मुहूर्त आणि बाप्पाची कृपा; कोणाचे नशीब बदलणार? वाचा टॅरो भविष्य
9
भाजपानं दिली संधी, आयुष्याला मिळाली कलाटणी; धुणं-भांडी, घरकाम करणाऱ्या कलिता माझी बनल्या आमदार
10
मेट गालामध्ये करण जोहरचं पदार्पण, भारतीय संस्कृतीची झलक दाखवणारा पेहराव; लूकचं वैशिष्ट्य काय?
11
शेष होलो दीदीर खैला, भगबा होलो बांग्ला... विजयाची गंगा आली बिहारमधून बंगालमध्ये, ‘अंग, बंग अन् कलिंग’ मिशन यशस्वी
12
KKR चा वेगवान गोलंदाज दुसऱ्यांदा बनला आमदार; IPL पदार्पणातच किंग कोहलीचा त्रिफळा उडवला होता
13
आजचे राशीभविष्य ५ मे २०२६: नशिबाची साथ मिळेल, कार्यात यश प्राप्ती अन् आर्थिक लाभ होईल
14
बारामतीत सुनेत्रा पवार यांचा विक्रमी मताधिक्याने विजय; राहुरीत अक्षय कर्डिलेंचा विक्रमी विजय
15
अमेरिकेचा इराणला मोठा दणका! ६ युद्धनौका उद्ध्वस्त करत ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ केली खुली
16
सर्वोच्च न्यायालयाचे ‘ते’ अधिकारी स्वत:ला सुपर सरन्यायाधीश समजतात; खंडपीठाचे कडक ताशेरे
17
'खेला' उधळला, कमळ फुलले ! भाजप २०० पार; तृणमूलमध्ये हाहाकार, काँग्रेस, डाव्यांची परिस्थिती शोचनीय
18
आसामचे ‘किंग’ हिमंताच! काँग्रेसचा ‘हात’ रिकामाच; एनडीए आघाडीची राज्यात सलग तिसऱ्यांदा सत्ता
19
अल्पवयीन मुली आणि स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न
20
एसआयआर पाच राज्यात भाजपसाठी ठरली अदृश्य ताकद! विजयाचे समिकरण नेमके कसे बदलले?
Daily Top 2Weekly Top 5

खडसेंचे सीमोल्लंघन; भाजपला रामराम, उद्या राष्ट्रवादीत प्रवेश, देवेंद्र फडणवीसांवर फोडले खापर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2020 06:58 IST

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बुधवारी सकाळी मुंबईत एकनाथ खडसे यांच्या पक्षप्रवेशाची घोषणा केली.

ठळक मुद्देमाजी मंत्री एकनाथ खडसे यांनी अखेर भारतीय जनता पक्षाला रामराम ठोकला असून शुक्रवारी ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत.पक्षाला सोडचिठ्ठी देताना त्यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सगळे खापर फोडले दुसरीकडे नवरात्रौत्सव काळातील या राजकीय सीमोल्लंघनातून खडसे यांचे मंत्रिपदावर पुनर्वसन होते का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे.

मुक्ताईनगर (जि. जळगाव) : गेले अनेक दिवस राजकीय विजनवासात असलेले ज्येष्ठ नेते, माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी अखेर भारतीय जनता पक्षाला रामराम ठोकला असून शुक्रवारी ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. पक्षाला सोडचिठ्ठी देताना त्यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सगळे खापर फोडले असून फडणवीस यांनीच आपणास पक्ष सोडण्यासाठी भाग पाडले, असा आरोप केला आहे. तर दुसरीकडे नवरात्रौत्सव काळातील या राजकीय सीमोल्लंघनातून खडसे यांचे मंत्रिपदावर पुनर्वसन होते का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बुधवारी सकाळी मुंबईत एकनाथ खडसे यांच्या पक्षप्रवेशाची घोषणा केली. आपल्यासोबत सध्या एकही खासदार अथवा आमदार प्रवेश करणार नाही. खासदार रक्षा खडसे भाजपतच राहतील. मात्र जिल्हा बँकेच्या अध्यक्षा अ‍ॅड. रोहिणी खडसे-खेवलकार आपल्या सोबत असतील, असे खडसेंनी सांगितले.अनेक जण संपर्कात -खडसे यांच्यासोबत भाजपचे अनेक आमदार-खासदार राष्ट्रवादीत येण्यास उत्सुक आहेत. पण सध्याच्या काळात पोटनिवडणुका घेणे उचित होणार नाही. त्यामुळे फक्त खडसे यांचाच शुक्रवारी पक्षात प्रवेश होईल, असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले.

फडणवीसांनी पक्ष सोडण्यास मला भाग पाडले -माझा रोष देवेंद्र फडणवीस यांच्यावर आहे. त्यांनी पक्ष सोडण्यास भाग पाडले. कारण, ते मुख्यमंत्री झाल्यानंतरच मला राजकीय जीवनातून संपवण्याचे काम सुरू झाले. ‘मुख्यमंत्री पदावर बहुजन व्यक्ती असावी,’ असे ज्या वेळेस मी म्हटले त्या वेळेपासून हे षड्यंत्र रचले गेले व अनेक प्रकरणे माझ्यामागे लावण्यात आली, असा आरोपही खडसे यांनी केला.

मुख्यमंत्र्यांचा भाजपला टोला -खडसे हे स्पष्टवक्ते व लढवय्या आहेत. महाविकास आघाडीत त्यांचे स्वागत. परंतु यशाची शिखरे सर करत असताना आपला पाया का ठिसूळ होतोय? पायाखालची जमीन का सरकतेय? मुळे का निसटत आहेत? याचा भाजपने विचार करावा, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला लगावला.

पंकजा मुंडेंना सेनेची ऑफर! -भाजप नेत्या पंकजा मुंडे शिवसेनेत आल्या तर त्यांचे स्वागतच आहे, अशी आॅफर शिवसेना नेते माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी दिली आहे. याबाबत पंकजा यांना विचारले असता त्या फक्त हसल्या! 

टॅग्स :eknath khadseएकनाथ खडसेJalgaonजळगावBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस