बारामती : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे झालेल्या बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार विक्रमी मताधिक्याने विजयी झाल्या. २ लाख १८ हजार ९३० मतांनी विजयी होत त्यांनी देशपातळीवर नवा विक्रम नोंदवला आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी २०१९ मध्ये केलेल्या १ लाख ६५ हजार २६५ मताधिक्याच्या विक्रमालाही त्यांनी मागे टाकले.
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
राहुरी पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले यांनी १ लाख ४० हजार ९३ मते घेत विक्रमी एकतर्फी विजय मिळविला. कर्डिले यांचे विरोधक राष्ट्रवादीचे (शरद पवार) गोविंद मोकाटे यांना अवघी २७ हजार ५०६ मते मिळाली. त्यांच्यासह उर्वरित सहा उमेदवारांचे डिपाॅझिट या निवडणुकीत जप्त झाले. भाजपचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे ही पोटनिवडणूक झाली. बारामती आणि राहुरी या दोन्ही मतदारसंघांमध्ये सर्व विरोधकांचे डिपॉझिट जप्त झाले आहे.
विक्रमी विजयाबद्दल अभिनंदन
बंगाल, आसाम, पुद्दुचेरीमधील विजय हा जनतेचा पंतप्रधान मोदींवर असणाऱ्या विश्वासाचा विजय आहे. जनतेला आता एकच गोष्ट माहिती आहे "मोदी है तो मुमकीन है." बारामतीची जनता अजितदादांच्या पाठीशी भक्कमपणे उभी राहायची तसेच आता सुनेत्राताईंच्या मागे भक्कमपणे उभी राहिली आहे. विक्रमी विजयाबद्दल मी त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन करतो आणि पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देतो.
देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
अजित पवार यांच्या अकाली निधनाच्या दुःखातून सावरलेले नसल्याने बारामतीकरांनी संयम राखत शांततेतच हा विजय स्वीकारला. देशात सर्वाधिक मताधिक्याने लोकप्रतिनिधी निवडून देण्याचा मान मिळवूनही भावनिक वातावरण जपले.
Web Summary : Sunetra Pawar won Baramati by a record margin after Ajit Pawar's death. Akshay Kardile secured a victory in Rahuri. Both constituencies witnessed significant wins.
Web Summary : अजित पवार के निधन के बाद सुनेत्रा पवार ने बारामती में रिकॉर्ड मतों से जीत हासिल की। अक्षय कर्दिले ने राहुरी में जीत दर्ज की। दोनों निर्वाचन क्षेत्रों में बड़ी जीत हुई।