शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
5
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
6
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
7
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
8
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
9
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
10
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
11
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
12
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
13
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
14
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
15
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
16
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
17
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
18
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
19
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
20
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
Daily Top 2Weekly Top 5

गीते-कदम यांच्या दिलजमाईचे संकेत

By admin | Updated: September 26, 2016 03:09 IST

केंद्रीय अवजडमंत्री अनंत गीते आणि राज्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम या दोन्ही शिवसेना नेत्यांमधील संघर्ष सर्वज्ञात आहे. या दोन्ही नेत्यांनी जाहीर व्यासपीठांवरून एकमेकांची उणीदुणी

गौरीशंकर घाळे,  मुंबईकेंद्रीय अवजडमंत्री अनंत गीते आणि राज्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम या दोन्ही शिवसेना नेत्यांमधील संघर्ष सर्वज्ञात आहे. या दोन्ही नेत्यांनी जाहीर व्यासपीठांवरून एकमेकांची उणीदुणी काढण्यासही मागे-पुढे पाहिले नव्हते. गीते-कदम संघर्षासमोर पक्षनेतृत्वानेही हात टेकल्याचे बोलले जायचे. कोकणातील या दिग्गजांनी आता संघर्षाचा पवित्रा मागे सारत एकत्र येण्याचे संकेत दिले असून, त्या दृष्टीने दोन्ही नेत्यांमध्ये रविवारी चर्चा झाल्याचे समजते. पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी रविवारी विलेपार्ले येथे अनंत गीते यांची भेट घेतली. गीते यांच्या पार्ल्यातील कार्यालयात झालेल्या या भेटीदरम्यान पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहायक मिलिंद नार्वेकर, शिवसेना उपनेते विजय कदमही उपस्थित होते. गीते-कदम यांच्या भेटीमुळे कोकणातील राजकारणाला नवी दिशा मिळण्याची शक्यता आहे. २००९ सालच्या विधानसभा निवडणुकीत रामदास कदम यांना गुहागर मतदारसंघातून पराभव पत्करावा लागला होता. पक्षांतर्गत विरोधकांमुळे पराभव पत्करावा लागल्याचा आरोप करत, कदम यांनी अनेकदा अनंत गीतेंवर निशाणा साधला होता, तर कदम यांनी लोकसभा निवडणुकांदरम्यान अडचणीत आणल्याचा दावा गीते यांनी केला होता. या दोन्ही नेत्यांमधील वादामुळे शिवसेनेला कोकणात फटकाही सहन करावा लागला होता. एकीकडे विश्वासू अनंत गीते, तर दुसरीकडे आक्रमक रामदास कदम हा तिढा पक्षप्रमुखांसाठीही डोकेदुखी ठरली होती. रविवारी मात्र, या दोन्ही नेत्यांना एकत्र या वादावर पडदा पाडण्याचे संकेत दिले आहेत. कोकणातील मराठा मोर्चांमध्ये शिवसेनेचे अस्तित्व दिसायला हवे. शिवसेनेने या मोर्चात सक्रीय सहभाग घ्यावा, अशी उद्धव ठाकरेंची इच्छा आहे. सरकारविरोधी जनमत स्वत:कडे ठेवायचे असेल, तर कोकणातील दोन्ही नेत्यांनी आपापसातील मतभेद बाजूला ठेवून एकत्र यावे, यासाठी मिलिंद नार्वेकर यांनी शिष्टाई केल्याचे समजते. शिवाय, रामदास कदम यांचा छोटा मुलगा योगेश कदम याच्या भावी राजकारण प्रवेशाचा मार्ग सुकर करण्यासाठी रामदास कदमांनी सहकार्याच्या राजकारणाला पसंती दिल्याचे बोलले जात आहे.