शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
4
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
5
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
6
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
7
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
8
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
9
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
10
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
11
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
12
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
13
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
14
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
15
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
16
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
17
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
18
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
19
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
20
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
Daily Top 2Weekly Top 5

राज्यपाल अन् मुख्यमंत्र्यांमधील असमन्वयामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2020 16:15 IST

विविध पर्यांयांच्या माध्यमातून परीक्षा घेण्याची तयारी करणाऱ्या विद्यापीठ प्रशासनांवर अर्थात राज्यातील विद्यापीठांच्या स्वायत्ततेवर हा घाला असल्याचा आरोप अभाविपने केला आहे.

मुंबई: अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या परीक्षा म्हणजे विद्यार्थी पालकांसाठी आता दिव्यच झाले असून, याचा निर्णय होता होत नसल्यामुळे विद्यार्थ्यांचा संभ्रम वाढत चालला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून विद्यार्थ्यांना सरासरी गुण देऊन परीक्षा रद्द करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केल्यावर राज्यपालांनी आता त्यावर बोट ठेवून विद्यापीठ नियमांप्रमाणे परीक्षा झाल्या पाहिजेत, असे निर्देश दिल्यानंतर विद्यार्थी प्रचंड गोंधळले आहेत. एकीकडे कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आल्यानंतर अथवा विविध पर्यांयांच्या माध्यमातून परीक्षा घेण्याची तयारी करणाऱ्या विद्यापीठ प्रशासनांवर अर्थात राज्यातील विद्यापीठांच्या स्वायत्ततेवर हा घाला असल्याचा आरोप अभाविपने केला आहे, तर दुसरीकडे परीक्षा रद्दच्या निर्णयाला विरोध केल्याने राज्यपाल राजभवनात बसून हे ८ लाख विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणार असल्याचे उद्विग्न ट्विट युवासेना सचिव वरूण सरदेसाई यांनी केले आहे. त्यामुळे राज्यपाल आणि उच्च तंत्र शिक्षण विभाग यांच्यामधील असमन्वय, राजकीय पक्षांमधील विभिन्न भूमिका अंतिम सत्राच्या विद्यार्थ्यांना कोणत्या निर्णयाअंती पोहोचविणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे.यापूर्वीही उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी यूजीसीला लिहिलेल्या पत्रावर राज्यपालांनी आक्षेप घेतला होता आणि त्यासाठी आपल्याला विचारात घेतले नसल्याचेही म्हटले होते. मात्र त्यानंतर सामंत यांनी फोनवरून राज्यपालांची समजूत काढून गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला आणि मुख्यमंत्र्यांचा विचार घेऊन अंतिम सत्रातील विद्यार्थ्यांना सरासरी गुण देण्याचा निर्णय जाहीर केला. मात्र उच्च व तंत्र शिक्षण समितीला प्राप्त कुलगुरुंचा आपल्याला मिळाला नसल्याचे आणि  विविध विद्यापीठांच्या कुलगुरूंशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आपण केलेल्या संवादादरम्यान अनेक कुलगुरूंनी परीक्षा घेण्याची तयारी असल्याचे राज्यपालांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे विद्यापीठ कायद्याप्रमाणे परीक्षा होणे आवश्यक असल्याचे त्यांनी त्यांनी म्हटले आहे. तसेच जुलैमध्ये शाळा सुरू करण्यासाठी विविध पर्यायांचा विचार करणे आणि दुसरीकडे त्याच महिन्यात होऊ घातलेल्या अंतिम सत्राच्या प्रसिद्धीसाठी केलेला प्रयत्न असल्याचा आरोप अभाविपकडूनही  करण्यात आला आहे. एकीकडे मुख्यमंत्री कोरोना परिस्थिती आटोक्यात येत आहे याची आकडेवारी सांगत असताना दुसरीकडे असा निर्णय घेणे म्हणजे एकप्रकारे राज्य सरकार  परीक्षा घेण्याच्या जवाबदारीतून हात झटकत असल्याचा आरोप अभाविपचे अनिकेत ओव्हाळ यांनी केला.राज्यपाल आणि उच्च व तंत्र शिक्षण विभाग यांच्यामध्ये परीक्षा होणार की नाही या संभ्रमात असलेले विद्यार्थी पालक यांच्या संयमाचा बांध मात्र आता सुटत चालला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारला जर परीक्षा घ्यायचीच असेल तर तसा निर्णय जाहीर करावा किंवा ऑनलाईन परीक्षांसारखा काही पर्याय सुचवावा. मात्र तो ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ही लागू पडेल, असा असावा याची काळजी घ्यावी. परीक्षा होणार की नाही या गोंधळात परीक्षांचे केवळ राजकारण होत आहे असे वाटत असल्याची प्रतिक्रिया आयडॉलचा विद्यार्थी असलेल्या प्रथमेश शिंदे याने दिली. यामुळे विद्यार्थ्यांवरचा मानसिक त्रास वाढत असून राजकारण करत बसण्यापेक्षा निर्णय लवकर घेतला गेला पाहिजे, अशी अपेक्षा अनेक विद्यार्थी करत असल्याचे मत त्याने मांडले.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस